ई फेरफार प्रणालीत नवीन ७/१२ तयार करणे ची कार्यपद्धती
नमस्कार मित्रांनो ,
विषय - नवीन ७/१२ तयार करणे .
सर्वसाधारणता नवीन ७/१२ ऑनलाईन तयार करण्याची करण्याची करणे दोन आहेत .
१. हस्तलिखित मध्ये ७/१२ असताना ऑनलाईन ७/१२ तयार करण्यासाठी डेटाएन्ट्री करताना काही ७/१२ ऑनलाईन ला भरले नसणे .व
२. बिनशेती आदेश , भूसंपादन आदेश , जमीन विभागणी आदेश ,जमीन एकत्रीकरण आदेश , जमीन वितरण / मंजुरी आदेश , ई . आदेशामुळे होणारे कमी जास्त पत्रक (कजाप) , फाळणी १२ , प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून तितक्याच क्षेत्राचे पोट हिस्से तयार करणे साठी नवीन ७/१२ तयार करणे .
या दोन्ही प्रकारे नवीन ७/१२ भरताना अथवा तयार करताना दोन स्वतंत्र सुविधा वापरणे आवश्यक आहे .
अ) हस्तलिखित मध्ये ७/१२ अस्तित्वात असताना ऑनलाईन ७/१२ तयार करण्यासाठी डेटाएन्ट्री करताना काही ७/१२ ऑनलाईन ला भरले नसल्यास तहसीलदार यांचे कडून आशा ७/१२ ची डेटाएन्ट्री पूर्ण करण्यासाठी एका गावासाठी एक हस्तलिखित आदेश घ्यावा व त्या आदेशाने नवीन ७/१२ ऑनलाईन खालील पर्यायातून भरावेत .
ई फेरफार प्रणाली लॉगीन ------> फेरफार माहिती भरणे ---> तहसीलदार यांचे आदेशाचा फेरफार -----------------> तहसीलदार यांचे आदेशाचा फेरफार ची माहिती भरणे .------------->
ब) बिनशेती आदेश , भूसंपादन आदेश , जमीन विभागणी आदेश ,जमीन एकत्रीकरण आदेश , जमीन वितरण / मंजुरी आदेश , ई . आदेशामुळे होणारे कमी जास्त पत्रक (कजाप) , फाळणी १२ , प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून तितक्याच क्षेत्राचे नवीन पोट हिस्से तयार करणे साठी नवीन ७/१२ तयार करणे आवश्यक असते अशा वेळी तलाठी यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावी .
ई फेरफार प्रणाली लॉगीन ------> फेरफार माहिती भरणे ---> आदेशाने जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार करणे ------> आदेशाने जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार करणे ची माहिती भरणे --------------> आदेशाने जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराची घोषणा .--------------
दोन्ही पर्याय वेगवेगळे असून त्यांचा वापर सुद्धा योग्या त्या कारणासाठी करणे आवश्यक आहे .
आपला
रामदास जगताप
दि २०.६.२०१९
Comments