रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

कलम 155 प्रमाणे खाता दुरुस्तीची सुविधा देणेबाबत. दि. १६.११.२०१८

मार्गदर्शक सूचना क्रमांक - 78. रा.भू.अ.आ.का/रा.स./कावि/78/२०१8 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय दिनांक:- १६.११.२०१८ प्रति, उपजिल्हाधिकारी तथा डि.डि.ई. (सर्व.) विषय :- कलम 155 प्रमाणे दुरुस्तीच्या सुविधा. खाता दुरुस्तीची सुविधा देणेबाबत. संदर्भ :- या कार्यालयाचे पत्र क्र.रा.भू.अ.आ.का.4/कलम 155 नुसार दुरुस्ती/2018 दिनांक 10/10/2018. महोदय, कृपया संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे. संगणकीकृत 7/12 व ८ अ अचूक होण्यासाठी त्रुटीमुक्त असणे आवश्यक आहे. कोणत्याही गांवात घोषणापत्र-३ झाल्यानंतर पुन्हा एडिट/ ओडीयु सारख्या सुविधा वापरता येत नाहीत. त्यासाठी संदर्भीय पत्रात नमुद केल्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये दुरुस्तीच्या नऊ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तथापि त्यातील अनुक्रमांक १ ची सुविधा आदेशाने खात्यात दुरुस्ती सुविधा स्वतंत्र मॉडयुल स्वरुपात देण्यात आली आहे. सदरची सुविधा तलाठी यांना आपल्या जिल्हयाच्या नियमित आय.पी. अड्रेस नंतर / khata-durusti असे नमुद केलेल्या लिंकवर स्वतंत्र मॉडयुल स्वरुपात दिनांक 03/11/2018 पासुन उपलब्ध करुन दिली आहे. त्यामध्ये एडिट मॉडयुल प्रमाणे खात्यात दुरुस्ती साठी खालील सुविधा उपलब्ध आहेत. 1. नविन नांवे समाविष्ट करणे. 2. नांवे काढणे. 3. नावांचे स्पेलिंग दुरुस्ती करणे. 4. खाता प्रकार बदलणे. 5. 7/12 व खाता रजिष्टर मधील नावांचा फरक दुरुस्त करणे. 6. खाता क्रमांक निवडक सर्व्हे क्रमांकावरुन वगळणे. या पैकी अनु . क्र. १ ते ५ चा अंमल त्या खात्यातील सर्व सर्वे नंबर ला होईल मात्र अनु. ६ प्रमाणे खाते ज्या गटावरून वागले असेल त्याचा अंमल फक्त त्या सर्वे वर होईल . ह्याची निंद घ्यावी सदरची सुविधा तलाठयाला जिल्हयाचा IP/khata-durusti या लिंकवर मिळेल. खाता दुरुस्ती या मॉडयुलच्या मेनुमध्ये - १. 7/12 पाहुन खाता दुरुस्ती. २. खाता दुरुस्ती काम संपल्याची घोषणा करणे. ३. तहसिलदार यांचा दुरुस्त्या मान्यतेचा आदेश व परिशिष्ट-क क्रमांक तयार करणे. ४. फेरफार क्रमांक तयार करणे. अशा सुविधा आहेत. कोणत्याही सर्व्हे नंबरवरील खात्याशी संबंधित सर्व दुरुस्त्या पुर्ण झालेनंतर गरज असल्यास त्या खात्याशी संबंधित अन्य सर्व्हेनंबर वरील दुरुस्त्या पुर्ण कराव्यात व त्यानंतर सर्व खात्याची दुरुस्ती प्रक्रिया पुर्ण झाली हा option वापरावा. खाते समाविष्ट करण्यापुर्वी अशी खाती ई-फेरफार प्रणालीतील मेनू मधुन नविन खाते तयार करणे या पर्यायातुन तयार करुन ठेवावीत. त्यानंतर खाता दुरुस्ती काम संपल्याची घोषणा करावी मात्र हे करत असताना जर त्या खात्याशी संबंधित काही सर्व्हे नंबर वर खाता दुरुस्तीचे काम केले नसल्यास तेथे अशा सर्व्हे नंबरची यादी दाखवून लाल अक्षरामध्ये “ खाता दुरुस्तीचे काम संपल्याची घोषणा करण्यासाठी खालील दर्शविलेल्या खाता क्रमांकावर असलेले सर्व्हे नंबर खाता दुरुस्तीसाठी निवडुन त्या संबंधीत सर्व्हे नंबरवरील योग्य त्या दुरुस्त्या करुन केलले काम साठविणे आवश्यक आहे. ” असा मेसेज येईल. सर्वे निहाय केलेल्या दुस्त्या फक्त त्या सर्वे क्रमांकावर होतील मात्र खाता दुरुस्ती तील अनु १ ते ५ च्या दुरुस्त्या खात्यातील सर्व सर्वे नंबर वर होतील ह्याची नोंद घ्यावी . त्यानंतर “ तहसिलदारांचा दुरुस्त्या मान्यतेचा आदेश व परिशिष्ट-क ” तयार करणे हा पर्याय वापरुन परिशिष्ट-क तयार करावे व त्याच्या दोन प्रती प्रिंट आऊट काढुन तहसिलदार यांची ऑनलाईन मान्यता (Biometric Login) घ्यावी व परिशिष्ट-क चा आदेश स्वाक्षरीत करुन ( पहिले पान व परिशिष्ट-क चे शेवटचे पानावर सही घ्यावी ) त्याची एक प्रत मंडळ अधिकारी यांना फेरफार प्रमाणित करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी. तहसिलदार मान्यता व मंडळ अधिकारी यांचे फेरफार प्रमाणीकरणाचे काम ई-फेरफार प्रणालीतुन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्य दुरुस्ती सुविधाप्रमाणे आहे. या खाता दुरुस्ती पर्यायांची योग्य माहिती तलाठी यांना करुन द्यावी. विशेषत: URL समजुन सांगावी तरच दुरुस्तीचे काम करता येईल याची नोंद घ्यावी. उदा . रायगड जिल्ह्यासाठी https://10.187.202.74/khata_durusti सोबत खाता दुरुस्ती प्रक्रियेचे User Manual जोडले आहे. अन्य महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 च्या दुरुस्ती या सुविधाप्रमाणे MIS मधुन पाहता येईल. सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती. आपला विश्वासू, ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे. प्रत:- उप आयुक्त (महसूल) , विभागीय आयुक्त कार्यालय . (सर्व.) उप विभागीय अधिकारी (सर्व.) यांना माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी.

