रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज दि ७.८.२०१९ पासून " आपली चावडी "वर ( तलाठी चावडी चा डिजिटल नोटीस बोर्ड ) प्रशिद्ध होणार जमीन मोजणीची नोटीस

नमस्कार मित्रांनो , 


विषय - "आपले चावडी" वर प्रशिद्ध  होणार  जमीन मोजणीची नोटीस 


              आपल्या गावचे तलाठी कार्यालय म्हणजेच चावडी व या चावडीवर अनेक महत्वाच्या नोटीसा प्रशिद्ध  कराव्या लागतात मात्र काळाच्या ओघात प्रत्येक खातेदाराला / नागरिकाला आपल्या चावडी वर प्रशिद्ध केलेली  नोटीस पहायला मिळेलच असे सांगता येत नाही म्हणून ई महाभूमी प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या ई फेरफार प्रकल्पाचा एक भाग म्हणून सुरु केलीली आपली चावडी ( तलाठी कार्यालयाचा डिजिटल नोटीस बोर्ड )  अप्लावाधीतच जनतेमध्ये प्रशिद्ध झाली आहे . अशा तलाठी कार्यालयाचे डिजिटल नोटीस बोर्डवर तलाठी कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रत्येक फेरफार नोंदी ची नमुना ९ मधील नोटीस सिस्टीम द्वारे प्रशिद्ध केली जात आहे . 

  आपले चावडीवर दिसते फेरफाराची नोटीस -
                     आपली चावडी या संकेतस्थळाचे लोकार्पण मा. मुख्यमत्री महोदय यांचे शुभ हस्ते व मा. महसूल मंत्री  महोदयांचे शुभ हस्ते दि १ मे, २०१८ रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर केले होते . त्या आपली चावडी संकेतस्थळावर राज्यातील सर्व ४४००० गावचे प्रलंबित फेरफार त्याच्या तपशिला सह सर्व माहिती दर्शविणारी  ई फेरफार मधील फेरफाराची  नमुना ९ ची नोटीस कोणत्याही सामान्य माणसाला कोणत्याही वेळी पाहण्यासाठी / हरकत नोंदविण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत .  

आपली चावडीवर आता  जमीन नोटीस देखील  दिसणार -
                         याच आपली चावडी संकेतस्थळावर आत्ता त्या गावात  ई मोजणी या भूमी अभिलेख विभागाच्या प्रणालीवर तयार होणारी प्रस्तावित जमीन  मोजणी ची नोटीस सदरचे प्रकरण निर्गत होई पर्यंत मोफत पाहण्यासाठी आज पासून सिस्टीम द्वारे उपलब्ध करून दिली आहे.  त्यामुळे आपल्या गावात / आपल्या शेता लगतच्या जमिनीची  प्रस्तावित जमीन मोजणी नोटीस  समान्य जनतेला घरबसल्या दिसू लागेत . या मध्ये मोजणीचे स.नं.  मोजणीचा दिनांक , मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव व मोबाईल नंबर  इत्यादी माहिती मिळेल. मुळे या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानता येईल असा मला विश्वास  वाटतो . 

आपल्या गावची जमीन मोजणीची नोटीस पाहण्यासाठी 

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/aaplichawdi/

ही लिंक  वापरा 

     फेब्रु २०१९ नंतर चे आपल्या गावात जमीन मोजणी प्रकरण मोजणी विभागाकडे सुरु असल्यास येथे नक्की दिसेल .

ई फेरफार मधील फेरफार नोटीस व फेरफार सद्यस्थिती या बरोबरच  ई मोजणीची नोटीस दिसू लागल्याने लवकरच आपली चावडी सामान्य जनतेला उपयुक्त  ठरेल यात मला  शंका वाटत नाही . 



आपला 
रामदास जगताप 
दि ७.८.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send