ई हक्क प्रणाली ( PDE) फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज घेण्याबाबत
प्रति,
डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट (डी.डी.ई)
(सर्व)
विषय :- ई हक्क प्रणाली ( PDE) फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज घेण्याबाबत.
राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग जिल्हा वगळता ३४ जिल्ह्यांचे ई
फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर ESDS SOFTWARE SOLUTIONS PVT.LTD. या GCC CLOUD वर झाले असल्याने
या जिल्ह्यांना PUBLIC
DATA ENTRY -ई-
हक्क प्रणाली मध्ये आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्यालयात
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा ई हक्क प्रणाली मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
३४ जिल्ह्यातील
कोणत्याही खातेदाराला पुढील ८ प्रकारचे फेरफार
घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज ई हक्क प्रणाली मधून दाखल करता येतील.
१. वारस नोंद,
२.
बोजा दाखल करणे,
३. बोजा कमी करणे,
४. ई-करार नोंदी,
५. मयताचे नाव कमी करणे,
६ अज्ञानपालनकर्ता चे नाव( अपाक (कमी करणे,
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे) व
८. विश्वास्थांचे नाव कमी करणे.
हे 8 प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित
व्यक्तीला ई-हक्क
प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील.
सध्या ही सुविधा जनतेला उपलब्ध करून दिलेली
नाही.
तथापि आपल्याकडे आलेले हस्तलिखित अर्ज ( अश्या फेरफार साठीचे ) संबंधित तलाठी यांनी
https://pdeigr.maharashtra.gov.in या वेबसाईट वर लॉगीन करून आपल्या कडे उपलब्ध असलेले फेरफार
अर्जांवर कार्यवाही करून पहावी. अश्या पद्धतीने घेणेत
आलेले अर्ज तलाठी यांना ई-फेरफार मध्ये PDE DASHBOARD मध्ये पुढील कार्यवाहीसाठी उपलब्ध होतील . तलाठी स्तरावर संबधित
अर्जावर कार्यवाही झाल्यावर सदर प्रणाली जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या करिता संबंधित तलाठी यांनी या ८ फेरफार प्रकारातील प्राप्त अर्जांवर ई हक्क मधून कार्यवाही करावी . व त्याचा Fedback सादर करावा.
.
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
Sir bojha kami karnyachababat PDE marfat arj karnyacha prayatn kela parantu ferfar kramank taktach Unauthorised Access कृपया लॉग इन करा .... asa msg yeto v logout hot ahe..
ReplyDelete