रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

खरीप २०१९ च्या पिक पाहणी साठी व ई पीक पाहणी मोबाईल आप साठी अद्यावत व राज्यात पिकांचे एकाच यादी वापरणे बाबत



नमस्कार मित्रांनो , 

विषय - खरीप २०१९ च्या पिक पाहणी साठी  व ई पीक पाहणी मोबाईल आप साठी अद्यावत  व राज्यात  पिकांचे  एकाच यादी  वापरणे बाबत 



                              राज्यात ई फेरफार प्रणाली कार्यान्वित झाली तरी पीक पाहणीच्या नोंदी अद्यावत करणेसाठी वापर्नेत येणाऱ्या OCU प्रणाली मध्ये वापर्नेत येणारी पिकांची यादी सर्व जिल्हया साठी / तालुक्यांसाठी एकसमान नव्हती. ( crop masters were not uniform )  त्यामुळे पिक निहाय वळ आयार करण्यात अडचणी येत होत्या तसेच शेतात घेतलेल्या पिकांची अचूक नोंद ७/१२ च्या नमुना १२ मध्ये घेण्यासाठी शेतकरी यांचा सहभाग वाढविण्यासाठी तयार केलेल्या व सध्या ६ तालुक्यात पथदर्शक प्रकल्प म्हणून राबविण्यात येत असलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पामध्ये एकाच पिकांची यादी वापरणे आवश्यक असल्याने चारही कृषी विद्यापीठांचे मदतीने राज्याचे कृषी आयुक्त यांनी निश्चित करून दिलेल्या क्रॉप कोड व क्रॉप लिस्ट ( पिकांची यादी ) वापरून या वर्षीच्या खरिप हंगामाची पिक पाहणी करण्यासाठी नवीन OCU प्रणाली आज पासून नाशिक जिल्ह्यातील निफाड व सिन्नर तालुके वगळता सर्व तालुक्यांना ही सुविधा वापरून पीक पाहणी अद्यावत करता येईल . 
       त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तलाठी यांनी https://mahaferfarnas.enlightcloud.com/testsite3/ ही लिंक वापरावी . 

ही लिंक वापरणे पूर्वी ,

 १. DBA यांनी OCU मध्ये लोगिन करून आपल्या तालुक्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांची निवड करावी . तसेच बांधावरील झाडांची यादी देखील निवडावी म्हणचे तलाठी यांना त्यापैकी पिके निवडून पीक पाहणी करता येईल .
२. कोणतेही पीक त्यामध्ये उपलब्ध नसल्यास कृपया हेल्प डेक ला कळवावे .


आपला 
रामदास जगताप 
दि ९.८.२०१९ 

Comments

  1. नमस्कार सर मी भिमसिंग पाटील नाशिक ,सर नाशिक तालुका केव्हा,किती दिवसात क्लाउड वर जाणार आहेत,ही माहिती मिळेल का
    करण मी माडसंगवी ता नाशिक येथे जमीन खरेदी केली आहे पण त्याची नोंद करताना तलाठी म्हणतात की हा गट अहवाल 1 मध्ये आहे दव कलाउड वर डेटा गेला की मग नोंद होईल 1 वर्ष झाला सर मी सामान्य शेतकरी आहे काय करावे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send