रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

IGR SRO TO SCDLR -DySLR /TAHASIL /CTSO MPLS CONNECTIVITY बाबत

नमस्कार मित्रांनो ,


    ई फेरफार प्रणालीच्या GCC CLOUD( ESDS ) वरील स्थलांतरानंतर कामकाजामध्ये काही मुलभूत बदल होणार आहेत .

१. CLOUD वर  काम करताना तलाठी मंडळ अधिकारी यांना फोर्टी क्लायंट या VPN ची गरज राहणार नाही .
२. प्रत्येक तलाठी व मंडळ अधिकारी यांना स्वतःचा ई मेल आयडी व मोबाईल नंबर वापरून प्रायवेटURL व  OTP वापरून काम करता येईल .
३.DATA SECURITY साठी MULTI FACTOR AUTHENTICATION विकसित करणेत आले आहे त्यात या पूर्वी च्या सेवार्थ आय डी , पासवर्ड , DSC या सह OTP ,  BIOMETRIC LOGIN , MAC ID  वापरणेत येणार आहेत .
४. किमान फेरफार प्रमाणित करण्याचे काम  BIOMETRIC LOGIN करण्याचा मानस शासनाचा आहे त्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयातील फेरफार कक्षा मध्ये MPLS CONNECTIVITY देनेत येणार आहे . त्याचे काम BSNL च्या वतीने dataBit Technologies Pvt.Ltd. मार्फत १ मे २०१९ पासून सुरु केले जाणार आहे .
५. IGR SRO TO SCDLR -DySLR /TAHASIL /CTSO MPLS CONNECTIVITY अंतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयात फेरफार कक्ष कार्यान्वित केला जाणार असून तेथे किमान ५ संगणक MPLS कनेक्टीव्हिटी द्वारे थेट सर्वर शी जोडले जाणार आहेत तेथून मंडळ अधिकारी BIOMETRIC LOGIN द्वारे फेरफार निर्गती सारखे महत्वाचे काम करू शकतील .
या कनेक्टीव्हिटी मध्ये SRO कार्यालयापासून १०० मी च्या आत असलेल्या तहसील कार्यालयात SRO कार्यालयातूनच EXTENTION घेनेत येणार आहे तर १०० मी पेक्षा दूर असलेल्या तहसील कार्यालयात नवीन P2P कनेक्शन घेनेत येणार आहे .

या बाबत सविस्तर सूचना लवकरच निर्गमित करणेत येतील

आपला

रामदास जगताप
दि २५.४.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send