रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल ७/१२ निर्मिती चे स्वप्न साकार - रामदास जगताप

 

 

 

 

डिजिटल ७/१२ निर्मिती चे स्वप्न साकार - रामदास जगताप

 

नमस्कार मित्रांनो

                    डिजिटल सातबाराचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वताहून ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून  जबाबदारी स्वीकारून सलग ५ वर्षे ई फेरफार प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस करून अत्यंत सातत्यपूर्ण समन्वय केल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे . आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज या प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून असलेल्या जबाबदारीतून मुक्त होत असताना मी पूर्ण समाधानी आहे. शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून ऑनलाईन ७/१२ चे स्वप्न हे स्वप्नच राहते काय असे नेहमी वाटायचे परंतु केंद्र शासनाच्या मदतीने सुरु झालेला राष्ट्रीय भूमी अभेलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP) प्रकल्प आला आणि आशा पल्लवित झाल्या परंतु अनंत अडचणीचा सामना करता असताना आणि हा प्रकल्प अत्यंत अडचणीत असताना सन २०१६-१७ पासून डिजिटल ७/१२ चे स्वप्न उराशी बाळगून या प्रकल्पाचा समन्वयक (स्वयंघोषित पदनाम)  म्हणून काम करण्याचे ठरवले. तत्कालीन जमाबंदी आयुक्त मा. संभाजी कडू पाटील  साहेब यांनी शासनाला प्रस्ताव पाठून माझी सेवा ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून उपलब्ध करून देण्याची विनंती  केली आणि तेंव्हा पासून या प्रकल्पासाठी झोकून द्यायचे ठरवले.  

                पाच सहा वर्षाचे मागे वळून पाहताना आपण या प्रकल्पात करू शकलेलो प्रगती पाहून आज या जबाबदारीतून मुक्त होत असताना बहुतांशी बाबीतआपण यशस्वी झाल्याचे समाधान निश्चित वाटते. यासाठी राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांचे मला या प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून साथ दिली म्हणून मला या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानायचे आहेत. महाराष्ट्र राज्य तलाठी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष कै. अशोक कोकाटे व श्री श्याम जोशी आणि राज्य तलाठी संघाचे श्री डुबलआप्पा यांचेसह सर्वच पदाधिकारी व क्षेत्रीय स्थरावर अहोरात्र कष्ट करणारे तलाठी बांधव व मंडळ अधिकारी त्यांचे कोतवाल व अगदी त्यांचे सहाय्यक यांचे देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

                   आपला ई फेरफार प्रकल्प अन्य राज्याच्या तुलनेत अत्यंत उजवा आहे अशा अर्थाने कि यात आपण ७/१२ च्या अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले होते व दिले आहे. त्यासाठी चावडी वाचनाची मोहीम, एडीट , री एडीट, कलम १५५ च्या दुरुस्त्या या सह विसंगती अहवाल दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज आपण ९९% पेक्षा जास्त अचूकता प्राप्त करू शकलो आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जावून तलाठी मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांचे प्रशिक्षण असेल अथवा यशदा , पुणे येथे मास्टर ट्रेनर्स साठी विशेष प्रशिक्षण असेल ह्याचा आपल्याला निश्चितच फायदा झाला.

              

                         ई फेरफार आज्ञावली सोबतच ई पीक पाहणी प्रकल्प देखील राज्य महसूल विभागाने यशस्वी करून दाखवत शेतकरी बांधवांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा खराखुरा फायदा करून देण्याचा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचे नेतृत्वात महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर साहेब यांनी घेतला त्याचे अंमल बजावणीसाठी जमाबंदी आयुक्त मा. निरंजन सुधांशू सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले म्हणूनच आज अखेर सुमारे ९७ लक्ष शेतकरी खातेदार यांनी ई पीक पाहणी हे मोबाईल आप डाऊनलोड करून वापरले आहे सुमारे ६७ लक्ष  खातेदार शेतकरी यांनी  ९४ लक्ष  हेक्टर क्षेत्रावर ई पीक पाहणी गेल्या ५ महिन्यात केली.

               राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील २ कोटी ५५ लक्ष सातबाराचे केवळ संगणकीकरण न करता  हे सर्व ७/१२ आणि फेरफार ऑनलाईन तर केलेच शिवाय आता हे सर्व अभिलेख  डिजिटल स्वाक्षरीने जगभरातून केंव्हाही आणि कोणालाही  ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी २४ तास उपलब्ध करून दिले आहेत.  त्याआर्थाने डिजिटल सातबाराचे स्वप्न साकार झाले.  सातबारा अधिक सुटसुटीत आणि माहितीपूर्ण होण्यासाठी पन्नास वर्षानंतर त्यात महत्वाचे बदल करण्यास शासनाने मान्यता दिली त्यामुळे नवीन स्वरूपातील डिजिटल ७/१२ घरपोहोच करण्याची अत्यंत महात्वाकांशी योजना मा. महसूल मंत्री महोदयांचे कल्पनेतून पूर्णत्वास आली  आणि आता नमुना १२ मध्ये देखील काही महत्वाचे बदल सुचविले आहेत. गेल्या पाच सहा वर्षात राज्यभरात १ कोटी ४० लक्ष पेक्षा जास्त फेरफार ऑनलाईन नोंदविण्यात व निर्गत करण्यात आले आणि आता ते सर्व डिजिटल स्वरूपात सामान्य नागरिकांना महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे ७५ ते ८० हजार नागरिक त्याचा दररोज लाभ घेत आहेत ही खरी समाधानाची बाब आहे.

