परिपूर्ण डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ साठी DSP_DDM या नवीन सुविधे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - DSP_DDM या नवीन सुविधे बाबत .
संगणकीकृत ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करून जनतेला कोठूनही व केंव्हाही उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या प्रत्येक जिल्ह्यात / त्लुक्यात व गावात तलाठी स्थरावर ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्याचे काम सुरु आहे . त्यासाठी DSP ( DIGITALLY SIGNED PDF ) हि सुविधा वापर्नेत येत आहे . सध्या कोणताही ७/१२ पहिल्यांदा / एकदाच डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सोय या सुविधे मध्ये आहे व या सुविधेतून सुमारे १०५ लक्ष ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले आहेत . मात्र एखाद्या ७/१२ वर फेरफार मंजूर झाल्याने होणारा बदल तसेच पीक पाहणी च्या नोंदी घेतल्याने झालेला बदल डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वर अद्यावत करण्यासाठी DSP_DDM ही नवीन सुविधा लवकरच उपलब्ध करुन देनेत येत आहे . ही सुविधा कशी वापरावी व त्यातील महत्वाचे बदल समाजाने साठी सोबत DSP_DDM User Manual जोडले आहे
या सुविधेतील महत्वाचे बदल
१. हि सुविधा म्हणजे DDM व DSP दोन सुविधांचे मर्जिंग / एकत्रीकरण आहे .
२. हि सुविधा कोणताही ७.१२ अ) पहिल्यांदा स्वाक्षरीत करणे , ब) फेरफार पश्चात स्वाक्षरीत करणे व क ) पीक पाहणी च्या नोंदी अद्यावत झाल्यामुळे स्वाक्षरीत करणे अशा तीन पर्यायात उपलब्ध आहे .
३. कोणताही ७/१२ DDM मधून वितरीत करण्यापूर्वी तो दिजीअल स्वाक्षरीत करावा लागेत .
४. कोणत्याही एकदा डिजिटल स्वाक्षरीत झालेल्या ७/१२ वर फेरफार प्रमाणित झाला असेल तर तो ७/१२ तलाठ्याने डिजिटल स्वाक्षरीत केल्या शिवाय त्यावर दुसरा फेरफार प्रमाणित करता येणार नाही . ( सध्या असे आहे मात्र एकदा सर्व फेरफार प्रमाणित झालेले व फेरफार पश्चात स्वाक्षरीसाठी शिल्लक असलेले ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाल्या नंतर मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रमाणित करताच तो ७/१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत होईल )
५. या पुढे गाव नमुना ७ व गाव नमुना १२ चा डेटाबेस स्वतंत्र केला असल्याने फेरफार प्रमाणित झाला तरच नमुना ७ डिजिटल स्वाक्षरीत होईल आणि पिक पाहणीच्या नोंदी घेतल्या तरच नमुना १२ स्वतंत्र डिजिटल स्वाक्षरीत होईल आणि नमुना ७ व १२ एकत्र मिळून ७/१२ दाखवला जाईल .
६. या पुढे हा ७/१२ कोणी डिजिटल स्वाक्षरीत केला आहे त्याचे नाव ७/१२ वर छापले जाणार नाही .
७. या पुढे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ QR CODE सह दाखवला जाईल तसेच काही कालावधी पूर्वी
७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाला असला तरी त्या वर त्यानंतर काही फेरफार घेतले असतील व प्रलंबित असतील तर ते , तसेच काही फेरफार घेवून प्रमाणित झाले असतील तर ते आणि काहे पिकांच्या नोंदी नमुना १२ मध्ये भरल्या असतील तर तसे ७/१२ वर तळटीप म्हणून दर्शविण्यात येईल .
८. जर मंडळ अधिकारी फेरफार मंजूर करीत असताना " सदर ७/१२ वर DSP या आज्ञावली मध्ये प्रलंबित असल्यामुळे हा फेरफार मंजूर अथवा नामंजूर करता येणार नाही " असा मेसेज येत असेल तर हा ७/१२ प्रथम तलाठ्याकडून डिजिटल स्वाक्षरीत करून घ्यावा .
९. कोन्ताहे ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाला नसेल तर तो DDM मधून वितरीत करण्यापूर्वी डिजिटल स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे त्यावेळी प्रणाली मध्ये " सदर सर्वे / गट डिजिटल स्वाक्षरीत साठी DSP चे काम अपूर्ण आहे तथापि सदर सर्वे / गट DSP डिजिटल स्वाक्षरीत केल्यानंतरच प्रिंट करता येईल " असा मेसेज दिला आहे .
या महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या शासकीय संकेत स्थळावर उप्लाध होईल आणि या डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चे वैधता ७/१२ वर नमूद संकेतांक क्रमाक वापरून करावी असे नमूद केले आहे .
१०. हा परिपूर्ण डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धारणेत येईल मात्र कोणत्याही प्रिंटेड ७/१२ ची वैधता पडताळणी https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/Satbara या संकेत स्थळावरून करणे आवश्यक राहील .
११. सध्या हि सुविधा फक्त सतरा तालुका , सिन्नर तालुका , मनोरा तालुका व जुन्नर तालुका यांना उपलब्ध करून दिले आहे त्या चे टेस्टिंग करून त्यांचा UAT ( वापरकर्ता चाचणी ) अहवाल प्राप्त होताच पुढील आठवड्यात उपलब्ध करून दिली जाईल ह्याची नोंद घ्यावी .
सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते यांनी बारकाईने वाचून समजून घ्यावात व त्या प्रमाणे कार्यवाही करावे हि विनंती .
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प , महारष्ट्र , पुणे
दि १३.७.२०१९
user manual nai aahe sir ithe jodlele
ReplyDeleteUser manual is not attached sirji
ReplyDelete