रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ODC अहवाल १ ते ४१ व त्यांच्यासाठी च्या दुरुस्ती सुविधा

ODC  अहवाल व दुरुस्ती सुविधा  

1)       अहवाल १ :- गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक यांचा मेळ बसत नाही ते सर्व्हे क्रमांक.
Solution:- अहवाल १ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक १) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती किंवा तहसीलदार यांनी सुनावणी घेवून कलम १५५ प्रमाणे आदेश पारित केला असल्यास ई फेरफार मधून अहवाल ची १ दुरुस्ती (हा पर्याय वापरून कुरुस्ती  करावी.


२) अहवाल २ : गाव नमुना ७ व ८अ मधील क्षेत्राचा फरक.
Solution:- अहवाल २ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २) गाव निहाय ८अ च्या क्षेत्राची दुरुस्ती (Village Processing for ८अ) करावी



३) अहवाल ३ : गाव नमुना १ व ७ मधील क्षेत्रांचा फरक.
Solution: - अहवाल ३ च्या दुरुस्तीसाठी गाव नमुना ७ मध्ये चूक असल्यास कलम १५५ च्या आदेशाने क्षेत्र दुरुस्तीचा आदेश हा फेरफार घ्यावा व गाव नमुना १ मध्ये त्रुटी असल्यास अद्ययावत आकारबंद  भरावा 


4) अहवाल ४: गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र.
Solution: - अहवाल ४च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ४) अहवाल ४ मध्ये चूकीच्या पद्धतीने दर्शवलेल्या एकूण क्षेत्राची दुरुस्ती या पर्यायाचा वापरून दुरुस्ती करावी . 



5) अहवाल ५ : ७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक.
Solution:- अहवाल ५ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ५ ) ७ वर असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करणे हा पर्याय वापरावा.


6) अहवाल ६ : चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे.
Solution:- अहवाल ६ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ६) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्तीची सुविधा वापरून नावे योग्य पद्दतीने दुरुस्त करावीत.


7) अहवाल ७: खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार.
Solution: - अहवाल ७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ७ वापरून  खाता प्रकार दुरुस्ती वापरावा


8) अहवाल ८: फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे. .(फेरफार क्रमांक ०)
Solution: - अहवाल ८ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ८) शून्य फेरफार क्रमांक दुरुस्ती वापरावा.



9) अहवाल ९ : चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्र.
Solution:- अहवाल ९ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ९) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून सामान्य फेरफार द्वारे सर्वे क्रमांक बदलणे या पर्यायाचा वापर करून आदेश व दस्तावेज फेरफार प्रकारातून फेरफार घ्यावा.


10) अहवाल १० : १६ आणे हून जास्त आणेवारी असलेले सर्व्हे क्र.
Solution: - अहवाल १० च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक १०) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून सामान्य फेरफार द्वारे खातेदाराच्या नावासमोरील आणेवारीचे क्षेत्रात रूपांतर करण्यात यावे.



11) अहवाल ११: इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही.
Solution: - अहवाल ११ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ११) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने इतर अधिकारातील नोंदीचा प्रकार बदलणे या पर्यायाचा वापर करावा.



12) अहवाल १२: फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी.(फेरफार क्रमांक ०)
Solution: - अहवाल १२ च्या दुरुस्तीसाठी ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे या पर्यायाचा वापर करावा


13) अहवाल १३: भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही.
Solution: - अहवाल १३ च्या दुरुस्तीसाठी ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने भूधारणा बदलणे हा फेरफार घ्यावा.


14) अहवाल १४ : ७ भरलेला आहे पण १२ भरलेला नाही.
Solution:- अहवाल १४ च्या दुरुस्तीसाठी  पीक पाहणी आज्ञावली - ओ सी यु( OCU ) मधून गाव नमुना १२ ची माहिती भरावी.


15) अहवाल १५. निरंक अथवा - अथवा अथवा TKN असलेले खाते.
Solution:- अहवाल १५ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक १५)निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' सलेले खाता क्रमांक दुरुस्ती वापरावा.


16) अहवाल १६. खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी.
Solution: - अहवाल १६ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक १६) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार जर हा निरंक ७/१२ योग्य (अस्तित्वात असल्यास) असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधील अहवाल १ ची दुरुस्ती हा पर्याय वापरून नवीन खाते समाविष्ट करावे अथवा जर हा निरंक सातबारा काढून टाकायचा असल्यास अहवाल क्र. १६ ची दुरुस्ती पर्याय वापरून हा ७/१२ नष्ट करावा.


17) अहवाल १७. खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक.
Solution: - अहवाल १७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक १७) खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणे वापरावा.


