ऑनलाईन मिसिंग असलेल्या सातबारा बाबत महत्वाची सूचना
महाराष्ट्र
शासन
महसूल व
वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे १ .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.अ.का./रा.स./मा.सू./१६४/२०२० दिनांक: ०६.०७.२०२०
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).
विषय – गावातील सर्व हस्तलिखित गाव नमुना नं.७/१२ संगणकीकृत
होवून ई फेरफार
प्रणाली मध्ये उपलब्ध असल्याची खात्री करून प्रमाणपत्र
देण्याबाबत
महोदय ,
उपरोक्त विषयाबाबत असे निदर्शनास येत आहे कि काही गावातील
सर्व हस्तलिखित ७/१२ संगणकीकृत होवून ई फेरफार
प्रणालीत उपलब्ध नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे. अनेक खातेदार माझा हस्तलिखित नोंदवहीत ७/१२ होता परंतु सध्या ऑनलाइन ई फेरफार प्रणालीत
ऑनलाइनला उपलब्ध नाही अशा तक्रारी करत आहेत. अशा स्वरूपाची तक्रार दिल्ली च्या भू-सुधार कार्यालयातून पेडगाव तालुका मुरबाड तसेच शेतकरी संघटनेकडून रुंभोडी
तालुका अकोले या गावासाठी प्राप्त झाल्या आहेत.
तसेच कृषी विभागाचे अहवालाप्रमाणे अद्यापही काही गावातील ७/१२ हस्तलिखित पद्धतीने
वितरीत केले जात आहेत असे दिसून येते हे अत्यंत असमाधानकारक आहे.
या बाबत सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार (ई फेरफार)
यांना विनंती करणेत कि त्यांनी गाव निहाय
आढावा घेवून १००% गाव नमुना नं. ७/१२ संगणकीकृत झाले असून ते ई-फेरफार प्रणालीत ऑनलाईन उपलब्ध असल्याचे प्रमाणित करावे. जर कोठेही काही ७/१२ नजरचुकीने संगणकीकृत झाले नसतील तर ते कलम १५५ च्या ऑनलाइन सुविधा वापरून
असे संगणकीकृत न झालेले ७/१२ संगणकीकृत करण्यास तलाठी यांना
तहसीलदार यांनी अनुमती द्यावी व सर्व मिसिंग ७/१२ ची
डेटाएन्ट्री पूर्ण करून घ्यावी व त्यानंतरच खालील प्रमाणे प्रमाणपत्र सादर करावे.
आपल्या तालुक्यातील सर्व महसुली गावे ऑनलाईन
झाली असून त्यातील सर्व हस्तलिखित अधिकार अभिलेख अचूक रित्या ई फेरफार
प्रणालीमध्ये संगणकीकृत झाले असून ते सर्व जनतेला ऑनलाईन उलब्ध असल्याची खात्री
करणे आवश्याक आहे . सर्व
तहसीलदार यांनी वरील प्रमाणे कार्यवाही करून आपला अहवाल जिल्ह्याचे डी.डी.ई.
यांचे मार्फत जमाबंदी आयुक्त कार्यालयाला सादर करावा ही विनंती. या मध्ये हयगय केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित तहसीलदार स्वत वैयक्तिक
जबाबदार राहतील ह्याची नोंद घ्यावी.
हस्तलिखित मधील सर्व ७/१२ संगणकीकृत झाले असल्याचे तलाठी
प्रमाणपत्र
तलाठी -------- तालुका --------- जिल्हा ---------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी तलाठी --------- श्री / श्रीमती ----------------------
माझ्याकडे कार्यभार असलेल्या खालील सर्व
गावातील सर्व हस्तलिखित ७/१२ ई फेरफार प्रणालीत उपलब्ध असल्याची मी स्वता खात्री केली असून तसे मी
प्रमाणित करत आहे.
१. अ.न.
२. गावाचे नाव
३. हस्तलिखित ७/१२ ची संख्या
४. त्यापैकी ऑनलाइन झालेल्या ७/१२ ची
संख्या
५. ऑनलाइन न झालेल्या ७/१२ ची संख्या
६. सर्व ७/१२ ऑनलाइन न होण्याची
कारणे
स्थळ ---------- (-----------------)
दिनांक - ----------- तलाठी --------- तालुका -------
==========================================================================
===========================================================================
हस्तलिखित मधील सर्व ७/१२ संगणकीकृत झाले असल्याचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र
तालुका --------- जिल्हा ---------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी तहसीलदार --------- श्री / श्रीमती ----------------------
माझ्याकडे कार्यभार असलेल्या तालुक्यात एकूण असलेली महसुली गावे - असून या सर्व गावातील सर्व हस्तलिखित ७/१२ ई
फेरफार प्रणालीत उपलब्ध असल्याची मी स्वता संबंधित तलाठी यांचे मार्फत खात्री केली
असून तसे मी प्रमाणित करत आहे.
स्थळ ---------- (-----------------)
दिनांक - ----------- तहसीलदार -------
सदरच्या सूचना सर्व तलाठी,
मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार ई फेरफार व तहसीलदार यांचे
निदर्शनास आणाव्यात. या प्रमाणे कार्यवाही झाली असल्याचे सर्व उप विभागीय अधिकारी यांनी
जिल्हाधिकारी यांना लेखी अवगत करावे.
आपला विश्वासू,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय,
पुणे.
प्रत , मा. उप आयुक्त महसूल , विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व )
प्रत, उप
विभागीय अधिकारी (सर्व)
प्रत, तहसिलदार
(सर्व)
यांना महितीसाठी
Comments