रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पीक पाहणीच्या नोंदी अद्यावत करणे बाबत - महत्वाच्या सूचना



नमस्कार मित्रांनो ,

विषय - पीक पाहणीच्या नोंदी अद्यावत करणे बाबत - महत्वाच्या सूचना 


                               गाव नमुना १२  वरील पिकांची नोंदवही ई फेरफार प्रणाली मध्ये अद्यावत करण्यासाठी OCU  - ONLINE CROP UPDATION प्रणाली वापरली जाते . तलाठी यांनी स.नं.निहाय प्रत्येक हंगामात घेतलेल्या  पिकांच्या अचूक नोंदी घेणे अपेक्षित आहे .  परंतु अनेकदा सर्व शिवारात पाहणी करून सर्व पिकांच्या नोंदी अपडेट करणे तलाठी यांना शक्य होत नाही म्हणूनच अचूक पिकांच्या नोंदीची माहिती तलाठी यांना ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी ई पीक पाहणी मोबाईल ॲप टाटा ट्रस्ट च्या मदतीने विकाशित करून गेल्या वर्षी ९ तालुक्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून वापरात आणले असून त्यातून चांगले परिणाम दिसून आले आहेत . तथापि अजून ई पीक पाहणी प्रकल्प राज्यभर लागू करणेत आलेला नाही . तथापि अचूक पीक पाहणी साठी खालील महत्वाचा बाबी सर्वतलाठी व मंडळ अधिकारी यांनी लक्षात घ्याव्यात ही विनंती .

१. सर्व तलाठी यांनी त्या त्या हंगामात पीक पाहणी अद्यावत करावी. 
२, पेकाच्या नोंदी करताना ते मिश्र पीक आहे कि निर्भेळ पीक आह्हे ? ह्याची खात्री करूनच त्याच्या नोंदी घ्याव्यात.
३.मिश्र पिकांचे क्षेत्र त्या पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणत विभागून टाकावे उदा , तूर +सोयाबीन या मिश्र पिकात सोयाबीन तीन रांगा नंतर तूर पिकाची एक रांग  असे पीक घेतले असल्यास ७५% सोयाबीन व २५% तूर पिकाचे क्षेत्र नमूद करावे म्हणजेच १.०० हे आर. मध्ये सोयाबीन ०.७५ हे,आर. व तूर ०.२५ हे.आर. अशी पीक पाहणी करावी . निर्भेळ पिकाचे क्षेत्र एकाच पिकाचे १००% क्षेत्र दर्शवावे . उदा. भात हे मिश्र पीक असू शकत नाही . नेहमी भात हे निर्भेळ पीक म्हणूनच नमूद करावे. 
४. कोणत्याही पिकाचा हंगाम योग्य असावा . उदा, उस हे पीक खरीप किंवा रब्बी हंगामात नमूद न करता ते संपूर्ण वर्ष हंगाम असे अमूद करावे. खरीप, रब्बी , उन्हाळी व संपूर्ण वर्ष या हंगामातील पिकांची नोंदणी योग्य होते आहे का खात्री करावी.
५. कोणतेही पीक जिरायत आहे कि बागायत ह्याचा विचार करूनच अनुक्रमे  अजलसिंचित व जलसिंचित असे नमूद करावे .उदा. उस हे पीक जिरायत असू शकत नाही म्हणून उस या पेकाचे क्षेत्र कधीही अजलसिंचित रकान्यात नमूद करू नये. बागायत पीक असल्यास जलसिंचानाचे साधन न चुकता नमूद करावे. 
६. जलसिंचनाचे साधन व पड क्षेत्रात गल्लत करू नये. जल सिंचनाचे साधन प्रत्येक बागायत पिकाचे समोर हंगाम निहाय नमुद करावे मात्र पड क्षेत्र दुबार असू शकत नाही .  त्यामध्ये जितक्या विहिरी असील तितक्या विहिरींच्या नोंदी पड मधून करता येतील . मात्र जल सिंचनाचे साधन हे पीक निहाय असते .
७. कोणताही हंगामात पीक पाहणीची घोषणा केल्या नंतर अथवा ७/१२ वितरीत केल्या नंतर पिकाचे नाव अथवा क्षेत्र तलाठीा यांना बदलता येणार नाही . खरोखरच पिकाची नोंद चुकली असल्यास खातेदाराच्या लेखी विनंती वरून मंडळ अधिकारी पंचांच्या समोर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून व OCU त्या पंचांची नावे व स्थळ पाहणीचा दिनांक नमूद करून मंडळ अधिकारी एकदा पेकाचे नाव व क्षेत्र एकदा बदलू शकतो . ही माहिती आपल्याला असावी. 
८. कोणताही  ७/१२ अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) वितरीत करण्यापूर्वी  पिक पाहणे अद्यावत करूनच वितरीत करावा . यापुढे  तशी अट DDM मध्ये असेल व त्या नंतर अशा ७/१२ वरील पीक पाहणी तलाठी यांना बदलता येणार नाही . जर त्या चालू हंगामात काही क्षेत्र शिल्लक असेल तरच जादा पीक नोंदविता येईल मात्र जुन्या पिकांच्या नोंदी नष्ट करता येणार नाहीत अथवा बदलता / दुरुस्त करता येणार नाहीत , 
९. डिजिटल स्वाक्षरीत केल्यानंतर त्या ७/१२ वर त्या हंगामात कोणताही बदल पीक पाहणीत तलाठी यांना करता येणार नाही .
१०. बांधावर झाडे असतील तर त्यांच्या नोंदी शेरा रकान्यात घेवून झाडांची संख्या टाकावी मात्र झाडे सलग क्षेत्रात लावून वन पीक घेतले असल्यास ते पीक म्हणून घ्यावे व त्याचे क्षेत्र हे.आर मध्ये नमूद करावे .
११. शेती क्षेत्राची पीक पाहणी हे.आर.चौ.मी. मध्ये असेल तर बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र ७/१२ असल्यास नमुना १२ आवश्यक असणार नाही .


आपला 
रामदास जगताप 
दि.८.७.२०२० 

Comments

Archive

Contact Form

Send