गट नं नमूद करणे व अक्षरी स.न. दुरुस्त करणे बाबत योग्य सविस्तर कार्यपद्धती
गट नं नमूद करणे बाबत योग्य सविस्तर कार्यपद्धती
मा.जमाबंदी
आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील दिनांक २६/०२/२०१८
चे परिपत्रक -
1.
मा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख
महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील दिनांक २६/०२/२०१८ च्या परिपत्रकानुसार मंजूर
अभिन्यासाप्रमाणे भूमी अभिलेखामध्ये दुरुस्ती करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत
तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत .एखादा गट क्रमांक किंवा एकापेक्षा जास्त गट
क्रमाकांचे एकाच वेळेस बिनशेती झाल्यास नवीन प्लॉट चे सातबारा तयार करताना काय
कार्यपद्धती असावी याबाबत हे परिपत्रक अत्यंत महत्वाचे आहे .
या परिपत्रकातील महत्वाचे मुद्दे -
2.
सक्षम प्राधिकारी यांचेकडुन ब-याच वेळा अनेक
सर्व्हे नंबर/ गट नंबर/ हिस्सा नंबर चे एकत्रीकरण करून अभिन्यास मंजुर केला जातो.
अशा वेळी विभागातील कार्यालयाकडून सर्व्हे नंबर / गट नंबर / हिस्सा नंबर नमुद करून
त्यानंतर प्लॉट नंबर नमुद केले जातात. उदा. गट नं. 2+3+4/5 + 4/ 6 चा प्लॉट नं. 1
ते 50 असे नमुद करून कमी जास्त पत्रक तयार
केले जातात. याप्रमाणे नवीन नंबर देण्यात आल्यास त्याचा अंमल संगणकीकृत 7/12
मध्ये घेता येत नाही. कारण संगणकीकृत 7/12 मध्ये
+ (अधिक) चिन्ह नमुद करून भूमापन क्रमांक नमुद करण्याची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्र
जमीन महसूल ( महसूली भूमापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग ) नियम 1969 मधील नियम 11 (3) नुसार भूमापन क्रमांकाचे एकत्रीकरण
बाबतची कार्यपद्धती ठरवुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व्हे नंबर / गट नंबर /
हिस्सा नंबर चे एकत्रीकरण करतेवेळी एकत्रीकरणाच्या क्रमांकाच्या मालिकेतील पहिला
क्रमांक द्यावयाचा आहे. त्यामुळे यापुढे कमी जास्त पत्रक तयार करतेवेळी उपरोक्त
नमुद केलेप्रमाणे अनेक सर्व्हे नंबर / गट नंबर / हिस्सा नंबर चे एकत्रीकरण होत
असल्यास त्या सर्व्हे नंबर / गट नंबर / हिस्सा नंबर मधील पहिला क्रमांक देऊन
त्यामध्ये मंजुर रेखांकनानुसार भूखंडाचे क्रमांक दर्शवावे. उदा. गट नं. 2, भूखंड क्रमांक 1 ते 50.
3.
त्याचप्रमाणे मंजुर अभिन्यासाप्रमाणे असणारे
रस्ते, खुल्या जागा व सुविधा क्षेत्र यास देखील भूखंड क्रमांक देऊन त्यापुढे कमी
जास्त पत्रक रकाना क्र. 16 मध्ये मंजुर अभिन्यासामधील रस्ता
/ खुली जागा / सुविधा क्षेत्र असे स्पष्टपणे नमुद करावे. म्हणजे त्याप्रमाणे योग्य
नोंदी संगणकीकृत 7/12 मध्ये घेता येतील.
4.
7/12 संगणकीकरणामध्ये सर्व बिनशेती क्षेत्रासाठी आर. चौ. मी. हे एकक निश्चित
करण्यात आलेले आहे. त्यामुळे मंजुर रेखांकन / बिनशेती आदेश कोणत्याही एककामध्ये
असला तरी कमी जास्त पत्रक तयार करताना भूखंडाचे क्षेत्र आर. चौ. मी. मध्ये
रुपांतरित करुन नमुद करण्यात यावे. उदा. 515.50 चौ. मी.
क्षेत्र असल्यास ते 5.15.50 आर चौ.मी. असे नमुद करावे.
म्हणजे त्याचा योग्यरित्या अंमल संगणकीकृत आज्ञावलीमध्ये घेता येईल.
सातबारा संगणकीकरण परिपत्रक २००२
1)एखाद्या
गट क्रमाकांचे विभाजन झालेनंतर नवीन उपविभाग कसे तयार होतात याबाबतचे विवेचन या परिपत्रकात केलेले आहे .