18) अहवाल १८. सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी.
Solution: - अहवाल १८ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक १८) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार  ई-फेरफार आज्ञावली मधून सामान्य फेरफारद्वारे खातेदारांच्या नावासमोरील क्षेत्र सामूहिकरीत्या (फक्त एक नावासमोरील) नमूद करावे अथवा सर्व नावांसमोर (० % अथवा १००% क्षेत्र नमूद करणे) क्षेत्र नमूद करणे.


19) अहवाल १९. सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी.
Solution: - अहवाल १९ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक १९) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधील सामान्य फेरफार घेऊन खातेदाराच्या नावासमोरील आणेवारीचे क्षेत्रात रूपांतर करण्यात यावे.


20) अहवाल २०. बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी.
Solution:- अहवाल २० च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २०) बंद सातबारा ची यादीचा अहवाल- हा माहितीस्तव आहे जर या ७/१२ यादीपैकी काही ७/१२ पुन्हा चालू करावयाचे असल्यास ई फेरफार आज्ञावली मधून आदेशाने बंद ७/१२ चालू करणे हा फेरफार घ्याव

21) अहवाल २१. ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.
Solution:- अहवाल २१ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २१) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार  जर ७/१२ वरील क्षेत्र योग्य असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने एकक दुरुस्ती फेरफार घेऊन एकक बदलण्याचा फेरफार घ्यावा अन्यथा जर ७/१२ वरील एकक योग्य असल्यास क्षेत्र दुरुस्ती (शेती) अथवा क्षेत्र दुरुस्ती (एन.ए) ७/१२ साठी या फेरफाराद्वारे योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात.



22) अहवाल २२. शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक.
Solution: - अहवाल २२ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २२) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खात्यावरील क्षेत्र दुरुस्ती फेरफार घेऊन खाते क्रमांक वगळणे ही सुविधा वापरावी अथवा क्षेत्र दुरुती करून घ्यावे.


23) अहवाल २३. पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक.
Solution: - अहवाल २३ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २३) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार पीक दुरुस्ती आज्ञावली (OCU) - ओ सी यु आज्ञावली मधून पुढील वर्षाचा डाटा नष्ट करणे ही सुविधा वापरावी.



24) अहवाल २४. एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक.
Solution:- अहवाल २४ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २४) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून सामान्य फेरफार सर्वे क्रमांक बदलणे हा पर्याय वापरून आदेश फेरफार प्रकारातून फेरफार घ्यावा.



25) अहवाल २५. भूधारणा : भोगवटदार - १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक.
Solution: - अहवाल २५ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २५) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार  ई-फेरफार आज्ञावली मधून अनोंदणीकृत फेरफार --भूधारण वर्ग-१ मध्ये चुकीचे दर्शविलेले सर्वे क्रमांक वगळणे या पर्यायाचा वापर करावा.


26) अहवाल २६. भूधारणा : भोगवटदार - २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक.
Solution: - अहवाल २६ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २६) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून अनोंदणीकृत फेरफार --नियंत्रित सत्ता प्रकारची नोंद या पर्यायाचा वापर करावा.


27) अहवाल २७. खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक.
Solution: - अहवाल २७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २७) खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाते क्रमांक / नावे काढून टाकणे.


28) अहवाल २८. समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक.
Solution:- अहवाल २८ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २८) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून तलाठी स्तरावरील कलम १५५ च्या आदेशाने चूक दुरुस्ती फेरफार घ्यावा.


29) अहवाल २९. इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
Solution: - अहवाल २९ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २९) हस्तलिखित 7/12 प्रमाणे नोंदी आल्या नसल्यास त्या योग्य ते फेरफार घेऊन भरून घ्याव्यात.


30) अहवाल ३०. ७/१२ वरील क्षेत्र लागवडीगोग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक
Solution: - अहवाल ३० च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३०) सदर सातबारा (एकाच ७/१२ वर) शेती व बिनशेती क्षेत्र नमूद असल्यास तो पूर्णतः शेतीचा किंवा बिनशेती क्षेत्र चा करावा त्यासाठी इ फेरफार आज्ञावली मधील कलाम १५५ चा क्षेत्र दुरुस्तीचा आदेश घेऊन योग्य दुरुस्ती करावी.


31) अहवाल ३१. शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक.
Solution: - अहवाल ३१ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३१) सदर सातबारा वर क्षेत्र दुरुस्ती आवश्यक असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ आदेशाने क्षेत्र दुरुस्ती हा फेरफार घ्यावा अन्यथा योग्य क्षेत्र असल्यास सदर सातबाराचे क्षेत्र हे २० हेक्टर अथवा ९९ आर पेक्षा जास्त असल्यामुळे सदर सातबारावर फेरफार घेण्यासाठी एकवेळ तहसीलदार यांची मान्यता घ्यावी .