Comments

  1. Sir,

    खाता दुरुस्ती (khata_durusti) वापरताना runtime error येतो आहे.

    ReplyDelete
  2. मंडळ अधिकारी यांना सही साठी पैसे घेतात का?

    ReplyDelete
  3. कलम 155 नुसार दुरूस्ती साठी कोठे अक्षरे करावा

    ReplyDelete
    Replies
    1. काय उपयोग होत नाही पैसे दिले तरच काम होते तलाठी यांच्या पासून जिल्हाधिकारी पर्यत पैसे घेतात.

      Delete
  4. मी अर्ज करून एक महिने होऊन गेले जवलपास 20 हेलपाटे झाले कोन दखल घेइना

    ReplyDelete
  5. खाता दुरुस्तीचा अर्ज तलाठी यांचेकडे दिलेनंतर त्यांनी किती दिवसात कार्यवाही करणे बंधनकारक आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. पैसे दिले तर लगेच होईल अन्यथा होणार नाही माझा अनुभव आहे.

      Delete
  6. चुक दुरुस्ती जर खुप जुनी असेल तर हीच पंधत आहे का?

    ReplyDelete
  7. 7/12 सदरी इतर अधिकारातील माझे आई चे नावात दुरुस्ती साठी अर्ज दिला आहे. किती कालावधीत दुरुस्ती होईल. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. जोपर्यंत या देशातील भ्रष्टाचार संपत नाही तोपर्यंत सामान्य लोकाना हे महुसूल अधिकारी फाडून खाणार. वरील माहिती जन सामान्य लोकांसाठी नसून ह्या लोकांनी जी झिरो कर्मचारी (operator) ही पैदास पैसे खाण्यासाठी निर्माण केली आहे. त्यांच्या साठी आहे.जय महाराष्ट्र . माझा अनुभव शेर केला आहे.

      Delete
  8. 7/12 चुक दुरस्ती अर्ज तहसिलदार कचेरीत दिल्यनंतर किती दिवसात कार्यवाही सुरू करतात .

    ReplyDelete
  9. ७/१२ माझ्या नावांवर आळा घालण्यासाठी मी ०३ महीन्यापासुन तहसील कार्यालय चक्कर मारतो, कृपया उपाय सुचवावे.

    ReplyDelete
  10. साहेब आमचा ७/१२ चुकला आहे १९७३ साली वडीलांना दोन बायका होत एकीला तीन मुले दुसरीला दोन मुले वाटप होताना एक जमीन तीन भाऊ तीन एकर दोन भाऊ दीड एकर असे वाटप झाले पण ७/१२ तयार होतानासमान तयार झाला पुढे दोन भावानी ४५-५ आर जमीन विकली दीड एकर वाल्यानी त्यांची शिल्लक १४-५राहीली तीन एकर वाले वाटप करताना५३-५ आर व ३२-आर असे वाटप झाले पण नंतर समजले तीन एकर आहे तीसरा भाऊ ७/१२ चुकीमुळे वंचीत राहीला आहे १५५ कलमाने तीसरा भाऊ तहसिलदार यांचे कडे७/१२ दुरूस्ती करून जमीन मिळ ऊ शकतो का मोठा भाऊ ए.कू मँ आहे हे लक्षात

