मोफत गाव नमुना ७/१२ ची माहिती ( नवीन नमुन्यात ) भूलेख संकेतस्थळावर टेस्टिंग करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - गाव नमुना ७/१२ ची माहिती भूलेख संकेतस्थळावर टेस्टिंग करणे बाबत
ई फेरफार प्रणालीमध्ये संगणकीकृत झालेले अधिकार अभिलेख जनतेला खालील पद्धतीने उपलब्ध आहेत .
१. मोफत ७/१२ - भूलेख संकेतस्थळावर
२. तलाठी स्वाक्षरीत ७/१२ - DDM प्रणाली
३. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेसाठी - महाभूमी संकेतस्थळावरील डिजिटल सातबारा लिंक
४. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ - बँकांसाठी - वेब पोर्टल
५. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ - बँक / विभाग / योजना इंटिग्रेशन - वेब सर्विसेस
या सर्व प्रकारे उपलब्ध होणारे गाव नमुना न. ७/१२ पैकी फक्त भूलेख संकेतस्थळावरील ७/१२ फक्त माहिती साठी असून मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत या शिवाय इतर सर्व अभिलेख प्रती ७/१२ रक्कम रुपये १५ प्रमाणे नक्कल फी घेवून दिले जातात . परंतु एकूण वापर पाहता भूलेख वरील मोफत ७/१२ दररोज किमान २.५ ते ३.०० लक्ष DOWNLOAD केले जातात , या ७/१२ वर हा ७/१२ कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरला जाणार नाही असे स्पष्टरित्या नमूद केले असूनही हा ७/१२ अनेक ठिकाणी उपयोगात आणला जात आहे त्यासाठी कोणत्याही सेतू केंद्र चालकाने अथवा महा ई सेवा केंद्राचालकाने असे मोफात मिळणारे ७/१२ सही शिका करून विक्री करू नयेत असे निर्देश शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने परिपत्रकाद्वारे काढून देखील अनेक ठिकाणी त्याचा गैर वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे . कोणत्याही डिजिटल अभिलेखाची नक्कल पडताळणी शक्या असल्याशिवाय त्या डिजिटल अभिलेखला कायदेशीर वैधता प्राप्त होत नाही त्यामुळे कोणत्याही नकलेलेची पडताळणी करण्यासाठी त्या नकलेवर पडताळणी क्रमांक देखील नमूद केला जातो . या शिवाय या मोफत ७/१२ च्या गैर वापरामुळे व गैर हेतूने केलेल्या खाडाखोडी किंवा बदल मुले फसवणूक होवू शकते तसेच शासनाच्या महसुलात देखील नुकसान होते . त्यासाठी हा माहितीच मोफत ७/१२ यापुढे गाव नमुना ७ ची माहिती व गाव नमुना १२ ची माहिती म्हणून भूलेख संकेतस्थळावर दर्शविली जाणार आहे . त्यामुळे सामान्य खातेदाराला अथवा जनतेला ही सर्व माहिती विनामुल्या माहिती स्वरूपात उपलब्ध होईल मात्र ती गाव नामुंना ७/१२ च्या विहित नमुन्यात नसल्याने ती कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी वापरता येणार नाही.
या ७/१२ ची माहिती दर्शविण्यासाठी ची सुविधा राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांचे मार्फत विकाशित केली असून ती खालील सहा तालुक्यातील सर्व गावांसाठी टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिली आहे .
पुणे विभाग - तालुका खेड - पुणे जिल्हा
नाशिक विभाग - सिन्नर तालुका - नाशिक जिल्हा
कोंकण विभाग - कणकवली तालुका - सिंधुदुर्ग जिल्हा
औरंगाबाद विभाग - नांदेड तालुका - नांदेड जिल्हा
अमरावती विभाग - मुर्तीजापुर तालुका - अकोला जिल्हा
नागपूर विभाग - नागपूर ग्रामीण - नागपूर जिल्हा
टेस्टिंग URL - https://bhulekh.mahabhumi.gov.in/217desiver/
या तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांना विनंती आहे कि त्यांनी टेस्टिंग करून या नमुन्यात गाव नामुंना ७/१२ मधील सर्व अद्यावत माहिती उपलब्ध होत आहे ह्याची खात्री करून आपल्या अभिप्रायासह टेस्टिंग अहवाल (UAT -अहवाल ) संबंधित तहसीलदार यांनी DDE यांचे मार्फत जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे आठ दिवसात सदर करावा ही वनांती
आपला
रामदास जगताप
दि.१०.७.२०२०
Comments