रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

खाता दुरुस्ती व चूक दुरुस्ती फेरफार दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती


प्रति,
      उप  जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व)


                विषय  खाता दुरुस्ती  व चूक दुरुस्ती फेरफार दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती

                                                              
महोदय,

       १)    खाता दुरुस्ती  फेरफार दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती

                    DILMRP अंतर्गत सुरु असलेल्या ई फेरफार प्रणाली कार्यवाही करताना तलाठी यांनी खाता दुरुस्तीची कार्यवाही सुरु असताना दरम्यान मंडळ अधिकारी यांनी इतर फेरफार प्रमाणित केल्यामुळे निर्माण झालेली स्थिती दुरुस्त करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. सबब खालील प्रमाणे खाता दुरुस्ती दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती साठी नवीन सुविधा उपलब्ध करून देणेत येत आहे. वास्तविक कोणताही खाता दुरुस्तीचा फेरफार घेतल्या नंतर त्या मध्ये समाविष्ट असलेला ७/१२ वर कोणताही अन्य फेरफार घेणे अथवा प्रमाणित करणे अपेक्षित नव्हते तथापि नजरचुकीने खाता दुरुस्तीसुरु असलेल्या ७/१२ वर अन्य फेरफार घेतला असल्यास अथवा कोणतही अन्य फेरफार प्रामाणि केला असल्यास असे ७/१२ वर चुकीचा अंमल होऊ शकतो अथवा आगोदर घेतलेल्या फेरफाराचा अंमल निघून जावू शकतो त्यासाठी एक नवीन सुविधा देण्यात आली आहे.

           तलाठी लॉगीन मध्ये फेरफाराची माहिती भरणे या पर्यायामध्ये खाता दुरुस्ती दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती” हा पर्याय निवडल्या नंतर येथे खाता दुरुस्ती फेरफार घेतल्यानंतर तो प्रमाणित करण्यापूर्वी  इतर फेरफार प्रमाणित केले असल्यास असे फेरफार व त्यात समाविष्ट स.नं. दिसून येतील. या पैकी प्रत्येक स.नं. निवडून जर त्यावर योग्य अंमल झाला असेल तर ७/१२ योग्य आहे असा पर्याय निवडून साठवावा अथवा ७/१२ वर योग्य अंमल झाला नसेल तर ७/१२ योग्य नाही हा पर्याय निवडून साठवावा. जे ७/१२ योग्य नाहीत असे निवडले आहेत असे सर्व स.नं. खाता दुरुस्ती व चूक दुरुस्ती फेरफार घेण्यासाठी उपलब्ध होतील. त्यावर योग्य तो फेरफार घेवून असे ७/१२ दुरुस्त करण्यात यावेत तो पर्यंत या ७/१२ वर अन्य कोणतेही फेरफार घेता येणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी.

२)   चूक दुरुस्ती फेरफार दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती

                    DILMRP अंतर्गत सुरु असलेल्या ई फेरफार प्रणाली कार्यवाही करताना तलाठी यांनी  चूक  दुरुस्तीची कार्यवाही सुरु असताना दरम्यान मंडळ अधिकारी यांनी इतर फेरफार प्रमाणित केल्यामुळे निर्माण झालेली स्थिती दुरुस्त करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. सबब खालील प्रमाणे चूक  दुरुस्ती दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती साठी नवीन सुविधा उपलब्ध करून देणेत येत आहे. वास्तविक कोणताही चूक  दुरुस्तीचा फेरफार घेतल्यानंतर त्या मध्ये समाविष्ट असलेला ७/१२ वर कोणताही अन्य फेरफार घेणे अथवा प्रमाणित करणे अपेक्षित नव्हते तथापि नजरचुकीने चूक दुरुस्तीसुरु असलेल्या ७/१२ वर अन्य फेरफार घेतला असल्यास अथवा कोणतही अन्य फेरफार प्रामाणि केलाअसल्यास असे ७/१२ वर चुकीचा अंमल होऊ शकतो अथवा आगोदर घेतलेल्या फेरफाराचा अंमल निघून जावू शकतो त्यासाठी एक नवीन सुविधा देण्यात आली आहे.

