दुय्यम निबंधक यांचे कडून ऑनलाईन दस्त नोंदणी करताना होणाऱ्या संभाव्य चुका बाबत
विषय- दुय्यम निबंधक यांचे कडून ऑनलाईन दस्त नोंदणी करताना होणाऱ्या संभाव्य चुका बाबत
संदर्भ- मा.नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक) महाराष्ट्र राज्य
यांजकडील राज्यातील सर्व SRO
यांना दिलेले पत्र
क्र.का.3/दस्त नोंदणी/389/18 दि.05.10.2018 मधील सूचना...
महोदय,
दुय्यम निबंधक यांचे कडून याबाबत दस्त नोंदवत असताना आवश्यक ती
खबरदारी घेतलेली दिसून येत नाही. सदर दस्तामध्ये सात बारावरील सर्व खातेदार खरेदीखतासाठी
उपस्थित असताना देखील अविभाज्य
हिश्याची पूर्णत: विक्री हा चुकीचे आर्टिकल निवडले जाते .याबाबत दस्त
नोंदवत असताना आवश्यक ती खबरदारी घेतलेली दिसून येत नाही.सबब यामुळे तलाठी स्तरावर
अनेक दस्त प्रलबिंत राहत आहेत व योग्य अंमल होत नसल्याने मंडळ अधिकारी यांना नोंद
नामंजुर करुन पुन्हा तलाठी स्तरावर नोंद टाकण्याचे कामकाज करावे लागते यामुळे
प्रशासकीय वेळेचा अपव्यय होत आहे.
दस्त नोंदणी करताना काय दक्षता घ्यावी ?---
1. * सदर खरेदीखताचा दस्त
नोंदवत असताना सात बारा वरील सर्व खातेदार उपस्थित असताना
केवळ खरेदी हेच टेम्पलेट निवडण्यात
यावे.
2. * सदर खरेदीखताचा दस्त
नोंदवत असताना जर सात बारा वरील उदा. 5 पैकी 3
जण खरेदी देत असतील व 2 जण मान्यता देत असतील तर अशी दस्त देखील खरेदी हे आर्टिकल निवडण्यात यावे .
3. * सात बारा वरील खरेदीखत करुन देण्यासाठी सर्व खातेदार उपस्थित नसतील व त्यांना
त्यांचा मालकी क्षेत्रापैकी पूर्णत: अविभाज्य क्षेत्र
विक्री करण्याचे असल्यास तेव्हाच अविभाज्य हिश्याची पूर्णत: विक्री हे आर्टिकल निवडण्यात यावे
4. * सात बारा वरील खरेदीखत करुन देण्यासाठी सर्व खातेदार उपस्थित नसतील व त्यांना त्यांचा मालकी क्षेत्रापैकी अशंत:
अविभाज्य क्षेत्र विक्री करण्याचे असल्यास
तेव्हाच अविभाज्य हिश्याची अशंत: विक्री हा आर्टिकल निवडण्यात यावे
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसामाईक खातेदारांपैकी सदर खरेदीखताचा दस्त नोंदवत असताना जर सात बारा वरील उदा. ४ पैकी १ जण खरेदी देत असेल व ३ जणाची मान्यता देत नसतिल तर असा दस्त हाेउ शकताे का? जमीन क्षेत्र २ गुंठे आहे
ReplyDelete