फेरफार नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली म्हणजेच ई-हक्क प्रणाली (PDE)
फेरफार नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली म्हणजेच ई-हक्क प्रणाली (PDE)
• जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने ई हक्क ( PDE – Public Data Entry नावाने एक नवीन ऑनलाईन आज्ञावली विकसित करण्यात आलेली आहे.
• कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाईन दाखल करता येतील.
• या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात १. वारस नोंद , २. बोजा दाखल करणे, ३. बोजा कमी करणे , ४. ई करार नोंदी , ५. मयताचे नाव कमी करणे ६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे, ७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे व ८. विश्वास्थांचे नाव कमी करणे ९. संगणीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज असे नऊ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई हक्क प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील.
• फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्रे जोडावी लागतील त्यांची यादी देण्यात आली असून अशी कागदपत्रे स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत ) पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतील .
• अशा पद्धतीने दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर (Aplicatiopn ID) मिळेल व त्याची ऑनलाईन पोहोच देखील अर्जदाराला मिळेल व अश्या अर्जांची स्थिती अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर याच प्रणालीत तपासता येईल व प्रत्येक टप्प्यावर मोबाईलवर मेसेज येईल.
• असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारतील अथवा कारण देयून पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी पाठवेल किंवा कारण नमूद करून पूर्णतः नाकारील. यासाठी प्रत्येकं अर्जदाराने या प्रणालीवर मोबाईल नंबर देवून नोंदणी करणे आवश्यक आहे.
• ई हक्क ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीला पूरक असून त्यामधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये प्राप्त करून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणालीशी संलग्न करण्यात आलेली आहे.
• याच प्रणालीमध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेत आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागत नाही पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत ठरत आहे.
• वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता व गतिमानता येण्यास आणखी मदत झाली आहे.
• सदर प्रणालीचे राज्यातील सर्व जिल्ह्यांस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
माहे जानेवारी २०२२ अखेर ई हक्क प्रणालीत ५१,००० पेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत मग आपण का मागे आपल्या फेरफारासाठी आजच ऑनलाईन अर्ज करा
त्यासाठी खालील लिंक वापरा
https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी
दि ४.२.२०२२
Comments