32) अहवाल ३२. अहवाल १ मध्ये क्षेत्रामधील फरक हा ०.०१ पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
Solution:- अहवाल ३२ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३२) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार  ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती हा फेरफार घ्यावा व योग्य ती दुरुस्ती करावी .


33) अहवाल ३३.खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक.
Solution: - अहवाल ३३ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३३) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधील खाते विभागणी हा पर्याय वापरून सदर सर्वे क्रमांकावर खाताविभागणी ही प्रक्रिया पूर्ण करावी.


34) अहवाल ३४. गावनिहाय साझा आणि मंडळ नोंदणीचा अहवाल.
Solution:- अहवाल ३४ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३४) सदर अहवाल माहितीवजा देण्यात आला आहे - युझर क्रीएशन ( UC ) module मधून आपले गाव योग्य त्या सझा व मंडळ च्या अखत्यारीत्या नोंदवून घ्यावे.


35) अहवाल ३५. इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
Solution: - अहवाल ३५ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३५) अहवाल ३५ ची दुरुस्ती वापरावा. (In development)


36) अहवाल ३६. प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक.
Solution: - अहवाल ३६ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३६) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्ती फेरफार वापरून योग्य ती दुरुस्ती करावी.


37) अहवाल ३७. खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट.
Solution:- अहवाल ३७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३७) खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणे.


38) अहवाल ३८. गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीचा फ़रक.
Solution: - अहवाल ३८ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३८) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार ई-फेरफार आज्ञावली मधून अनोंदणीकृत फेरफार --आकारणी दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा.


39) अहवाल ३९. चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,ए.कु.मॅ नावांची खाती.
Solution: - अहवाल ३९ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३९) चुकीच्या पद्दतीने भरलेली अपाक/ ए कु म ची नावे ही टोपण नावात भरावीत. जर अशी नवे दुसऱ्या ओळीत भरलेली असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाते दुरुस्ती फेरफार वापरून योग्य ती दुरुस्ती करावी.

40) अहवाल ४०. खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे  असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांकनिहाय यादी.
Solution:- अहवाल ४० च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ४०) खातामास्टर वरील अतिरिक्त नावे काढणे  हा पर्याय वापरावा.


41) अहवाल ४१. अहवाल 5- अतिरिक्त
Solution:- टीप :  सदर अहवाल निरंक  करणेसाठी     अहवाल ४१.१ ( अहवाल ५ - अतिरिक्त )   नुसार खातारजिस्टर व ७/१२ वरील स्थिती पाहून  दुरुस्ती सुविधा मधील  पर्याय क्रमांक  ४१.१)- अतिरिक्त  अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.१   किंवा  ४१.२)- अतिरिक्त  अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.२-खाता विभागणी   ४१.३)- अतिरिक्त  अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.३-खाता क्र.बदलने  किंवा  ४१.४)- अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.४-खाता क्र.बदलने(सर्व्हे क्रमांक निहाय वापरण्यात यावा .


  अहवाल ४१. अहवाल 5.1 - अतिरिक्त-
 जर एकाच खात्यातील नावे त्या खात्यातील वेगवेगळ्या ७/१२ वर वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली असलीतरी त्यांचे खाते एकच होते अथवा खात्यातील समाविष्ट ७/१२ वर नावांची संख्या व नावे समान नसल्यास अशी सर्व खाती व त्यावरील स.नं./ गट नं. या ODC अतिरिक्त अहवाल ५.१ मध्ये दाखविनेत येतील व या मध्ये खालील प्रमाणे दुरुस्ती करावी 
१. ODC मधील अतिरिक्त अहवाल ५.१ पहावा त्यामध्ये अश्या पद्धतीने खातेदाराच्या नावांमध्ये व संखे मध्ये तफावत असल्यास अशी सर्व खाती व ७/१२ वरील नावे दाखविनेत येतील. 
२. जर आपणास वेगवेगळी नावे वेवेगळ्या ७/१२ वर हवी असल्यास अशी दुरुस्ती ODU / री एडीट मधून खाते विभागणी करून करावी. 
३. जर आपणास वेगवेगळ्या सर्वे क्रमांकावर असलेली वेगवेगळी नावे सर्व सर्वे क्रमांकावर समान करावयाची असल्यास ODC मधील अतिरिक्त अहवाल ५ ची दुरुस्ती यां सुविधेचा वापर करून अहवाल निरंक करावा  

Comments

Archive

Contact Form

Send