नक्कल फी जमा करणे बाबत DATA CARD पेमेंट - आपले अभिप्राय
नमस्कार मित्रांनो ,
नक्कल फी जमा करणे -
तलाठी यांनी DDM मधून वितरीत केलेल्या
नकलांची नक्कल फी जमाबंदी आयुक्त
कार्यालयाच्या
खात्यावर जमा करण्यासाठी काही पर्यायावर आज SBI च्या अधिकारी यांचे बरोबर
काही पर्यायावर चर्चा
झाली त्यासाठी मला आपले मत हवे आहे
१, तलाठी यांना बँकेत जावून पैसे
भरायला आवडेल कि ऑनलाईन पेमेंट करायला ?
२. तलाठी कार्यालयासाठी बँकेत खाते
उघडावे काय ? कि तलाठी स्वतःच्या बँक खात्यातून ऑनलाईन
पेमेंट करेल ?
३. किती टक्के तलाठी ऑनलाईन पेमेंट
करतील ?
DETA CARD PAYMENT-
तलाठी यांना वितरीत केली जाणारी DETA CARD ची रक्कम थेट खात्यावर जमा करणे बाबत देखील चर्चा झाली .
प्रत्येक तालुक्यातील DBA यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांचा उपस्थिती कालावधी व देय रक्कम ऑनलाईन SBI प्रणालीवर निश्चित करून दिल्यास आणि तहसीलदार यांनी शिफारस केल्यास जमाबंदी आयुक्त कार्यालय तलाठी मंडळ अधिकारी यांचे बँक खात्यावर रक्कम जमा करू शकते
DETA CARD PLAN बाबत
तलाठी मंडळ अधिकारी यांना सामुदाईक रीत्या DATA PLAN निश्चित करून दिल्यास चालेले का ?
आपल्या तालुक्यात कोणता DATA कार्ड वापले जाते ? ( % )
१.BSNL
२. VODAFON
३. AIRTEL
४. R JIO
५. IDEA
६. ANY OTHER
कृपया आपले मत सांगा
रामदास जगताप
नक्कल फी जमा करणे करिता online payment करणे सर्वात सुलभ आहे जसे google pay paytm असे बरेच पर्याय आहेत बँक मध्ये स्वत जाऊन पैसे भरणे फारच अवघड असून वेळ बरेंच जातो आणि वेळे अभावी ते शक्य नाही तरी माझी विनंती आहे कि online payment करणे सर्वात सुलभ आहे
ReplyDeleteनक्कल फी जमा करणे:
ReplyDelete१, तलाठी यांना ऑनलाईन पेमेंट करायला जास्त सोयीचे होईल व वेळेचीही बचत होईल.
२.प्रत्येक तलाठ्याचे इंटरनेट बँकिंग सुविधेचा लाभ घेतल्यास तलाठी स्वतःच्या बँक खात्यातून ऑनलाईन पेमेंट करणे अधिक सुलभ होईल.
३. किती टक्के तलाठी ऑनलाईन पेमेंट करतील ? अंदाजे ६०% (अनेक तलाठी व मंडळ अधिकारी जांचे वय ५० च्या वर आहे त्यांना ऑनलाईन भुगदान करणे त्रासदायक होईल व जे नवनियुक्त तलाठी आहेत व ज्यांना ऑनलाईन बँकिंग बद्दल माहिती आहे त्यांना निश्चित याचा लाभ होईल.)
DETA CARD PAYMENT-
प्रत्येक तालुक्यातील DBA यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांचा उपस्थिती कालावधी व देय रक्कम ऑनलाईन SBI प्रणालीवर निश्चित करून दिल्यास आणि तहसीलदार यांनी शिफारस केल्यास जमाबंदी आयुक्त कार्यालय तलाठी मंडळ अधिकारी यांचे बँक खात्यावर रक्कम जमा करू शकते. :- सुचना चागली आहे.
तलाठी मंडळ अधिकारी यांना सामुदाईक रीत्या DATA PLAN निश्चित करून दिल्यास चालेले का ? प्रश्न कळलेला नाही.
आपल्या तालुक्यात कोणता DATA कार्ड वापले जाते ? ( रिलायन्स जिओ ७५% )
Sir...
ReplyDeleteOnline payment options sarvat changala aahe...
नक्कल फी जमा करणे बाबत :
ReplyDelete१, तलाठी यांना ऑनलाईन पेमेंट व ऑफलाईन पेमेंट असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात यावे.
अ.ऑनलाईन पेमेंट मध्ये भीम आप्स किवा ऑनलाईन ट्रान्स्फर करणे सोईचे होईल.
ब.ऑफलाईन पेमेंट मध्ये ई-फेरफार मधून बॅंक मध्ये जमा करण्या करिता भा.स्टेट
बॅंक मध्ये रक्कम जमा करण्या करिता स्लीप निघायला पाहिजे.त्या नुसार बँकेत रक्कम जमा करता येईल .
या नुसार जास्त सोयीचे होईल व वेळेचीही बचत होईल.
२.प्रत्येक तलाठ्याचे इंटरनेट बँकिंग सुविधेचा लाभ घेतल्यास तलाठी स्वतःच्या बँक खात्यातून ऑनलाईन पेमेंट करणे अधिक सुलभ होईल.
३. किती टक्के तलाठी ऑनलाईन पेमेंट करतील ? अंदाजे ६०% (अनेक तलाठी व मंडळ अधिकारी जांचे वय ५० च्या वर आहे त्यांना ऑनलाईन भुगदान करणे त्रासदायक होईल त्या करिता (ब) व जे नवनियुक्त तलाठी आहेत व ज्यांना (अ.)ऑनलाईन बँकिंग बद्दल माहिती आहे त्यांना निश्चित याचा लाभ होईल.)
तलाठी मंडळ अधिकारी यांना सामुदाईक रीत्या DATA PLAN निश्चित करून देणे शक्य नाही या बाबत तलाठी यांनी आपल्याच स्थरावर उपलब्ध करून घेतल्यास चांगले राहील.
सर ज्या प्रमाणे आपण मोबाईल रीचार्ज करतो जेवढे आपण कॉल वर बोलतो तेवढे पैसे कटतात त्या प्रमाणे सुविधा मिळाली तर खूप सोपे होईल सर
ReplyDeleteआॅनलाईन पेमेंट भिम, पेटीएम, गुगल पे, फोन पे, वगैरे सारखी सुविधा योग्य ठरेल.
ReplyDelete