कुलमुखत्यारधारक, मान्यता देणार, इतर वारस व प्राधिकृत प्रतिनिधी यांचे वतीने केले जाणाऱ्या ऑनलाईन दस्त नोंदणीबाबत.
मार्गदर्शक
सूचना क्र.९१ रा.भू.अ.आ.का.4/रा.स./ ९१/२०१8
जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमी
अभिलेख (म. राज्य ) ,पुणे
दि २९.१२.२०१८
प्रति,
सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
(सर्व)
विषय :- कुलमुखत्यारधारक, मान्यता देणार,
इतर वारस
व प्राधिकृत प्रतिनिधी
योंचे वतीने केले जाणाऱ्या
ऑनलाईन दस्त नोंदणीबाबत.
सध्या संपुर्ण राज्यात जमीनिशी संबंधीत दस्त नोंदणी करताना i-SARITA व ई-फेरफार प्रणालीशी लिंकेज वापरुन ऑनलाईन पध्दतीने केली जाते. त्यासाठी दस्त करुन देणार व यांची नांवे ई-फेरफार प्रणालीतुन 7/12 च्या डाटाबेस मधुन घेतली जातात व दस्त नोंदणी झाल्यानंतर दस्ताची माहिती सूचना क्रमांक २ सह संबंधित तलाठी यांचेकडे ऑनलाईन पध्दतीने पाठविली जाते. तथापि कुलमुखत्यारधारक, मान्यता देणार, इतर वारस व प्राधिकृत प्रतिनिधी यांचे वतीने करुन देण्यात येणारे दस्त अथवा करुन घेण्यात येणारे दस्त यांनी नोंदणी ( Deta Entry) योग्य पध्दतीने होत नसल्याने ई-फेरफार प्रणालीमध्ये मोठया प्रमाणात अडचणी येत आहेत.
मुखत्यारपत्राच्या आधारे व शासनाच्या वतीने खरेदी विक्री दस्त नोंदविताना घ्यावयाची दक्षता खालीलप्रमाणे :-
दुय्यम निबंधक कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने दस्त नोंदणी करताना मुखत्यारपत्राच्या आधारे होणारे व्यवहार शासनाच्या वतीने अथवा महामंडळाच्या वतीने होणारे व्यवहार इतर हक्कात दाखल असलेल्या इतर वारसांच्या नांवे होणारे व्यवहार व 7/12 वर नांवे नसतांना अशा खातेदारांच्या नांवे होणारे व्यवहार ( सहधारक ) प्राधिकृत प्रतिनिधी यांचेद्वारे होणारे व्यवहार याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने
चुकीच्या पध्दतीने दस्तनोंदणी झाल्यास त्याचा योग्य तो परिणाम
ई-फेरफार प्रणालीतुन 7/12 वर होवु
शकत नाही. याबाबत दुय्यम निबंधक यांना खलीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
दस्त करुन देणार म्हणुन फक्त 7/12 च्या भोगवटादार सदरी असलेल्या व्यक्तीचे नांव घ्यावे. इतर हक्कातील इतर वारस, कुलुखत्यारधारक,
7/12 वर नसलेले इतर सहधारक ( जसे सज्ञान मुले, मुली,
पत्नी इ.) व शासनाच्या वतीने अथवा शासनाच्या महामंडळाच्या वतीने , सहकारी संस्थेच्या वतीने , नोंदणीकृत फर्म
च्या वतीने अथवा धर्मादाय संस्थेच्या वतीने दस्त करणाऱ्या व्यतीचे नांव, कुलमुखत्यारधारक ( Power of Attorny Holders ) अथवा मान्यता
देणारा ( Consenter), प्राधिकृत अधिकारी ( Authorized
Signatory ) यापैकी योग्य पर्याय वापरुन i-SARITA प्रणालीतुन दस्त नोंदणी करावी. उदा . समृध्दी महामार्गासाठी
(राष्ट्रीय महामार्ग ) होणारी खरेदी इ. ज्या
संस्थेचे / महामंडळाचे नांव अधिकार अभिलेखामध्ये
(7/12) दाखल होणे आवश्यक आहे त्याच संस्था/महामंडळाचे नांव खरेदी करुन घेणार आहेत म्हणुन नोंदविण्यातयावे व प्राधिकृत प्रतिनिधी ( जसे कार्यकारी
अभियंता ) यांचे नांव प्राधिकृत प्रतिनिधी
( Aithorised Signatory) म्हणुन घ्यावे. दुय्यम
निबंधक कार्यालयात आंय सरिता प्रणाली मध्ये दस्त नोंदणी करताना Select Party Type च्या समोर दोन पर्याय देणेत आले आहेत . पहिल्या
पर्यायामध्ये लिहून देणार / लिहून घेणार पैकी एक निवडून पुढील पर्यायामध्ये
कुलमुखत्यार धारक ( Power of Attorney) मान्यता देणार ( Consenter) व प्राधिकृत
प्रतिनिधी ( Authorised Signatory) या पैकी योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे.
वरीलप्रमाणे योग्य पध्दतीने दस्त नोंदणी केल्यास दस्त करुन देणार यांचे नावासह संमती देणार/मान्यता देणार/कुलमुखत्यारधारक/ प्राधिकृत प्रतिनिधी यांचे नांव फेरफार रजिष्टर मध्ये येईल मात्र 7/12 मध्ये येणार नाही अशी सुविधा i-SARITA प्रणाली व ई-फेरफार प्रणालीमध्ये केली आहे. तरी याप्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता दस्त नोंदणी करतानां दुय्यम निबंधक यांची घ्यावी व फेरफार तयार करुन मंजूर करताना तलाठी मंडळ अधिकारी यांनी घ्यावी.
सदरच्या सुचना सर्व दुय्यम निबंधक, तलाठी, मंडळ अधिकारी
यांचेसह तहसिलदार यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती.
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त
कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत- १. मा. नोंदणी महानिरीक्षक,
महाराष्ट्र राज्य,पुणे
2. उपनोंदणी महानिरीक्षक,
3. उपजिल्हाधिकारी तथा डि.डि.ई. (सर्व)
4. तहसिलदार ( सर्व)
5. दुय्यम निबधंक (सर्व)
आपण i sarita प्रणाली मधे वरीलप्रमाणे डाटा ऐंट्री करुन दस्त नोंदणी केल्यास तलाठी नोंद घेत नाही.
ReplyDeleteआपण i sarita प्रणाली मधे वरीलप्रमाणे डाटा ऐंट्री करुन दस्त नोंदणी केल्यास तलाठी नोंद घेत नाही.
ReplyDeleteगहाणखताचा दस्त आहे त्यात स्वतंत्र खाते दार आहेत एल आर ला each property should contain atleast one seller party असा मेसेज येतो कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteआदरणीय सर,
ReplyDeleteनमस्कार,
माझ्या 7/12 मध्ये माझ्या बहिणीची नावे इतर हक्कात आहेत परंतु बहीण नीची death झालेली आहेत तर सदर नावे कशी कमी करता येतील.
बहिणीच्या वारसांची नावे लावून घ्यावीत आणि त्यांच्या हक्कसोडपत्र रजिस्टर करून घ्यावे.
ReplyDelete