              महसूल विभागाने महाभूमी पोर्टलची निर्मिती, अभिलेख वितरण प्रणाली, व्हर्चुअल अकौंट सुविधा, फेरफार मंजुरीसाठी बायोमेट्रिक सुविधा, विसंगती अहवाल, कलम १५५ ऑनलाईन दुरुस्ती सुविधा, ऑनलाईन वारस नोंदवही, ई पीक पाहणी असे अनेक नवनवीन उपक्रम राबवून नागरिकांचा अत्यंत गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व गतिमान सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व  अत्यंत किचकट व गुंता गुंतीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी  मला सर्वाधिक सहकार्य लाभेले ते म्हणजे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) पुणे येथील वरिष्ठ शाश्रज्ञ व सर्व कंत्राटी विकासक यांचे . या मध्ये श्री अनिल जोंधळे सर , श्री विश्राम चौसाळकर, श्रीमती शुभांगी राव, श्री श्रीकांत कुरुलकर, श्री लक्ष्मीकांत काटे, श्री.राजेंद्र उकिर्डे, श्री संजय कुलकर्णी, श्री उल-हक, श्री संजय कोतकर, आणि दिग्विजय, अर्चना, अभिजित, सीमा, पूजा, सोनाली, दोन  प्रशांत, सुनील, आशिष इ.  यांचे योगदान महत्वाचे होते.

                  माझ्या या कामासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शनासाठी व्यक्तिश तत्कालीन जमाबंदी आयुक्त श्री चंद्रकांत दळवी, संभाजी कडू पाटील,  एस चोक्कलिंगम व सध्याचे जमाबंदी आयुक्त श्री निरंजन सुधांशू , तत्कालीन अप्पर मुख्य सचिव महसूल श्री मनू कुमार श्रीवास्ताव आणि सध्याचे अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर , सह तत्कालीन सह सचिव महसूल कै. संतोष भोगले, सध्याचे सह सचिव महसूल श्री रमेश चव्हाण व डॉ. माधव वीर,  उप सचिव श्री संजय बनकर , अव्वर सचिव  सुनील कोठेकर व विलास थोरात , भगवान सावंत व कक्ष अधिकारी मंजुषा सोनजे व डांगे साहेब यांचे अमूल्य सहकार्य लाभले . क्लाऊड पार्टनर मे. Esds क्लाऊड, आकाशवाणी दूरदर्शन व सर्व वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रोनिक मेडिया प्रतिनिधी मित्र यांचे मनपूर्वक धन्यवाद

    माझ्या सोबत राज्यातील चांदा ते बांदा असा प्रवास करून प्रकल्पाचे महत्व व कार्यपद्धतीचे प्रशिक्षणा साठी मला साथ देणारे प्रत्येक विभागाचे विभागीय समन्वयक या मध्ये श्रीमती मोहनमाला नाझीरकर नायब तहसीलदार, डॉ गणेश  देसाई अ.का., श्री कृष्णा पास्ते, श्री सचिन भैसाडे. श्रीमती शामल काकडे , श्रीमती अर्चना पाटणे यांचे विशेष आभार . या प्रकल्पाचे कक्ष अधिकारी रणजीत देशमुख, श्रीमती नीलाक्षी भागवत व  श्री महेद्र गंबरे , पाटोळे व लिपिक नीता गोडे यांनी देखील मला या कामात मोलाचे सहकार्य मिळाले.

   तत्कालीन महसूल मंत्री महोदय मा. चंद्रकांत दादा पाटील व महासूल मंत्री महोदयांचे खाजगी सचिव मनोज रानडे , विद्यमान महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब व त्यांचे खाजगी सचिव मा. रामदास खेडकर साहेब यांनी मला या कामात व्यापक जनहित समजून अत्यंत मोलाचा पाठींबा व सहकार्य केले बद्दल मनपूर्वक धन्यवाद.

    महसूल विभागाने या प्रकल्पात खूप काम केले आहे परंतु अजून खूप काही करायचे आहे. ई चावडी व आधार क्रमांकाची संलग्नता हे दोन मोठे प्रकल्प लवकरच आकार घेतील अशी अपेक्षा आहे. 

 नवनियुक्त राज्य समन्वयक श्रीमती सरिता नरके म्याडम यांना हार्दिक शुभेच्छा . 

                       मी आज पासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झालो. पुन्हा एका नवीन प्रकल्पासाठी सज्ज ............

                        “ अनंत अडचणीचा सामना करत ई फेरफार प्रकल्पी पीक पाहणी प्रकाल्प व डिजिटल सातबारा यशस्वी करण्यासाठी माझ्या सर्व सहकारी अधिकारी , राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे सर्वांचे कठोर परिश्रम महत्वाचे होते. या प्रकल्पाने ९९% पेक्षा जास्त अचूकता साध्य केली त्यामुळे त्याची फळे आता राज्यातील नागरिकांना मिळू लागली आहेत हे अत्यंत महत्वाचे काम माझे माध्यमातून झाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.”- रामदास जगताप

आपला

 

रामदास जगताप

राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प ‘दि २७.१.२०२२

                

Comments

  1. Great work sir....
    Congratulations and best wishes for next project 💐💐

    ReplyDelete
  2. sir, You took lot of efforts for e-ferfar, EEP & e-chavadi project. you are deserve for National level award & for that we will defiantly do it for You Sir... Thank very much sir for your kind support ..... With Regards....
    Dr Ganesh Desai

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, गणेश तुमची देखील समर्थ साथ मिळाली

      Delete
  3. We'll miss you and your valuable guidance sir....

    ReplyDelete
  4. अतिशय महत्त्वाचे किचकट काम पुर्ण झाले हे सगळ्यासाठी प्रेरणादायीच आहे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send