7/12 वरील एकक व क्षेत्र दुरूस्ती योग्य पध्दतीने न केल्याने निर्माण झालेल्या स्थितीबाबत. तहसिलदार यांनी काम पुर्ण झालेचे प्रमाणपत्र देणेबाबत. दि १५.११.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
माझे दिनांक 22 /09/2018 चे पत्र क्रमांक . रा.भू.अ.आ.का.4/रा.स/67/2018 चे अवलोकन व्हावे
विषय : - 7/12 वरील एकक व क्षेत्र दुरूस्ती योग्य पध्दतीने न केल्याने निर्माण झालेल्या स्थितीबाबत तहसिलदार यांनी काम पुर्ण झालेचे प्रमाणपत्र देणेबाबत. .
ई-फेरफार प्रणाली मध्ये कृषक जमिनीचे 7/12 चे एकक हे. आर. चौ. मी. मध्ये व अकृषक जमिनीचे 7/12 चे एकक आर. चौ. मी. निश्चित केल्याप्रमाणे व
तसेच शेती व बिगर शेतीचे 7/12 स्वतंत्र केल्याचे कार्यवाही केल्यानंतर तयार होणारे 7/12 चे क्षेत्र व एकक योग्य रित्या रूपांतरीत न केल्याने अनेक त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. त्या समाजने सोपे जावे म्हणून तलाठी लॉगीन ला ई इरफार खालील अहवाल दिले अआहेत
कोणत्या स.नं. मध्ये अवास्तव क्षेत्र वाढ किंवा घट झाली आहे. हे ठरविण्यासाठी DBA लॉगीनला क्षेत्रनिहाय स.नं. चा अहवाल उपलब्ध करून दिला आहे. त्याप्रमाणे DBA यांनी गाव निहाय अवास्तव वाढ किंवा घट झालेल्या स.नं. ची यादी काढून तलाठी यांनी त्यांना विचारणा करावी.
सर्व तलाठी यांच्या लॉगीनला ई-फेरफार क्षेत्र अहवाल मध्ये खालील प्रमाणे 7 अहवाल देण्यात आले आहेत. ते अहवाल पाहून तलाठी यांनी स.नं. निहाय क्षेत्र व एकक दूरूस्तीकरणे अपेक्षित आहे.
1. कृषिक 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर आहे.- सर्वसाधारणपणे ५० हेक्टर पेक्षा मोठा ७/१२ असत नाही त्यामुलेकाही ७/१२ गावात आहेत का ते तलाठ्याने पाहावे .
2. कृषिक 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर .आर.चौ.मी. आहे.-- असे असताच कामा नये कारण कृषक ७/१२ चे एकक .आर.चौ.मी. आहे
3. बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक आर.चौ.मी. आहे.---- सर्वसाधारणपणे ५० आर पेक्षा मोठा बिनशेती ७/१२ असत नाही , त्यामुळे असे ७/१२ वरील क्षेत्र व एकक हस्तलिखित व संगणकीकृत ७/१२ पाहावेत
4. बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर .आर.चौ.मी. आहे.-----असे असताच कामा नये कारण अकृषक किंवा बिनशेती चा ७/१२ चे एकक .हे आर चो.मी आहे
5. बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 999 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर आहे.----असे असताच कामा नये कारण अकृषक किंवा बिनशेती चा ७/१२ चे एकक हेक्टर आहे
6. बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 999 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक आर.चौ.मी. आहे. शकतो ९९९ आर चा ७/१२ असत नाही तेथे एकक आर चौ मी असताना क्षेत्र चौरस मीटर मध्ये नमूद ९९९ असे नमूद केले असू शकते या ठिकाणी एकक प्रमाणे क्षेत्र दुरुस्त करावे
7. कृषिक व बिनशेती 7/12 ची यादी ज्यांचे क्षेत्र 50 पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक हेक्टर किंवा आर.चौ.मी. आहे.-
वरील अहवाल ७ मध्ये (कृषिक व बिनशेती ७/१२ ची यादी) या अहवाला मध्ये गावातील सर्व ७/१२ ची यादी आहे .प्रत्येक ७/१२ वर त्याचे एकक नमूद आहे . तलाठी यांनी या अहवालातील प्रत्येक ७/१२ समक्ष तपासून त्याचे एकक व क्षेत्र योग्य असल्याची खात्री करावी .
तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, DDE व DCR यांच्या लॉगीनला गाव निहाय अहवाल (Village Report) मध्ये क्षेत्र दुरूस्तीच्या अहवालाचा गोषवारा उपलब्ध करून दिला आहे.
सदरचे काम फक्त प्रमाणपत्र घेण्यासाठी नसून खरोखर अचूक करावे अन्यथा त्या प्रमाणपत्राचा काहीही उपयोग नाही . सर्व स.नं. आकारबंद प्रमाणे योग्य असल्याचे प्रमाणीत करावे.काम अचूकरीत्या पूर्ण झाल्याची खात्री तहसीलदार यांनी करूनच प्रमाणपत्र द्यावे
.
आपला
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
दिनांक १५.११.२०१८
जोपर्यंत या देशातील भ्रष्टाचार संपत नाही तोपर्यंत सामान्य लोकाना हे महुसूल अधिकारी फाडून खाणार. वरील माहिती जन सामान्य लोकांसाठी नसून ह्या लोकांनी जी झिरो कर्मचारी (operator) ही पैदास पैसे खाण्यासाठी निर्माण केली आहे. त्यांच्या साठी आहे.जय महाराष्ट्र . माझा अनुभव शेर केला आहे.
ReplyDelete