DDM नक्कल फी चे चलन आता तलाठी यांना घरी / कार्यालयात बसून पेमेंट गेटवे द्वारे ऑनलाईन भरता येणार - सुविधा झाली सुरु
DDM नक्कल फी चे चलन आता तलाठी यांना घरी / कार्यालयात बसून पेमेंट गेटवे द्वारे ऑनलाईन भरता येणार - सुविधा झाली सुरु
नमस्कार मित्रांनो ,
अभिलेख वितरण प्रणाली तून (DDM) वितरीत केलेल्या नकलांची नक्कल फी माहे मार्च २०२० पासून बँक ऑफ बडोदा मध्ये प्रत्येक तलाठी साझा साठी तयार केलेल्या VAN द्वारे जमा केली जाते परत काही तालुके / जिल्ह्ये मध्ये बँक ऑफ बडोदा / विजया बँक / देना बँक शाखा नसल्याने राक्क्म जमा करण्यासाठी अडचणी येत होत्या त्यासाठी पेमेंट गेटवे ची सुविधा विकसित केली असून आज पासून ही पेमेंट गेटवे ची सुविधा सर्व तलाठी यांना उपलब्ध करून दिली आहे .
आज पासून कोणत्याची तलाठी यांना त्यांचे लॉगीन ने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ddmchalan
या लिंकवर लॉगीन करून DDM चलन विना शुल्क ऑनलाईन भरता येईल . या साठी तलाठी यांना कोणतेही जादा शुल्क बँकांना द्यावे लागाणार नाही . ही सुविधा लवकरच DDM मध्येच लिंक करून देण्यात येईल तरी सर्व तलाठी यांनी ही सुविधा वापरून पहावी आपले DDM चलन चा ऑनलाईन भरणा करावा व काही अडचण येत असल्यास help desk ची मदत घ्यावी
तलाठी यांनी ज्या महिन्याचे चलन अजून भरलेले नाही त्याच महिन्याचे चलन तयार करून तलाठी ऑनलाईन भरावे . ही विनंती
माहे डिसेंबर २०२० पासून त्याचा ऑनलाईन ताळमेळ देखील आपोआप घेतला जाईल
सोबत या बाबतचे user manual जोडले आहे
आपला
रामदास जगताप
दि १२.१२.२०२०
25
ReplyDeleteखुप छान सुविधा दिली सर खुप वेळ पण वाचेल व लवकरात लवकर भरणा पण करणे शक्य होईल
ReplyDeleteएकदमच खासच झाले
ReplyDeleteनमस्कार सर,
ReplyDeleteDDM चलान भरणा पेमेंट गेट वे सुविधेद्वारे उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर.
एकदा challan भरणा झाल्या नंतर पुन्हा चुकीने challan except होऊ नये.mseb चे सुद्धा डबल भरणा झाल्यास पुढील बिलातून तेवढे सुट यते ,किंवा 0 बिल यते.पण ही कितीही वेळा भरणा झाला तरीही except होते. ही दुरुस्ती व्हावी.
ReplyDeleteअसे होणार नाही , पुन्हा चेक करा
Deleteडिसेंबर महिना चलान निघत नाही आनलाईन भरायची आहे तर
ReplyDeleteएकदा संबंधित महिन्याचे चलन भरणा केल्यावर ताळमेळ घेण्याचा प्रयत्न केला असता payment not done असे दाखवतात , व काही वेळेस चुकुन दुबार रक्कम भरणा केली जाते ,तरी एकदा चलन रक्कम भरणा केली की,लगेच payment done असा मेसेज आला पाहिजे व पुन्हा त्याच महिन्याचे चलन generate होता नये.अशी विनंती आहे.
ReplyDelete