रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

विषय-वनहक्क पट्टेधारकांचे ई-फेरफार प्रणाली मधील कामकाजाबाबत मार्गदर्शक सूचना.


9


                           विषय-वनहक्क पट्टेधारकांचे ई-फेरफार प्रणाली मधील कामकाजाबाबत मार्गदर्शक सूचना.

                           संदर्भ- महसूल व वन विभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्रं.3-10/2011/ प्र.क्रं. 175/           
                                          -3 दिनांक 02/01/2012

                            संदर्भीय शासन परिपत्रकान्वये अनुसुचित जमाती व इतर पांरपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 नुसार पात्र दावेदारांना मंजूर झालेल्या वनपट्यांच्या नोंदी 7/12 सदरी घेण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती निश्चित केली आहे. त्याअन्वये गा..नं. 7/12 च्या भोगवटादार/ कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन (वने) अशी नोंद करावी व  वनपट्टाधारंकाचे नाव 7/12 मध्ये इतर हक्क सदरी घेण्यात यावेत. या अधिनियमान्वये प्रधान केलेल्या व हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नसेल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विवाहीत व्यक्तीच्या बाबतीत नवरा व बायको या दोंघाच्या नावे संयुक्त नोंद घेण्यात यावी. तसेच या हक्कावर बँक कर्ज घेता येईल व कर्जाची नोंद इतर हक्कात घेता येईल. असे स्पष्ट निर्देश या परिपत्रकान्वये दिलेले आहेत. तथापि अशा नोंदी DILRMP अंतर्गत संगणकीकृत झालेल्या 7/12 मध्ये ई-फेरफार प्रणालीच्या माध्यमातून कशा पध्दतीने घेण्यात याव्यात याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेची विचाराधीन होते. त्याप्रमाणे खालील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे.

1.        वनपट्टाधारकांची नोंद व वारस नोंद घेणे बाबत.
            ई-फेरफार प्रणाली अंतर्गत संगणकीकृत 7/12 मध्ये  वनपट्टाधारकांची  नावे  गा.न.नं. 7/12 च्या इतर हक्कात फेरफार घेवून घेण्यात यावीत.  तसेच असा वनपट्टाधारक मयत झाल्यास त्याचा वारसांनाची नोंद -फेरफार प्रणालीतील इतर फेरफार प्रकारातून घेण्यात यावी. मात्र अशा पध्दतीने घेण्यात येणाऱ्या  वारस नोंदीचा संपुर्ण तपशिल तलाठयाला टाईप करून नमूद करावा लागेल. याची नोंद घ्यावी.

2.       वनपट्टाधारकांचे खाते उतारे (गा..नं. 8) बाबत.
            संगणकीकृत 7/12 च्या इतर हक्कात दाखल असलेल्या वनपट्टाधारकांचे खातेउतारा           (गा..नं. 8) -फेरफार प्रणालीत सध्या तयार होत नाहीत. त्यामुळे अशा सर्व वनपट्टाधारंकाचे खातेउतारे गा..नं. 8अ विहीत नमुन्यात हस्तलिखीत पध्दतीने अभिलेखीत करण्यात यावेत व ते वेळोवेळी अद्यावत करण्यात यावेत.

3.       वनपट्टाधारकांचे कर्ज बोझे व पीक कर्जाच्या नोंदी घेण्याबात.
            वनपट्टाधारकाने अशा पट्टाधारीत जमिनीवर घेतलेल्या बँक कर्जाच्या नोंदी व विविध कार्यकारी सहकारी सोयायटीच्या -कराराच्या नोंदी-फेरफार प्रणालीतील इतर फेरफार  प्रकार वापरून घेण्यात याव्यात. वेळोवेळी अद्यावत करण्यात याव्यात. सदरची कार्यपध्दती ई-फेरफार प्रणाली मध्ये आवश्यक ते बद्दल करण्यात येईपंर्यत अंवलबिंत यावी. सदरच्या माग्दर्शक सूचना सर्व संबधितांना निदर्शनास आणव्यात ही विनंती.


आपला 
रामदास जगताप
दि  ११.७/२०१९ 






Comments

Archive

Contact Form

Send