रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

बाय बाय २०२० – वेलकम २०२१ अर्थात सन २०२० चा लेखाजोखा

 

नमस्कार मित्रांनो ,

विषय – बाय बाय २०२० – वेलकम २०२१  अर्थात सन २०२० चा लेखाजोखा

                    ई फेरफार प्रकल्पासाठी सन २०२० मधील कामकाज , प्रणालीत केलेल्या सुधारणा / सुविधा , अचूक सातबारा साठी चे प्रयत्न ,समान्य नागरिक यांना दिलेल्या ऑनलाईन सुविधा, डिजिटल सातबारा बरोबरच डिजिटल खाते उतार्यांचे वितरण आणि डिजिटल सातबारा अन्य विभाग व बँकांना ऑनलाईन पद्धतीने वेब पोर्टल किंवा वेब सर्व्हिस द्वारे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांसाठी अत्यंत महत्वाचे वर्ष होते त्याचा थोडक्यात लेखाजोखा ........

                महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे नवनियुक्त महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब आणि महसूल राज्य मंत्री मा.ना. अब्दुल सत्तर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आणि महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा.डॉ. नितीन करीर साहेब यांचे निर्देशाप्रमाणे ई फेरफार प्रकल्पाचा विस्तार वाढविण्यासाठी आणि सर्व ऑनलाईन सेवा अत्यंत सुलभ पद्धतीने सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

              महसूल विभ्गाच्या ऑनलाईन सुविधा - सामान्य जनतेपर्यंत व शासना पर्यंत पोहोचविण्यासाठी मी स्वतः दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर कृषी दर्शन या फोन इन लाइव्ह कार्यक्रमामध्ये सहभागी होवून , स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (SLBC) च्या बैठकांना हजार राहून तसेच सर्व सोशल मेडिया , वर्तमानपत्र , अग्रोवन फेसबुक लाइव्ह  , शेकरू TV लाइव्ह , पुणे 24 तास लाइव्ह या सारख्या माध्यमांचा वापर करून डिजिटल सातबाराचा हा प्रकल्प जनते पर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.  अभिलेख वितरण प्रणाली मधील वितरीत अभिलेखांची नक्कल फी VAN – VERTUAL ACCOUNT NUMBER च्या माध्यमातून जमाबंदी आयुक्त कार्यालयात जमाकारून घेण्याचा अत्यंत नवा आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला तसेच त्याचे ऑनलाईन ताळमेळ पत्रक विकसित करणेत आले, तसेच तलाठी DDM चलनसाठी बँक ऑफ बडोदाच्या नवीन पेमेंट गेटवे चा वापर करून तलाठी यांना चं ऑनलाईन भरण्याची सुविधा विकसित केली त्यामुळे ऑनलाईन पडताळणी अहवाल शक्य झाला आहे.

G2B- बँकिंग पोर्टल – ई फेरफार प्रणालीतील डिजिटल सातबारा सामान्य जनतेच्या कर्ज मंजुरी प्रकरणासाठी बँकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी २६ बँका सोबत सामंजस्य करार करून त्या बँकांना डिजिटल सातबारा , डिजिटल खाते उतारे व फेरफार उपलब्ध करून देण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बँक , बँक ऑफ महाराष्ट्र सारख्या काही बॅंका या सुविध अनेक बँक श्खांमध्ये अत्यंत सुलभ पद्धतीने वापरत आहेत.

शासकीय योजनांसाठी डिजिटल सातबारा – केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री पीक विमा योजना (PMFBY) सख्या अत्यंत महत्वाच्या योजनेसाठी रब्बी २०१९-२० पासून डिजिटल सातबारा संलग्न करण्यात आला या योजनेसाठी रब्बी २०१९-२० साठी सुमारे १५ लक्ष डिजिटल सातबारा आणि खरीप २०२० हंगामासाठी १ कोटी पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे ऑनलाईन पद्धतीने सर्वर ते सर्वर शेअर केले तसेच केंद्रशासनाच्या आधारभूत किंमतीवर  धान खरेदीसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाशी आणि आधारभूत किंमतीवर  कापूस खरेदीसाठी कॉटन कार्पोरेशन सोबत करार करून त्यांनाही सातबारा शेअर केल्याने शासनाची करोडो रुपयांची बचत झाली असे बोलले जाते.  

