सुधारित संगणकीकृत ७/१२ मधील बदल , मोबाईल ॲप व ई चावडी प्रणाली बाबत डोमेन टीम चे अभिप्राय घेण्यासाठी ऑनलाईन मीटिंग घेणे बाबत
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे १.
-----------------------------------------------------------------
क्रमांक: क्र.रा.भू.अ.का.४/का.वी./डोमेन
टीम बैठक /२०२० दिनांक: २०.७.२०२०
प्रति ,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. (सर्व )
विषय- सुधारित संगणकीकृत ७/१२ मधील बदल , मोबाईल ॲप व ई चावडी प्रणाली बाबत
डोमेन टीम चे अभिप्राय घेण्यासाठी ऑनलाईन मीटिंग घेणे बाबत
महोदय ,
उपरोक्त विषया बाबत
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील हेल्प डेस्क व डोमेन
टीम चे सदस्य असलेले अधिकारी व कर्मचारी यांचे सुधारित संगणकीकृत ७/१२ मधील बदल , मोबाईल ॲप व ई चावडी प्रणाली
बाबत
डोमेन टीम चे अभिप्राय घेण्यासाठी ऑनलाईन मीटिंग घेणे प्रस्तावित आहे.
१. सुधारीत संगणकीकृत ७/१२ मधील बदल
२. मोबाईल ॲप वरील गाव नमुना ७ व १२ ची माहिती .
३. भूलेख संकेतस्थळावरील नवीन गाव नमुना ७ व १२ ची
माहिती.
४. ई चावडी प्रणाली बाबत चर्चा .
या शिवाय ई फेरफार
प्रणाली मध्ये आवश्यक बदल / सुधारणा बाबत देखील आपण आपले अभिप्राय द्यावेत
ऑनलाईन मीटिंग ची दिनांक
व वेळ – गुरुवार दिनांक २३ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
ऑनलाईन मीटिंग ची लिंक whats app ग्रुप वर
पाठविण्यात येईल
.
आपला विश्वासू
रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी
आयुक्त कार्यालय पुणे
प्रत ,
मा. अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य तलाठी
मंडळ अधिकारी समन्वय महासंघ
सुधारित संगणकीकृत गाव नमुना नं ७/१२ मध्ये प्रस्तावित
केलेले बदल
Comments