रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल स्वाक्षरीत 7/12 ची पडताळणी ( verification) चे महाभूमी मोबाईल अप्प मधून क्यूआर कोड स्कॅनिंग द्वारे टेस्टिंग करणे बाबत

नमस्कार मित्रांनो ,


विषय -  डिजिटल स्वाक्षरीत 7/12 ची पडताळणी ( verification)  चे महाभूमी  मोबाईल अप्प मधून  क्यूआर कोड स्कॅनिंग द्वारे टेस्टिंग करणे बाबत 


   ई फेरफार प्रणालीमध्ये संगणकीकृत झालेले अधिकार अभिलेख जनतेला खालील पद्धतीने उपलब्ध आहेत .

१. मोफत ७/१२ - भूलेख संकेतस्थळावर
२. तलाठी स्वाक्षरीत ७/१२ - DDM प्रणाली
३. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेसाठी  - महाभूमी संकेतस्थळावरील  डिजिटल सातबारा लिंक
४. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ - बँकांसाठी  - वेब पोर्टल
५. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२  - बँक / विभाग / योजना इंटिग्रेशन  - वेब सर्विसेस 


                                   राज्यात सुमारे 99 %  पेक्षा जास्त संगनकीकृत 7/12 डिजिटल स्वाक्षरीत झाले असून ते सध्या महाभूमी पोर्टल वरुण पेमेंट गेटवेद्वारे नक्कल फी भरून कोणालाही डावूनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत . दररोज सुमारे 15000 ते 18000 डिजिटल स्वाक्षरीत 7/12 राज्यभरात डावूनलोड  होत  आहेत . त्याची पडताळणी सुविधा महाभूमी मोबाईल अप्प मध्ये 

     केली असून त्याचे टेस्टिंग करण्यासाठी खलील तालुक्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे .      

पुणे विभाग -  तालुका खेड - पुणे जिल्हा 
नाशिक विभाग - सिन्नर तालुका - नाशिक जिल्हा 
कोंकण विभाग - कणकवली तालुका - सिंधुदुर्ग जिल्हा  
औरंगाबाद विभाग - नांदेड तालुका - नांदेड जिल्हा 
अमरावती विभाग - मुर्तीजापुर तालुका - अकोला जिल्हा 
नागपूर विभाग - नागपूर ग्रामीण - नागपूर जिल्हा 




                          या तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांना विनंती आहे कि त्यांनी टेस्टिंग करून या पडताळणी 7/12 नमुन्यात गाव नामुंना ७/१२ मधील सर्व अद्यावत माहिती उपलब्ध होत आहे ह्याची खात्री करून आपल्या अभिप्रायासह टेस्टिंग अहवाल (UAT -अहवाल ) संबंधित तहसीलदार यांनी DDE यांचे मार्फत जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे 2  दिवसात सदर करावा ही  विनंती 


आपला
रामदास जगताप
दि.१६ .७.२०२० 

Comments

Archive

Contact Form

Send