विसंगत सतबाराची संख्या निरंक करणे – ई फेरफार प्रकल्पाचा आत्मा असलेल्या अचूक डेटाबेस साठी odc अहवाल १ ते ४५ पैकी अत्यावश्यक २६ आहवाल  निरंक करून विसंगत सातबाराची संख्या शून्य करण्याच्या कामामध्ये मात्र किविड १९ आणि लॉकडाऊन मुळे पाहिजे तेव्हडे काम्होवू शकले नाही मात्र तरीही तरी सुमारे तीन लक्ष सात बारा तील त्रुटी दूर करून आता हे काम अंतिम टप्प्यावर आहे. मात्र कोविड १९ च्या कालावधीत ई फेरफार सह अन्य सर्वच प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करून सर्व टीम ई फेरफार ने वर्क फ्रॉम होम यशस्वी करून दाखवले म्हणूनच या कालावधीतच दररोज दीड दोन हजार डाऊनलोड होणारे डिजिटल सातबारा ची संख्या ३० ते ३५  हजारावर गेली तसेच महसूल दिन २०२० ( १ ऑगस्ट) पासून राज्याचे महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब  यांचे शुभ हस्ते डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे देखील राज्यातील जनतेला ऑनलाईन वितरणाचा शुभारंभ केला.

 

सन २०२० मधील काही वैशिष्ट्ये –

१.       ९९ % सातबारा झाले डिजिटल स्वाक्षरीत

२.      ९८% सातबारा झाले अचूक

३.       वर्षभरात सुमारे २५ लक्ष फेरफार झाले ऑनलाईन

४.      ई पीक पाहणी मध्ये ८ तालुक्यात सुमारे १.१० लक्ष हेक्टर क्षेत्रावर झाली ई पीक पाहणी

५.      पन्नास वर्षानंतर सत्बर नमुना झाला सुधारित

६.      ई चावडी प्रकल्पाच्या प्रणालीचे विकसन झाले सुरु

७.      वर्षभरात ३४ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व पाच लक्ष डिजिटल स्वाक्षरीत खाते  नागरिकांनी महाधुमी पोर्टल वरून केले डाऊनलोड आणि त्यातून मिळाला सहा कोटीचा महसूल

८.       

 पन्नास वर्षानंतर गाव नमुना नं. ७/१२ मध्ये झाला बदल – सन १९७१ च्या नियमान्वये विहित केलेल्या सातबारा नमुन्यामध्ये पन्नास वर्षानंतर  बदल करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली व त्याप्रमाणे राज्यातील सर्व २ कोटी ५३ लक्ष ऑनलाईन सातबारा तयार देखील करण्यात आले.

ई फेरफार प्रकल्पाचा कणा – श्री विश्राम चौसाळकर झाले सेवानिवृत्त -  ज्यांनी राज्यातील सातबारा संगणकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली आणि कळस देखील रचला तेच आज सेवानिवृत्त झाले. राज्यातील सातबारा संगणकीकरण प्रकल्पाचा कणा समजले जाणारे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे (NIC)  वरिष्ट तांत्रिक संचालक (STD) श्री विश्राम चौसाळकर यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांनी सातबारा या प्रकल्पासाठी सन २००२ पासून अखंड कष्ट घेतले अनेक चढ उतार पहिले प्रकल्पाला अत्यंत अडचणीतून आज या अंतिम टप्प्यावर आणून ठेवले त्यासाठी श्री चौसाळकर सर यांना मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांना उर्वरित आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.

 

           आपल्या ई फेरफार प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी संपूर्ण NIC टीम, help desk , राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद

सन २०२१ साठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा – HAPPY NEW YEAR 2021

 





 

आपला

 

रामदास जगताप

उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक

DT 31.12.2020

Comments

Archive

Contact Form

Send