2)मोजणी खाते
उपविभाग पाडताना पूर्वेकडून पश्चिमेकडे व घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उपविभाग
पाडतात .त्यामध्ये प्रथम उपविभागास १,२,३,४ व व्दितीय उपविभागास अ ,ब ,क ,ड असे
संबोधण्यात येते .या पद्धतीला अल्फा न्युमरिक पद्धत म्हणतात .
उदा : या पद्धतीनुसार गट नं 15 चे तीन
हिश्यात विभाजन झाले तर नवीन उपविभाग १५/१ ,१५/२ ,१५/३ असे होतील .यानंतर गट नं
१५/१ चे विभाजन झाले तर १५/१/अ ,१५/१/ब असे उपविभाग होतील.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या प्रकरण पाच (कलमे 79 ते 89)
1)जमीनधारकाने अर्ज केला असता आणि जमीन धारकाच्या संमतीने
कोणताही भूमापन क्रमांक किंवा पोटविभाग यांचे सीमेलगतच्या इतर कोणत्याही भूमापन
क्रमांकाबरोबर एकत्रीकरण करता येईल,
मात्र खालील शर्ती
पूर्ण केल्या असल्या पाहिजेत :-
१) एकत्रीकरणानंतरचे एकूण क्षेत्र 12.1406 हेक्टरहून (30 एकर) अधिक नाही किंवा एक भूमापन क्रमांक
किंवा पोट-विभाग 2.0234 हेक्टरहून (5 एकर) कमी असल्यास, 16.1874 हेक्टराहून कमी नाही (40 एकर) (तथापि,
या मर्यादा संचालक, भूमि अभिलेख यांच्या मान्यतेने वाढविता येतात)
२ ) जमिनीचे सर्व भूखंड एकाच जमीनधारकाने एकाच भूधृतीवर धारण
केले आहेत आणि
३ ) एकत्रीकरण केल्यानंतर लागवडीस विशेषत:
सोयीचे होईल अशी सामाईक सीमा आहे.जे एकाच भूमापन क्रमांकातील असून एकाच धारकाने
सारख्याच धारणाधिकार पद्धतीवर धारण केलेले आहेत व ज्यांच्या सीमा एकमेकींना लागू
आहेत अशा दोन उप-विभागांचे एकत्रिकरण अधीक्षक,
भूमि अभिलेख यांच्या
पूर्व मंजुरीशिवाय करता येईल.
४) एकत्रीकरणानंतर, मूळ सीमाचिन्हे काढून टाकावयाची असून त्यानुसार नकाशांमध्ये दुरूस्त्या
करावयाच्या असतात. भूमि अभिलेखातही आवश्यक ती नोंद घ्यावयाची असते.
५ ) गावांचे एकत्रीकरण केले जाते तेव्हा, सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या गावाचे भूमापन क्रमांक तसेच ठेवून इतर
गावांचे भूमापन क्रमांक नव्याने द्यावयाचे असतात् उक्त जास्त लोकसंख्येच्या गावाला
दिलेल्या भूमापन क्रमांकांपुढील क्रमांक या गावांना द्यावयाचे असतात. तथापि, पूर्वीचा रद्द केलेला क्रमांक,
गावाच्या नावासह नवीन
क्रमांकाखाली कंसामध्ये दर्शवणे आवश्यक असते.
६) जेव्हा एखाद्या खेड्याचे दोन किंवा अधिक खेड्यांमध्ये
विभाजन केले जाते तेव्हा हा नव्याने तयार केलेल्या प्रत्येक गावाचा भूमापन क्रमांक
बदलून त्याऐवजी नवीन भूमापन क्रमांक द्यावयाचे असून त्याची सुरूवात 1 पासून करावयाची असते. तथापि जुने रद्द केलेले क्रमांक नवीन क्रमांकाच्या खाली
कसामध्ये दर्शविण्यात यावेत.
उपरोक्त तरतुदीचे अवलोकन केले असता
§
ज्या ठिकाणी गावठाण प्लॉट , पुनर्वसन प्लॉट किंवा अन्य शब्द प्रयोग केलेला आहे व गट
नंबर नमूद केलेला नाही अशा ठिकाणी सबंधित गावठाण प्लॉट ,पुनर्वसन प्लॉट ज्या गट नं
चा मिळून झालेला आहे त्या गट नं च्या पैकी जो गट क्रमांक सुरुवातीचा आहे तो गट नं
नमूद करून नंतर प्लॉट क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे .
उदा : मूळ गट नं
120, 121,122 मिळून पुनर्वसन प्लॉट 1 ते
70 तयार झालेले आहेत .व त्यांना पुनर्वसन प्लॉट 1 , पुनर्वसन प्लॉट 2 ,.....ते
पुनर्वसन प्लॉट 70 असे क्रमांक दिलेले आहेत .ते गट नं 120 पैकी पुनर्वसन प्लॉट 1 ,
120 पैकी पुनर्वसन प्लॉट 2 ,........ 120 पैकी पुनर्वसन प्लॉट 70 असे दुरुस्त
करावे लागेल .कुठल्याही परिस्थितीत गट नं चा सुरुवातीचा pin हा अंक असला पाहिजे .
§
ज्या ठिकाणी मूळ शेती सातबाराचे बिनशेती मध्ये विभाजन
झाले आहे अशा ठिकाणी रस्ते खुल्या जागा व अमेनीटी जागा ला त्या बिनशेती भूखंड मधील
शेवटचा प्लॉट नं च्या पुढचा प्लॉट नं नमूद करता येईल.
§
ज्या ठिकाणी मूळ गट क्रमांक चे उपविभाग पडले आहेत अशा
ठिकाणी त्या उपविभागचे क्रमांक अल्फा नुमरीक पद्धतीने दिलेले नसल्यास ते अल्फा
न्युमरिक पद्धतीने द्यावे लागतील .
§
एकापेक्षा जास्त गटाचे शेती क्षेत्र बिनशेतीत रुपांतर
झाले असल्यास ,
ते बिनशेती क्षेत्र रहिवासी असेल तर
बिनशेती झालेल्या गट नं पैकी जो गट नं लहान आहे किंवा सुरुवातीचा आहे तो नमूद करून
नंतर प्लॉट नं नमूद करावे लागतील .
§
एका गटाचे शेती क्षेत्र बिनशेतीत रुपांतर झाले असल्यास ,
ते बिनशेती क्षेत्र औद्योगिक किंवा
वाणिज्य प्रयोजनार्थ बिनशेती असेल असेल तर
बिनशेती रूपांतरण करत असताना मूळ गट नं बंद करावा लागत असल्याने नवीन नमूद केलेला
रुपांतरीत बिनशेतीचा सुरुवातीचा गट नं डुप्लिकेट होत असल्याने अल्फा नुमरीक
पद्धतीचा आधार घेऊन नमूद केलेल्या सुरुवातीच्या गट नं पुढे नुमरिक द्यावा लागेल .
§
एकापेक्षा जास्त गटाचे शेती क्षेत्र बिनशेतीत रुपांतर
झाले असल्यास ,
ते बिनशेती क्षेत्र औद्योगिक किंवा
वाणिज्य प्रयोजनार्थ बिनशेती असेल असेल तर
बिनशेती झालेल्या गट नं पैकी जो गट नं लहान आहे तो नमूद करावा लागेल .मात्र
बिनशेती रूपांतरण करत असताना मूळ गट नं बंद करावा लागत असल्याने नवीन नमूद केलेला
रुपांतरीत बिनशेतीचा सुरुवातीचा गट नं डुप्लिकेट होत असल्याने अल्फा नुमरीक
पद्धतीचा आधार घेऊन नमूद केलेल्या सुरुवातीच्या गट नं पुढे नुमरिक द्यावा लागेल .
§
आदेश व दस्ताऐवज या फेरफार प्रकारातुन स. नं. बदलने हा पर्याय
वापरून सदरची दुरुस्ती करता येईल . कोणताही स.नं./ ग.नं. लिहितांना तो त्याच्या
पोटहिस्सा सह 1ते9 रकान्यात नमुद करणे आवश्यक
असते. पहिल्या रकान्यात फक्त इंग्रजी अंक स.नं./ ग.नं. नमुद करून स.नं./ग.नं.चे
हिस्सा नं. पुढिल Pin -1 To Pin-8 या
रकान्यात नमुद करणे आवश्यक आहे. पहिल्या रकान्यात कोणतेही अक्षर किंवा मराठी अंक
किंवा इंग्रजी अंक व अक्षर एकत्र लिहिणे अपेक्षीत नाही. तथापी Pin -1
To Pin-8 या
रकान्यात फक्त इंग्रजी अंक व मराठी अक्षर नमुद करता येईल आणि शेवटच्या Pin-8 मध्ये + किंवा /
नमुद करता येईल .
§
सर्वसाधारणपणे दुरुस्त करावयाची अक्षरी सर्व्हे जे चुकीचे नमूद केले आहेत ते साधारणत एन.ए.,बिनशेती
सं.नं.,एस एन नं.,16 ते 23, 25, 27 ते 29,पर्डी नं., रस्ता,प.न. , पैकी,प्रासव्हेट,प्रा.स्किम,61,62,63,बी,स्किम,5-3 21.1ब,वार्ड
क्रं.,विनाअंकी जुना गट नं.,बिन भोगवटादार,मराठी,अंक, ११९५,गावठाण,गा.पं.नं.,50+51+52,खुबडा,खुलेगावठाण,गुरचरण,गावं,महार
परडी,गावंठाण प्लॉट,मळई, गाळपेरा,म,फ्लॅट नं.अशा
प्रकारे आहेत जे कि दुरुस्त करावयाचे आहेत .
