रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीक पाहणी- अद्याप सहभागी न झालेले खातेदार व करावयाची कार्यवाही

नमस्कार मित्रांनो , 

उपविभागीय अधिकारी -वाडा, बारामती,अचलपूर, सिल्लोड, पैठण, दिंडोरी, संगमनेर, सेलू

तहसीलदार- वाडा, बारामती,अचलपूर, सिल्लोड, फुलंब्री, दिंडोरी, संगमनेर, सेलू

 

विषय - ई पीक पाहणी- अद्याप सहभागी न झालेले खातेदार व करावयाची कार्यवाही

 

                आपणास विदित आहेच कि, फेब्रुवारी २०१९  रब्बी हंगामापासून ई पीक पाहणी प्रकल्प प्रथम ६ तालुक्यात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेला आहे त्यानंतर व्याप्ती वाढवून ३ नवीन तालुके समाविष्ट करून ९ तालुक्यात सुरु ठेवण्यात आलेला आहे. प्रथम टप्यातील ६ तालुक्यात मागील ४ हंगामापासून व दुसऱ्या टप्यातील ३ तालुक्यात मागील २ हंगामापासून मोबाइल अँप द्वारे उभ्या पीकांची नोंदणी करण्यात आलेली आहे. ई पीक पाहणी कार्यक्रमाची यशस्विता विचारात घेऊन शासनाने बीड जिल्यातील सर्व ११ तालुक्यात चालू रब्बी हंगामात प्रकल्प राबविण्यासाठी मंजुरी दिलेली असून कार्यक्रमाची अमंलबजावणी सुरु करण्यात  आलेली आहे. 

                                          ई पीक पाहणी कार्यक्रमात गाव निहाय  गाव नमुना नंबर ८ अ च्या तपशीला प्रमाणे सर्व शेतकरी खातेदार यांनी ( १००%) सहभागी होणे अपेक्षित आहे.  त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामकाजाचे व शेतकऱयांच्या सहभागाबाबत विश्लेषण करण्याची योग्य वेळ आलेली आहे त्यासाठी आपल्यास्तरावरून खालील मुद्यांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.

 

१. गाव निहाय ई पीक पाहणी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला खातेदाराचा तपशील तयार करणे. ही माहिती तलाठी मिडलवेअर वरून उपलब्ध करून घ्यावी.

२.गाव निहाय ई पीक पाहणीत सहभागी न झालेल्या खातेदारांची एकूण संख्या व तलाठी यांनी  OCU द्वारे नोंदवलेला पीक पाहणीचा तपशील. 

३.गाव निहाय ई पीक पाहणी कार्यक्रमात अद्याप सहभागी न झालेले खातेदाराचा तपशील व त्यांना सहभागी करून घेण्यासाठीचे नियोजन.

४.काही तलाठी यांनी मिडलवेअर मधून पीक पाहणीच्या नोंदी नष्ट केलेल्या आहेत अश्या खातेदारांना सध्या सुरु असलेल्या रब्बी हंगामात त्यांनी पेरणी केली असल्यास त्यांना ई पीक पाहणी मध्ये समाविष्ट करून घेणे. 

 

                         उपरोक्त मुद्दा क्रंमाक ३ मध्ये नमूद केलेल्या उर्वरित खातेदारांना या सुरु असलेल्या रब्बी हंगामात त्यांचा पीक पेरा असल्यास त्यांना प्राधान्याने ई पीक पाहणी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.  

 

                      आपणास विनंती कि वरील प्रमाणे विश्लेषण करून अद्याप ई पीक पाहणी कार्यक्रमात सहभागी न झालेल्या खातेदारांचा समावेश होईल याकडे विशेष लक्ष दयावे लागेल. उपरोक्त मुद्दा क्रंमाक २ व ३ ची माहिती उपलब्ध झाल्यास आमच्याकडून पुढील कार्यवाही करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.


 

आपला,              

रामदास जगताप 

राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प 

जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे 

 


प्रत:

१. संबंधित जिल्हाधिकारी पालघर,पुणे,अमरावती,औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, परभणी,  बीड

२. जिल्हा समन्वयक टाटा ट्रस्टस वाडा, बारामती,अचलपूर, सिल्लोड, फुलंब्री, दिंडोरी, संगमनेर, सेलू 

Comments

Archive

Contact Form

Send