जून महिन्यात ई फेरफार मधून झाले ५२ लक्ष सातबारा फेरफार चे वितरण - एक नवा उच्चांक
अभिनंदन मित्रांनो ,
आज महाभूमी पोर्टल वरून झाले सर्वाधिक डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड
काही तांत्रिक कारणाने आज दिनांक ६/७/२०२० रोजी ई फेरफार प्रणाली चे तलाठी स्थरावरील कामकाज काही काळासाठी बंद होते तथापि त्याच वेळी अनेक खातेदारांनी महाभूमी पोर्टल वरील डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड करून वापर केला असे दिसून येते.
आज एका दिवसात सुमारे १७००० डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ महाभूमी पोर्टल वरून खातेदारांनी डाऊनलोड केले. सामन्यात दररोज १०००० ते ११०००० डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड होतात परंतु त्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते तसेच ही एक स्वतंत्र सोय निर्माण झाली आल्याने काही तांत्रिक कारणाने तलाठी स्थरावर ७/१२ उपलब्ध न झाल्यास डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होत आहे .
महाभूमी पोर्टल वर आज अखेर २ लक्ष खातेदारांनी नोंदणी करून प्रत्येकी १५ रुपये नक्कल फी चे डिजिटल पेमेंट करून सुमारे १४ लक्ष पेक्षा जास्त ७/१२ उपलब्ध करून घेतले असून त्यापोटी शासनाला २ कोटी १२ लक्ष रुपये महसूल नक्कल फी च्या स्वरूपात मिळाला आहे .
जून महिन्यात वेब पोर्टल वरून बँकांनी केले ७५ हजार डिजिटल ७/१२ डाऊनलोड - पिक कर्जासाठी ऑनलाईन ७/१२ खाते उतारा व फेरफार नोंदी मिळाव्यात म्हणून सुरु केलेल्या G2B वेब पोर्टल द्वारे ७५ हजार अभिलेख बँकांनी स्वतः ऑनलाईन प्राप्त करून घेतले आहेत. आज अखेर १९ बँका व संस्थांनी जमाबंदी आयुक्त यांचेशी करार करून ही सुविधा उपलब्ध करून घेतली आहे.
तलाठी यांनी जून महिन्यात केले ५२ लक्ष अधिकार अभिलेखांचे वाटप - एक उच्चांक
ई फेरफार प्रणालीतून तलाठी स्थरावर सध्या अभिलेख वितरण प्रणालीतून सर्व संगणकीकृत अधिकार अभिल्खांचे वितरण करणेत येत आहे. या प्रणालीतून तलाठी चावडी कार्यालयातून तलाठी यांचे स्वाक्षरीने संगणकीकृत ७/१२ , खाते उतारे आणि फेरफार च्या नकला प्रत्येकी १५ रुपये नक्कल फी घेवून वितरीत केल्या जातात. अनेक भागात कोरोना महामारीचा कहर चालू असताना शेतकरी बांधवांच्या खरीप पीक कर्ज , पीक विमा , विविध योजनासाठी ७/१२ या महत्वाच्या कामासाठी फक्त जून या एका महिन्यात ५२,०७,९३९ अधिकार अभिलेखांच्या नकलांचे वितरण करणेत आले त्यापोटी शासनाला सुमारे २ कोटी ६० लक्ष रुपये महसूल नक्कल फी पोटी मिळाला आहे. हा एक आता पर्यंतच्या मासिक कामातील उच्चांक आहे.
शासनाने KOVID19 च्या या कालावधीत प्रत्यक्ष संपर्काशिवाय डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ मिळण्यासाठी महाभूमी पोर्टल सुरु केले आहे तसेच बँकांना ७/१२ खाते उतारा व फेरफार ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी G2B हे वेब पोर्टल सुरु केले असलेतरी आजही बहुसंख्या खातेदार तलाठी यांचे कडूनच ७/१२ व अन्य उतारे काढत असल्याचे दिसून येते. महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी ,यांचेसह सर्व महसूल अधिकारी यांनी हे अत्यंत किचकट काम रात्रीचा दिवस करून पूर्ण केले व ९९ % ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत केल्यामुळेच हे शक्य होत आहे . हे मात्र नक्की. आज रोजी राज्यातील २ कोटी ५२ लक्ष (१००%) संगणकीकृत ७/१२ ऑनलाईन उपलब्ध असून त्यापैकी २ कोटे ४९ लक्ष ७/१२ ( ९९%) डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध आहेत जे कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य समजले जातात.
राज्यात सन २०१५-१६ पासून ई फेरफार प्रणाली मार्फत ऑनलाईन फेरफार घेण्यात येतात . माहे जून अखेर ९० लक्ष ६७ हजार ९६६ फेरफार ऑनलाइन पद्धतीने घेतले असून एकट्या जून महिन्यात ३ लक्ष १३ हजार ६१६ नवीन फेरफार तलाठी यांचे कडून नोंदविण्यात आले असून १ लक्ष ९७ हजार ५१९ फेरफार मंडळ अधिकारी यांचेकडून प्रमाणित करणेत आले आहेत . हा देखील एक मासिक कामाचा उच्चांक आहे . साधारणता २ लक्ष नवीन फेरफार दरमहिन्याला नोंदवून प्रमाणित केले जातात मात्र जून २०२० या एका महिन्यात ३,१३,६१६ फेरफार नोंदविण्यात आले .
कोविड च्या या अत्यंत कठीण परिस्थितीत देखील तलाठी व मंडळ अधिकारी आणि सर्वच महसूल अधिकारी यांचे कडून तसेच महसूल विभागाच्या या ई फेरफार प्रकल्पाच्या ऑनलाईन सुविधा मुळे चांगली सेवा मिळत असल्याने सामान्य जनतेतून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. महसूल विभागाच्या या सर्व ऑनलाईन सुविधा विकसित करण्याचे व तांत्रिक सहाय्याचे काम राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) पुणे यांचे कडून केले जात आहे हे देखील महत्वाचे आहे.
महसूल विभागाच्या सर्व ऑनलाईन सुविधा जाणून घेण्यासाठी https://mahbhumi.gov.in या संकेतस्थळाला आवश्य भेट द्या.
आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा
राज्य समन्वयक ,ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
दिनांक ६.७.२०२०
Very Nice
ReplyDeleteमा.सर नमस्कार,
ReplyDeleteमहाभूमी पोर्टल वर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२,ह्या प्रणालीत आठ-अ व फेरफार सुद्धा जनतेस उपलब्ध करून द्यावा तशी दुरुस्ती लवकरच करावी ही विनंती.
महाभूमी पोर्टल वर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२,ह्या प्रणालीत आठ-अ व फेरफार सुद्धा जनतेस उपलब्ध करून द्यावा तशी दुरुस्ती लवकरच करावी ही विनंती
ReplyDelete-------------
very nice sir
ReplyDelete