आपली चावडी – गावचा डिजिटल नोटीस बोर्ड - महसूल विभागाची पारदर्शक सुविधा
आपली चावडी – गावचा डिजिटल नोटीस
बोर्ड - महसूल ची पारदर्शक कामकाजासाठी सुविधा
नागरिकांसाठी आपली चावडी ही एक अत्यंत उपयुक्त प्रणाली ई महाभूमी पोर्टलवर महसूल विभागाकडून उपलब्ध करून दिली
आहे . चावडी म्हणजेच तलाठी कार्यालय आणि या तलाठी कार्यालयात शासनचा गाव पातळीवरील
अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या तलाठी स्थरावर अनेक महत्वाची कामे सुरु असतात त्याची
माहिती त्या गावातील नागरिकांना व्हावी म्हणून तेथे एक नोटीस बोर्ड लावलेला असतो.
परंतु कालानुरूप बदल झाल्याने महसूल विभागाने देखील तलाठी कार्यालयातील (चावडी) चा
नोटीस बोर्ड डिजिटल स्वरूपात ऑनलाईन प्रशिद्ध केला आहे त्यालाच आपण आपली चावडी
म्हणतो.
महसूल प्रशासनात ग्राम पातळीवर पारदर्शकता
आणणारी आपली चावडी महाभूमी पोर्टलवर https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi
या लिंकवर उपलब्ध असून हे संकेतस्थळ म्हणजेच
राज्यातील सुमारे ४४,००० गावांसाठी स्वताचे स्वतंत्र संकेतस्थळ असल्यासारखे आहे. या
द्वारे राज्यातील सर्व गावातील स्थानिक स्थरावर महसूल प्रशासना मध्ये सुरु असलेले
कामकाज स्वताहून सामान्य नागरिकांसाठी प्रशिद्ध केले जाते. या मध्ये सध्या तलाठी
कार्यालयात प्रलंबित असलेल्या (मंडळ अधिकारी यांनी निर्णय न घेतलेल्या) फेरफार
नोंदीची माहिती, प्रत्येक फेरफारासाठी काढलेली नमुना ९ च्या नोटीस ची प्रत
प्रशिद्ध केली जाते तसेच कोणताही फेरफार नोंदविल्याची तारीख, त्यावर नोटीस काढली
आहे का ? कोणाची हरकत आली आहे का ? फेरफार निर्गत झाला आहे का ? त्यावर कोणी हरकत
किंवा तक्रार दाखल केली आहे का ? आणि फेरेफार निर्गत (मंजूर / नामंजूर) झाला आहे
का ? ही माहिती उपलब्ध असते तसेच
त्यागावातील जमीन मोजणीची प्रक्रिया सुरु असलेल्या ई-मोजणी प्रणालीतील मोजणी
प्रकरणाचा तपशील दर्शविला जाणारी मोजणीची नोटीस देखील प्रशिद्ध केली जाते.
फेरफार
च्या नमुना ९ च्या नोटीसमध्ये फेरफाराचा
संपूर्ण तपशील, जसा कि जमीन खरेदी देणार घेणार यांची नावे, खरेदी क्षेत्र, त्या
व्यवहाराची किंमत, नोंदणीकृत दस्ताचा क्रमांक, वारस नोंदी च्या बाबतीत मयत
व्यक्तीचा व त्याचे वारसांचा संपूर्ण तपशील दर्शविला असतो.
जमीन मोजणीच्या नोटीसमध्ये मोजणी चा
प्रकार( साधी, तातडीची, अति तातडीची, अति अति तातडीची), अर्जदाराचा नाव व पत्ता, लगत
कब्जेदारांचे अथवा सहहिस्सेदारांचा तपशील, मोजणीचा दिनांक, मोजणीदाराचे नाव आणि
मोजणीदाराचा मोबाईल नंबर देखील नमूद केलेला असतो. ही सर्व माहिती ई-फेरफार व ई-मोजणी प्रणालीतून (सिस्टीम
मधून) त्या त्या क्षणाला आपोआप प्रशिद्ध
होत असल्याने त्यात काही किंवा कोणतीही माहिती कोणालाही लपवून ठेवता येत नाही त्यामुळे आपली
चावडी द्वारे महसूल विभागाच्या ग्राम पातळीवरील कामकाजामध्ये पारदर्शकता आणि गतिमानता
आली आहे हे मात्र नक्की.
आपली चावडी प्रणाली अव्याहतपणे
नियमित चोवीस तास सुरु असल्यामुळे तलाठी कार्यालय बंद असताना किंवा सुट्टीच्या
दिवशी देखील ही संपूर्ण माहिती सामान्य खातेदाराला उपलब्ध होत आहे. तसेच नोकरी व्यवसायामुळे आपल्या गावापासून दूर
शहरात किंवा परदेशात असणाऱ्या गावातील नागरिकांना ही माहिती जगभरात कोठूनही
केंव्हाही उपलब्ध होत असल्याने आपली चावडी अल्पावधीतच जनसामान्यांच्या पसंतीला
उतरली आहे. गेल्या तीन वर्षापासून आपली चावडीचा उपयोग राज्यातील लाखो सामान्य
नागरिक दररोज करत आहेत. आज अखेर सुमारे १८
कोटी वेळा आपली चावडी पाहिली गेली आहे. या प्रणालीचा भविष्यात अजून चांगल्या
गोष्टी किंवा महत्वाच्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला जावू शकतो.
रामदास
जगताप
उप
जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई
फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय . पुणे
दिनांक
२५.१२.२०२०
7/12 उतरतील खातेदाराच्या नावाला कंस झाला असेल आणि फेरफार नं नसेल तर काय करावे
ReplyDelete