रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ऑनलाईन मीटिंग दिनांक १६.७.२०२० स.११.०० वाजता


महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (.राज्य) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे .
दूरध्वनीक्र. ०२०-२६१३७११०                                             Email ID : satecordinatormahaferfar@gmail.com
                                                                                          Web site: https://mahabhumi.gov.in
-----------------------------------------------------------------
क्रमांक: क्र.रा.भू..का./का.वी./ सुधारित सातबारा नमुना /२०२०                                        दिनांक:   १४..२०२०




प्रति ,
  उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.. (सर्व )
                                 विषय सुधारित संगणकीकृत ७/१२ मधील बदल व मोबाईल आपं बाबत अभिप्राय                                   जाणून घेण्यासाठी ऑनलाईन मीटिंग घेणे बाबत


महोदय ,

                           उपरोक्त विषया बाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे निवासी उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.. व सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाचे उप आयुक्त महसूल यांची ऑनलाईन मीटिंग खालील प्रमाणे निश्चित केली आहे.  तरी आपण या ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी होवून आपले अभिप्राय द्यावेत.

१.     सुधारीत संगणकीकृत ७/१२ मधील बदल
२.     मोबाईल अप्प वरील गाव नमुना ७ व १२ ची माहिती
३.     भूलेख संकेतस्थळावरील नवीन गाव नमुना ७ व १२ ची माहिती
या बाबत मा. मंत्री महसूल यांना सादरीकरण केले असता त्यांनी आपले सर्वांचे या बाबत अभिप्राय घेणेबाबत निर्देश दिले आहेत.

ऑनलाईन मीटिंग ची दिनांक व वेळ दिनांक १६ जुलै २०२०  वेळ स.११.०० वाजता
ऑनलाईन मीटिंग चे मध्यम microsoft teams किंवा skype ( लिंक whats app ग्रुप व मेल वर पाठविण्यात येईल)

                        या ऑनलाईन बैठकीत  मा. जमाबंदी आयुक्त साहेब स्वता सहभागी होवून आपले अभिप्राय जाणून घेणार आहेत तरी या बाबत आपले अभिप्राय आपण त्या आगोदरच इकडे लेखी कळवावेत ही विनंती .

                                                                                                    आपला विश्वासू 





                                                                                                    (रामदास जगताप )
                                                                                        राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
                                                                                           जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे

प्रत ,
      मा. सह सचिव ल महसूल व वन विभाग
      मा. अव्वर सचिव जमहसूल व वन विभाग
      मा. उप आयुक्त महसूल (सर्व)
           कृपया आपण देखील या ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी होवून आपले अभिप्राय द्यावेत ही विनंती .


























                             सुधारित संगणकीकृत गाव नमुना नं ७/१२ मध्ये प्रस्तावित केलेले बदल

संदर्भीय शासन निर्णयान्वये  शासनाने गाव नमुना नं/१२ व ८() मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी  महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क टाकण्यास मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे विहित गाव नमुना नं./१२ मध्ये यथोचित बदल करणेत आला आहे त्याचवेळी सध्याचा गाव नमुना नं./१२ मध्ये कालानुरूप काही बदल करून तो सामान्य माणसाला समजण्यासाठी अधिकसोपा होण्यासाठी संगणकीकृत ७/१२  मध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
१.       गाव नमुना नं. ७ मध्ये गावाचे नावासोबत  LGD (Local Governmnt Directory) कोड दर्शविण्यात येईल.
२.       गाव नमुना नं.७ मध्ये अ) लागवडीयोग्य क्षेत्र व ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (+) दर्शविण्यात येईल.
३.       नमुना ७ मध्ये नमूद क्षेत्राचे एकक काय आहे? हे समजण्यासाठी क्षेत्राचे एकक हा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात येत आहे. यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक वापरले जाईल.
४.       नमुना ७ मध्ये खाते क्रमांक या पूर्वी इतरहक्क रकान्यासोबत कंसात नमूद केला जात असे तो आता खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाईल.
५.       नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतरहक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्याजात होत्या, आत्ता  ती कमी केलेली नावेव नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषामारून खोडून (strike through) दर्शविण्यात येतील.
६.       कोणत्याही नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येतील. संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येईल.
७.       कोणत्याही नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतरहक्क रकाण्याचे खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या नवीन समाविष्ट रकान्यात दर्शविण्यात येईल. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून एखद्या स.नं / गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही.
८.       या नमुना ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक नमुना ७ वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील.
९.       शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात येतील.
१०.   नमुना ७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेड लाईन छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल.
११.   नमुना १२ मध्ये ज्या रकान्यात कोणतीही माहिती नाही असे मिश्रणाचा संकेतांक, अजलसिंचीत व जलसिंचीत हे तीन रकाने छापण्यात येणार नाहीत.
१२.   बिनशेती क्षेत्राचे नमुना ७ साठी नमुना १२ ठेवणे आवश्यक नसल्याने बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही. व त्यावर सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने  या क्षेत्रासाठी गाव नमुना न.१२ ची आवश्यकता नाही अशी सूचना छापण्यात येईल.

Comments

  1. Sir,
    Pl. add Aadhaar Number on 7 12 ( May be in first 2 numbers and Last 2 Numbers ) .

    So that so much fraud can be avoided.

    Sanchit Patunkar
    9823314191

    ReplyDelete
  2. Kami Jast patrak should be automatically updated same as online registry. Specially in NA permission and Land acquisition by government.

    As there are process lapses and Kami jast patrak is not followed by Bhumiabhilekh dept.

    ReplyDelete
  3. your Email id is wrong satecordinatormahaferfar@gmail.com

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send