           तलाठी लॉगीन मध्ये फेरफाराची माहिती भरणे या पर्यायामध्ये चूक  दुरुस्ती दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती” हा पर्याय निवडल्या नंतर येथे चूक दुरुस्ती फेरफार घेतल्या नंतर तो प्रमाणित करण्यापूर्वी  इतर फेरफार प्रमाणित केले असल्यास असे स.नं. दिसून येतील. या पैकी प्रत्येक स.नं. निवडून जर त्यावर योग्य अंमल झाला असेल तर ७/१२ योग्य आहे असा पर्याय निवडून साठवावा अथवा ७/१२ वर योग्य अंमल झाला नसेल तर ७/१२ योग्य नाही हा पर्याय निवडून साठवावा. जे ७/१२ योग्य नाहीत असे निवडले आहेत असे सर्व स.नं. खाता  दुरुस्ती व चूक दुरुस्ती फेरफार घेण्यासाठी उपलब्ध होतील. त्यावर योग्य तो फेरफार घेवून असे ७/१२ दुरुस्त करण्यात यावेत तो पर्यंत या ७/१२ वर अन्य कोणतेही फेरफार घेता येणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी.

चूक दुरुस्ती फेरफार चे काम सुरु असतानाचे दरम्यान झालेल्या अन्य फेरफार मुळे खालील प्रमाणे तीन केसेस असू शकतात 

स्थिती १ – कोणताही चूक दुरुस्ती फेरफार प्रमाणित केल्यानंतर या ७/१२ वर अन्य फेरफार घेतला नसल्यास आणि जुन्या काही फेरफार चा अंमल दिसत नसेल तर अशा चूक दुरुस्ती फेरफार पूर्वीच्या फेरफाराचा अंमल पूर्ववत दिसण्यासाठी पूर्ववत ७/१२ कन्फर्म करणे हा पर्याय वापरावा

स्थिती -२ - या मध्ये जर चूक दुरुस्ती फेरफार प्रमाणित केल्यानंतर नवीन काही फेरफार घेतले असतील आणि  जुन्या काही फेरफार चा अंमल दिसत नसल्यास तो अंमल पुन्हा ७/१२ वर आणण्यासाठी अशा ७/१२ वर चूक दुरुस्ती किंवा खाता दुरुस्ती फेरफार घेवून त्यांचा अंमल पूर्ववत करता येईल त्यासाठी चूक दुरुस्ती फेरफार घेण्यासाठी मार्क करणे हा पर्याय वापरा


स्थिती -३  या मध्ये सर्व फेरफार चा अंमल ७/१२ वर योग्य दिसत असेल आणि सध्याचा ७/१२ योग्य दिसत असल्यास सध्यस्थिती ७/१२ कन्फर्म करणे हा पर्याय वापरावा 


अंत्यंत महत्वाची सूचना – राज्यातील प्रत्येक तलाठ्याने ई फेरफार प्रणालीतील 
१.     खाता   दुरुस्ती दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती 
२.     चूक  दुरुस्ती दरम्यान प्रमाणित केलेल्या इतर फेरफारांची दुरुस्ती  हे दोन्ही प्रत्येक पर्याय गावासाठी  ओपन करून त्यात  कोणताही फेरफार क्रमांक किंवा स.नं. समाविष्ट असल्यास प्रथम त्यावर कार्यवाही करावी ही विनंती .


या बाबत करावयाची दुरुस्ती ची कार्यपद्धती नमूद असलेली USER MANUAL सोबत जोडली आहेत .

                                   सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.                                                                                                                                                                        आपला स्नेहांकित,                                                

                                                                                                                                        स्वाक्षरीत                                                                                                                                  (रामदास जगताप)                                                                                                                           राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प                                                                                                                           जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे  



Comments

Archive

Contact Form

Send