सर्व डी डी ई . उपविभागीय अधिकारी , तहसीदार डि. बी. ए , मंडळ अधिकारी व तलाठी यांना महत्वाची सुचना -
नमस्कार मित्रांनो..
1. सर्व डि. बी. ए यांना महत्वाची सुचना -
संध्याकाळी ६:०० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत सर्व डिबीए यांनी odc मध्ये लाॅगीन करुन सर्व १ ते ४१ अहवाल अद्ययावत करुन तालुक्याचा समरी अहवाल EXCEL मध्ये EXPORT करावा. हेल्प डेस्क व DDE च्या ईमेल वर पाठवावा. या द्वारे कलम १५५ च्या दुरुस्ती व DSP साठी पात्र सातबारा ची संख्या कळु शकेल. त्या प्रमाणे तहसिलदार/उपविभागीय अधिकारी यांनी कामाचे नियोजन करावे.
2. अहवाल ३ दुरुस्ती बाबत सूचना -
अहवाल क्रमांक ३ ची दुरुस्ती (गाव नमुना १- आकारबंद ) ODC आज्ञावली मध्ये आज पासून देण्यात आली आहे तसेच अहवाल दुरुस्ती केल्या नंतर त्यास तलाठी यांनी ODC आज्ञावली मध्ये मान्यता देणे आवश्यक आहे .त्याशिवाय अहवाल ३ निरंक होणार नाही . आकारबंद नेहमी हे.आर चौ मी.मधेच भरावा .
३. जुना 7/12 बंद करने व नवीन पोट हिस्से तयार करणे बाबत सूचना -
जुना 7/12 बंद करने व नवीन पोट हिस्से तयार करणे या फेरफार प्रकारा बाबत तहसीलदार यांची USER CREATION मधील मान्यता काढण्यात आलेली असल्यामुळे यापूर्वी तहसीलदार यांचे कडे मान्यतेकरिता पाठविण्यात आलेले गट तातडीने release/उपलब्ध करून घेण्यात यावेत .
4. DATA CARD वापरणे करिता सूचना
शासन प्रत्येक कार्यरत तलाठी व मंडळ अधिकारी यांना दरमहा ७५०/- डाटा कार्ड च्या वापरासाठी देते ती रक्कम संबंधीतांना आदा करावी . तथापी अनेक तलाठी मं अ डेटा कार्ड योग्य स्पिड व क्षमतेचे वापरत नाहीत तर फक्त मोबाईलवर लॅपटाॅप कनेक्ट करुन ई फेरफार चे काम करतात त्यामुळे अनेक वेळा अडचणी येतात असे दिसून येते . मोबाईलवर व्हाटस् अॅप , फेसबुक , युट्यूब , ईमेल चालू असतात तसेच मधेच व्हाईस काॅल चालू असतात त्यामुळे इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीत . अनेक तलाठी फक्त १९९/- चे जीओ चे पॅकेज घेतात ते थोडावेळ चालून नंतर बंद पडते . तरी सर्व तलाठी व मं अ 4G speed चे data card वापरत असल्याची खात्री तहसिलदार यांनी करावी . DSP करताना नेट कनेक्टीव्हीटी चांगल्या क्षमतेची वापरावी .
Comments