रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महाभूमी पोर्टल वरील डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चे व आपली चावडीचे संकेतस्थळ बदलले




महाभूमी पोर्टल वरील डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चे व आपली चावडीचे संकेतस्थळ बदलले
                २०सप्टेंबर,२०१९ पासून NDC पुणे येथे स्थित असून सुरु असलेले डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चे https://aaplabhilekh.mahabhmi.gov.in/dslr  हे संकेतस्थळ आज  दिनांक २ जून २०२० पासून GCC cloud वर स्थानांतरीत
 होवून https://digitalsatbara.mahabhumi.gov.in  या लिंक वर सुरु झाले आहे .
              यापूर्वीच्या संकेतस्थळावरील सर्व नोंदणीकृत वापरकर्ते यांना पूर्वीच्याच लॉगीन आय डी व पासवर्ड वापरून आपल्या valet account वर काही रक्कम शिल्लक असल्यास तीच रक्कम  वापरून  डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड करता येतील.  
                  तसेच आपल्या गावातील कोणत्याही प्रलंबित फेरफाराची सद्यस्थिती तसेच फेरफाराची नोटीस आणि जमीन मोजणीची नोटीस पाहण्यासाठी आपली चावडी हे संकेतस्थळ आत्ता https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi   या लिंकवर सुरु आहे. त्याचा लाभ घ्या
             हे सर्व वापरकर्ते महसूल अधिकारी कर्मचारी व जनतेच्या माहिती साठी प्रशिद्ध करणेत येत आहे.
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक

ई फेरफार प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे  

Comments

Archive

Contact Form

Send