रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

केळापूर जिल्हा यवतमाळ येथील ई फेरफार प्रणाली फेज २ नंतर च्या कामकाजा बाबत अभिप्राय मिळणे बाबत

प्रति, मा.निवासी उपजिल्हाधिकारी तथा डी डी ई यवतमाळ. विषय- केळापूर जिल्हा यवतमाळ येथील ई फेरफार प्रणाली फेज २ नंतर च्या कामकाजा बाबत अभिप्राय मिळणे बाबत उपरोक्त विषयानुसार ई-फेरफार प्रणाली च्या फेज २ च्या कामा नंतर ची प्रणाली आपले जिल्ह्यातील केळापूर तह्सील ला यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले असून सदरचे काम वरील तालुक्यात सुरु आहे. सदरची ई फेरफार प्रणाली राज्यातील इतर जिल्ह्यांना उपलब्ध करून देणेसाठी खाली नमूद मुद्द्यांवर आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय आवश्यक आहे. अभिप्राय मुद्दे खालीलप्रमाणे : सदर अभिप्राय केळापूर तहसीलदार यांनी खालील मुद्द्यांमध्ये द्यावा. १.ई फेरफार प्रणाली मध्ये आज रोजी काम करणेसाठी काही अडचण आहे का?(हो/नाही असल्यास नमूद करावी) २. फेज २ नंतर सर्व प्रकारच्या फेरफार नोंदी घेता येत आहे? (हो/नाही- नसल्यास नमूद करावे ) ३. फेज २ नंतर सर्व फेरफार नोंदी प्रमाणीकरण व्यवस्थित होत असून ७/१२ वर योग्य तो परिणाम होत आहे. ?(हो/नाही- नसल्यास नमूद करावे ) ४.पिक पाहणी OCU module मध्ये स्वतंत्र database उपलब्ध झाला असून योग्यरीत्या पिक पाहणी भरता येत आहे ?(हो/नाही- नसल्यास नमूद करावे ) ५. दुय्यम निबंधक यांचे कडे दस्त नोंदणी वेळी data exchange अचूकरीत्या होत आहे? (हो/नाही- नसल्यास नमूद करावे ) ६. दस्त नोंदणीनंतर दुय्यम निबंधक यांचे कडून योग्य/अचूक दस्त प्राप्त होत आहेत? (हो/नाही- नसल्यास नमूद करावे ) ७. दुय्यम निबंधक यांचे कडून येणारे दस्तांचे फेरफार अचूकपणे तयार होत आहे. (हो/नाही- नसल्यास नमूद करावे ) ८. फेज २ नंतर ७/१२ पाहणे/वितरीत करणे योग्यरीत्या होत आहे?(हो/नाही- न सल्यास नमूद करावे ) ९. फेज २ नंतर फेरफार योग्यरीत्या तयार करता येत असून जुन्या फेरफार नोंदी register ला उपलब्ध आहेत ? (हो/नाही- नसल्यास नमूद करावे ) १०. ई-फेरफार व इतर module बाबत फेज २ नंतरचा आपला अभिप्राय वरील १० मुद्द्यांवरील आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय लवकरात लवकर सादर करावा जेणेकरून आपले अभिप्रायवर अवलंबून ई-फेरफार Version-2 राज्यातील इतर जिल्ह्यांना उपलब्ध करून देणे सोयीचे होईल. ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे. प्रत , तहसीलदार केळापूर जि. यवतमाळ

Comments

Archive

Contact Form

Send