कोरोना लॉकडाऊनच्या काळात ई-फेरफार प्रकल्पाचे कामकाज- वर्क फ्रॉम होम साठी आदर्श उदाहरण
ई फेरफार प्रकल्प - वर्क फ्रॉम होम साठी आदर्श उदाहरण
कोरोना
लॉकडाऊनच्या काळात ई-फेरफार प्रकल्पाचे कामकाज
( १८ मार्च २०२० ते १.६.२०२० )
१. दररोज किमान २००० ते ३००० तलाठी मंडळ अधिकारी किंवा अन्य महसूल
अधिकारी हे ऑनलाईन कामकाज करत होते.
२. या कालावधीत तलाठी यांचे कडून ४,२९,३०६ नवीन ऑनलाईन फेरफार घेण्यात आले.
३. या कालावधीत मंडळ अधिकारी यांनी ४,४५,९५४ ऑनलाईन फेरफार निर्गत करणेत आले.
४. या कालावधीत तलाठी यांचे कडून ४१.११ लाख ७/१२ उतारे , २०.१६ लाख
खाते उतारे व २.०१ लाख फेरफार उतार चावडीतून वितरीत केले.
५. या कालावधीत महाभूमी पोर्टल वरून ३.२२ लाख डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ झाले डाऊनलोड.
६. या कालावधीत बँक पोर्टल द्वारे सुमारे ४६००० सातबारे , ४००० खाते उतारे व
२००० फेरफार उतारे असे एकूण ५२००० उतारे बँकांनी केले डाऊनलोड.
७. या कालावधीत तलाठी यांनी २.४८ लाख ७/१२ केले डिजिटल स्वाक्षरीत.
८. या कालावधीत नवीन ७ बँकांनी वेब पोर्टल साठी केले सामंजस्य करार
वर्क फ्रॉम होम साठी ई फेरफार प्रकल्प एक आदर्श उदाहरण .
शासनाचा महसूल विभाग काळा सोबत बदलत आहे हे मात्र खरे
ई फेरफार प्रकल्प
ई फेरफार प्रकल्प - वर्क फ्रॉम होम साठी आदर्श उदहरण .
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प
दिनांक १.६.२०२०
नमस्कार मा साहेब , मी ता जि उस्मानाबाद येथील राहिवासी असून हस्तलिखित ७ /१२ व डिजिटल ७/१२ मधील विसंगती बाबत इ हक्क प्रणालीचा वापर करून ऑनलाईन अर्ज केला केला आहे .प्रणाली हि खूप उत्तम आहे . माझा प्रश्न हा आहे कि ? ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तलाठी यांनी किती दिवसात अर्ज तपासून अभिप्राय देणे अपेक्षित आहे ? आणि वेळेपेक्षा जास्त कालावधी घेत असतील तर कोणाकडे अर्ज करायचा ? अर्ज जर चुकला असेल तर चुकला म्हणून तरी कळविणे अपेक्षित आहे म्हणजे दुरुस्त करून परत देता येईल. जवळपास महिना होऊन देखील तलाठी यांच्याकडून अर्जास काही उत्तर नाही . ह्या बाबतीत मदत करावी
ReplyDelete