    ReplyDelete
  11. Sir, amcha jaminche dubar kami jast Patrik zail ahi mi Shrigonda tahsil la 20/10/2020 la araj dila ahi Pan ajun parynt kontich action zail nhi mi Kay karu. 9422914712 my number my name Pandurang Vyavahare, Rajapur Shrigonda Nager

    ReplyDelete
  12. जागेची आकृती दुरुस्ती साठी काय करावे लागेल

    ReplyDelete
  13. आकृती दुरुस्ती साठी काय करावे लागेल

    ReplyDelete
  14. 7/12 मध्ये सामाईक घरपड ही नोंद दिसत नाही 155 कलमाखाली तलाठी करत नसतील तर काय करावे

    ReplyDelete
  15. प्रति,
    मा. श्री रामदास जगताप सर,
    पुणे उपजिल्हाधिकारी
    इ महाभूमी , जि .पुणे.
    विषय : संगणीकृत ७/१२ मिळणेबाबत,
    अर्जदार - श्री सचिन बळीराम पाटील , थेरगाव, पुणे-९९२३४८९३४५
    मा. महोदय,
    मी अर्जदार श्री. सचिन बळीराम पाटील रा. थेरगाव ता. मुळशी, जि. पुणे. माझी मौजे थेरगाव ता. मुळशी येथील स. नं .-१३/५ क्षेत्र पैकी ००हे ०१.५ आर. माझ्या या जागेचा ७/१२ संगणीकृत करताना नाव वगळल्याचे ३ वर्षांपूर्वी आढळले होते. त्यासाठी तलाठी कार्यालय थेरगाव व पौड मुळशी तहसील कार्यालय यांच्याकडे गेले ३ वर्ष वारंवार संपर्क,५-७ वेळा लेखी अर्ज व असंख्य फेऱ्या केलेल्या असून त्यांच्याकडून अजूनही ७/१२ मिळालेला नाही. आमचे काम झालेले नाही. त्यासाठी आम्ही वेळोवेळी भरपूर अर्ज केले परंतु त्या अर्जाला अद्यापही आम्हाला कोणतेही ठोस उत्तर न मिळता उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत. या कामासाठी आम्ही माहितीच्या अधिकाराखाली सुद्धा ५-७ वेळा अर्ज केले असून त्यांच्या कडूनही अद्याप कोणतेच उत्तर आम्हाला मिळाले नाही. तलाठी कार्यालय थेरगाव व पौड मुळशी तहसील कार्यालय एकमेकांकडे आम्हाला फक्त फिरवत आहेत. या ३ वर्षांमध्ये आमची काहीही चूक नसताना आमची आर्थिक, शारीरिक व मानसिक अशी न भरणारी हानी झालेली आहे.आपणच यात आम्हाला मदत करून आम्हाला ७/१२ मिळवून द्याल हि शेवटची आशा आम्हाला आहे. तरी या प्रलंबित विषयाचा योग्य तो निकाल त्वरित द्यावा व यासंबंधी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे हि कळकळीची विनंती.
    माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाची माहिती पुढीलप्रमाणे-
    RTI अर्ज - दि.१४-०१-२१ तहसील कार्यालय, पुणे. PUCLO /R/२०२१/६०००७
    १. RTI अर्ज - दि. १४-०१-२१ जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. PUCLO /R/२०२१/६००३२
    २. RTI अर्ज - दि.०३-०३-२१ जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. PUCLO /R/२०२१/६०१८६
    ३ RTI अर्ज - दि. २७-०५-२१ तहसील कार्यालय, पुणे. PUCLO /R/२०२१/६०४६५
    ४. RTI अर्ज - दि २१-०६-२१ तहसील कार्यालय, पुणे. PUTLO /R/२०२१/६०१३३
    ५. RTI अर्ज - दि ०३-१२-२१ तहसील कार्यालय, पुणे PUCLO/R/2021/01347
    ६. RTI अर्ज - दि ०७-१२-२१ तहसील कार्यालय, पुणे PUCLO /R /2021/ 01365
    आपला विश्वासू,
    श्री. सचिन बळीराम पाटील
    (९९२३४८९३४५)

    ReplyDelete
  16. जोपर्यंत या देशातील भ्रष्टाचार संपत नाही तोपर्यंत सामान्य लोकाना हे महुसूल अधिकारी फाडून खाणार. वरील माहिती जन सामान्य लोकांसाठी नसून ह्या लोकांनी जी झिरो कर्मचारी (operator) ही पैदास पैसे खाण्यासाठी निर्माण केली आहे. त्यांच्या साठी आहे.जय महाराष्ट्र . माझा अनुभव शेर केला आहे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send