डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारा डाऊनलोड साठी आता बँक ऑफ बडोदाचे आणखी एक पेमेंट गेटवे उपलब्ध करून दिल्या बाबत
नमस्कार मित्रांनो,
विषय –डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारा डाऊनलोड
साठी आता बँक ऑफ बडोदाचे आणखी एक पेमेंट गेटवे
उपलब्ध करून दिल्या बाबत
महसूल
विभागाच्या अत्यंत महत्वकांक्षी ई फेरफार प्रकापातील डिजिटल स्वाक्षरीत जमीनीचे
अधिकार अभिलेख राज्यातील सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होण्यासाठी तयार केलेल्या
महाभूमी पोर्टलवर आता स्टेब बँक ऑफ इंडिया सोबतच बँक ऑफ बडोदाचे आणखी एक पेमेंट गेटवे उपलब्ध
करून दिला आहे त्यामुळे कोणत्याही सामान्य माणसाला एक पेमेंट गेटवे निवडण्याचे स्वातंत्र्य असेल या
दोन्ही पेमेंट गेटवे वरून डेबिट कार्ड , क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग, IMPS , UPI ,
भीम app द्वारे आपले महाभूमिचे खाते रिचार्ज करता येईल. या नवीन सुविधे मुळे तसेच OTP
वापरून नोंदणीमुळे महाभूमी पोर्टल वरील
वापरकर्ते याना अत्यंत सोप्या पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे
उपलब्ध होवू लागले आहेत.
सध्या दररोज
सुमारे ३० ते ३५ हजार डिजिटल स्वाक्षरीत
सातबारा व खाते उतारे डाऊनलोड करून सामान्य नागरिक वापरू लागले आहेत तसेच शासनाने
हे सर्व डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य राहतील
असे जाहीर केले असल्याने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतार्यांची मागणी
वाढलेली दिसते. त्यामुळे सामान्य माणसाच्या वेळ श्रम व पैश्याची मोठ्या प्रमाणात
बचत होत आहे. आता फक्त १५ रुपये भरून राज्यातील कोणताही ७/१२ आपण डाऊनलोड करू
शकता. ( सध्या राज्यातील २ कोटी ५३ लक्ष ७/१२ पैकी २ कोटी ५१ लक्ष ७/१२ डिजिटल
स्वाक्षरीत झाले असून त्यासाठी महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी यांचे सह सर्वच
महसूल अधिकारी यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले आहेत म्हणूनच हे शक्य झाले आहे हे
देखील तेव्हडेच खरे.
महसूल विभागाच्या या 24 तास ऑनलाईन सुविधेसाठी लॉगीन करा
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR
आपला
रामदास जगताप
दिनांक २५.१२.२०२०
Comments