§
वरिलप्रमाणे त्रृटीयुक्त अक्षरी स.नं./ ग.नं. दुरूस्त
करण्यासाठी तहसिलदार यांनी गावनिहाय सं.नं. दुरूस्तीचे आदेश काढून या आदेशाची
अंमलबजावणी तलाठी यांनी आदेश व दस्तावेज या फेरफार प्रकारातुन सं.नं. बदलणे हा
पर्याय वापरून करावी. यासाठी या मार्गदर्शक सुचना सोबत चुकीच्या पध्दतीने लिहीले
सं.नं. ची जिल्हा
निहाय यादी
जोडण्यात आली आहे.
§
याबाबत
संबंधीत तहसिलदार यांनी स.नं./ ग.नं. दुरूस्तीची कार्यवाही करावी. याबाबत गरज
असल्यास संबंधीत उप अधिक्षक भूमि अभिलेख यांचे सहकार्य घ्यावे. व या
आदेशाने होणा-या फेरफाराच्या प्रतीसह आदेशाची प्रत उप अधिक्षक भूमि अभिलेख व
संबंधीत खातेदार यांना माहितीसाठी पाठवावी.
§
सातबारा संगणकीकरण का विषय सातत्याने चालणारा विषय असून
गट क्रमांक किंवा भूमापन क्रमांक हा सातबारा संगणकीकरणाचा आत्मा आहे .त्यामुळे
भूमापन क्रमांक हे दुरुस्त करणे ही बदलत्या काळाची गरज आहे .
अर्जदार : नितीन पोपट थोपटे
ReplyDeleteविषय : वारस नोंद होणे बाबत.
महोदय/मोहोदया,
मी नितीन पोपट थोपटे मु पोस्ट पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणेयेथील रहिवाशी असून माझ्या वडिलांचे (पोपट बाजीरावथोपटे)निधन दिनांक ११/४/२०२१ रोजी झाले असून वडिलांच्यानावावर पिंपरे खुर्द आणि थोपटेवाडी येथील प्रॉपर्टी साठी वारस नोंदकरणे बाबत तलाठी मॅडम कडे अर्ज सर्व कागद पात्रांची पुर्तता करूनजमा केला होता परंतु ऑनलाईन पद्धतीने नोंद करत असतान फेरफारप्रलंबित (६७४६ पिंपरे खुर्द आणि २४३८ थोपटेवाडी)असल्या मुळे वारस नोंद होऊ शकणार नाही असा संदेश येतो आहे. त्यांनीहीटेक्निकल कडे चौकशी केली आहे परंतु मार्ग निघत नाही.
वारस नोंद होत नाही म्हणून आमच्या खालील सर्व गोष्टी अडकूनपडत आहेत.
१) विविध कार्यकारी सोसायटीत मिळणारे कर्ज यापासून वंचित
२) हक्क सोड पत्र करता येत नाही
३)शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही
४) खातेफोड करण्यास अडचणी
५) सहकारी कारखाना दिली जाणारी मागील बिल भेटत नाहीत
६)सहकारी कारखान्या मध्ये असणारे शेर्स ट्रान्सफर साठी होणारीअडचण
७)सहकारी सोसायटी मदले शेर्स ट्रान्सफर होताना येणाऱ्या अडचणी
८)विविध सहकारि सोसायटी व सहकारी साखर कारखानानिवडणुकात आपले मतदान देऊ शकणार नाही.
वरील सर्व अडचणींना तोंड द्यावे लागत असून कोरोना काळात दुखःबरोबर शेतकरी म्हणून सामना करत आहोत....
गावातील अश्या बऱ्याच नोंदी गेली ७ ते ८. महिन्यांने पासुन प्रलंबीतअसुन आम्हा शेतकऱ्यांना तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत आणिआमच्या अडचणींना वाट करून द्यावी हि नम्र विनंती...
तालुक्या मध्ये तुमच्या कडून होणाऱ्या सूचनांचे पालन आम्ही तंतोतंतकरत आहोत कोरोनाच्या काळातही आपणाकडून होणार्या कार्याबद्द्लआम्हांला अभीमान वाटातो.
वरील अडचणीं साठी उपोषण व बाकी गोष्टी करण्यास काही अर्थउरत नाही. व्यक्त होऊन अडचणी दूर होतील अशी आशा बाळगणेवावगे ठरणार नाही...
आपला विश्वासू,
नितीन पोपट थोपटे.
मो नं : ९८६७१२७००५