जिल्हा व तालुका ई फेरफार मास्टर ट्रेनर्स च्या कामकाजा बाबत .
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे १.
-----------------------------------------------------------------
क्रमांक: क्र.रा.भू.अ.का.४/का.वी./मास्टर
ट्रेनर्स /२०२० दिनांक: १९ .७.२०२०
प्रति ,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. (सर्व )
विषय – जिल्हा व तालुका ई फेरफार मास्टर ट्रेनर्स च्या
कामकाजा बाबत .
महोदय ,
उपरोक्त विषया बाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे निवासी उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. आणि विभागीय आयुक्त कार्यालयाचे उप आयुक्त महसूल यांना विनंती करणेत येते की ,
आपल्या जिल्हा विभागातून नामनिर्देशित
केलेल्या विभागीय व जिल्हा ई फेरफार मास्टर ट्रेनर्स ला यशदा पुणे येथे तीन
दिवसाचे निवासी प्रशिक्षण माहे फेब्रु २०१९ मध्ये देण्यात आले होते त्या नंतर या
मास्टर ट्रेनर्स यांनी या आपल्या जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व नायब
तहसीलदार ई फेरफार यांना यथोचित प्रशिक्षित करणे अपेक्षित होते त्या प्रमाणे
कार्यवाही झाली असेल . त्यानंतर ई फेरफार प्रणाली मध्ये नेहमीच काही ना काही बदल
होत असतात ते समजून घेवून सर्व वापरकर्ते यांना समजावून सांगण्याची जबाबदारी
यांचेवर असते सबब मास्टर ट्रेनर्स यांना सतत जमाबंदी आयुक्त कार्यालय व विभागीय
हेल्प डेस्क यांचे संपर्कात राहून सादरीकरणे व user manuals द्वारे नवनवीन बदल
समजून घ्यावे लागतात.
ई-फेरफार मास्टर ट्रेनर्स ची जबाबदारी :–
१. ई-फेरफार प्रणालीतील ई फेरफार, OCU, ई पीक
पाहणी, कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधा, ODC
, DDM, DSD इत्यादी modules मधील नवनवीन बदल समजून घेवून सर्व वापरकर्ते यांना
समजून सांगणे .
२. नवीन सुविधा / सुधारणा यांचे टेस्टिंग करून UAT
अहवाल सादर करणे.
३. प्रणालीतील कामकाजासाठी तालुका जिल्हा स्थरावर
मार्गदर्शकाची भूमिका निभावणे.
या सर्व मास्टर ट्रेनर्स साठी या COVID19
च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे , त्यासाठी आपल्या
जिल्ह्यातून निवडलेल्या मास्टर ट्रेनर्स ची खालील नमुन्यातील अद्यावत माहिती तातडीने
इकडे पाठवावी ,
अ,नं. मास्टर ट्रेनर्स चे नाव पदनाम
मो. नं. ई मेल आय डी skype ID
आपला विश्वासू
(रामदास जगताप )
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी
आयुक्त कार्यालय , पुणे
प्रत ,
मा. उप आयुक्त महसूल (सर्व)
कृपया आपण देखील या ऑनलाईन
मीटिंगमध्ये सहभागी होवून आपले अभिप्राय द्यावेत ही विनंती .
Comments