रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणालीतील चुकीचे सेवार्थ आय.डी. कायमस्वरूपी बंद करणे बाबत - महत्वाची सूचना


नमस्कार मित्रांनो, 
  विषय - ई फेरफार प्रणालीतील चुकीचे सेवार्थ आय.डी. 
कायमस्वरूपी बंद करणे बाबत 

                                      ई -फेरफार आज्ञावली मध्ये प्रत्येक वापरकर्ता हा त्याच्या ११ अंकी  UNIQUE सेवार्थ आय डी (हा आपल्या सेवाबाबी शी निगडीत असून तो आपल्या पगार पत्रकात व पगार पावती मध्ये देखील नमूद केलेला असतो ) ने नोंदविला जातो व तोच आपली ई फेरफार  आज्ञावली मधील  प्राथमिक ओळख असते. परंतु आज्ञावली मधील नोंदविलेले सेवार्थ आय.डी. तपासणी केली  असता समान  नावाच्या व्यक्तीचे अनेक सेवार्थ (सेवार्थ आय डी मध्ये ०१, ०२ प्रमाणे बदल करून) नोंदविले गेले असल्याचे दिसून येत आहेत व त्याचा वापर देखील होत असल्याचे आढळून येत आहे. ही सर्व चुकीचे नोंदणीसाठी आपले तालुक्यातील तत्कालीन नायब तहसीलदार ई-फेरफार तथा DBA प्रमुख जबाबदार आहेत. 

                 आपल्या जिल्ह्यातील  अनेक वापरकर्ते यांचे नावे असे अनेक चुकीचे सेवार्थ आय.डी. नोंदविलेले दिसून येत आहेत त्यामुळे कोणत्याही महसूल कर्मचारी अथवा अधिकारी यांची डिजिटल सिग्नेचर नोंदविताना चूक ह्वू शकते तसेच कोणत्याही अन्य कर्मचाऱ्याचा सेवार्थ आय डी दुसर्याचे नावे नोंदविल्याने त्याची नोंदणी करता येत नाही व एकदा नोंदविलेला सेवार्थ आय डी ई फेरफार प्रणालीतून पुन्हा काढून टाकता येत नाही. कारण तो  डेटा मध्ये सर्वत्र साठविला जातो . आपल्या नायब तहसीलदार यांचे एका चुकीने अनेक कायदेशीर गुंतागुंत निर्माण होवू शकते हे आपण लक्षात घ्यावे. 

                                 आज या मेल सोबत EXCEL SHEET मध्ये आपणास आज्ञावली मध्ये कार्यरत असणारे एकसमान  सेवार्थ आय डी तालुका निहाय तपासणी करणे करिता दिलेले असून प्रत्येक कर्मचारी / अधिकारी यांचा सेवार्थ प्रणालीमध्ये  मध्ये नोंदणी केलेल्या सेवार्थ आय डी योग्य असतो . त्याप्रमाणे या यादीत नोंदविलेल्या सेवारत आय डी ची खात्री करून REMARK या रकान्या मध्ये योग्य असल्यास CORRECT व आयोग्य असल्यास WRONG असे REMARK भरावेत. आपण अयोग्य मार्क केलेले सेवार्थची आज्ञावली मध्ये योग्य दुरुस्ती करण्यासाठी सुविधा दिली जाईल त्याप्रमाणे दुरुस्ती नायब तहसीलदार यांनी करावी ही विनंती .

                     कोणत्याही परिस्थितीत नायब तहसीलदार ई-फेरफार यांनी  चुकीचे सेवार्थ आय डी कोणत्याही कर्मचारी / अधिकारी यांचे नावे नोंदवू नये . यात कोणतीही अडचण असल्यास कृपया हेल्प डेस्क ची मदत घ्या . 


आपला 
रामदास जगताप 
राज्य समन्वयक 
दिनांक ८.७.२०२० 

Comments

Archive

Contact Form

Send