रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई हक्क प्रणाली ( PDE) द्वारे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज ऑनलाईन घेण्याबाबत


नमस्कार मित्रांनो ,

विषय :- ई हक्क प्रणाली ( PDE) द्वारे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज ऑनलाईन घेण्याबाबत 


 1. वाशीम         -     15.3.2019
2.कोल्हापूर  -        22.3.2019
3.सांगली   -           24.3.2019
4.सातारा              27.3.2019
5. सोलापूर  -          27.3.2019
6. नाशिक  -        -   29.3.2019
7.ठाणे  -                 29.3.2019
8. जळगाव   -          30 .3.2019
9. चंद्रपूर         -       4.4..2019
 10. गोंदिया -            17.4.2019
11.अहमदनगर          15.4.2019
12.मुंबई उपनगर -      15.4.2019

                        वरील १२  जिल्ह्यातील  ई फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर ESDS SOFTWARE SOLUTIONS PVT.LTD. या GCC CLOUD वर  झाले असल्याने या जिल्ह्यांना  PUBLIC DATA ENTRY -ई- हक्क प्रणाली मध्ये आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्यालयात ऑनलाईन अर्ज दहल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे . या जिल्ह्यातील कोणत्याही खातेदाराला खालील ८ फेरफार घेण्यासाठी ओनलाईन अर्ज दाखल करता येतील .
१. वारस नोंद
२. बोजा दाखल करणे ,
३. बोजा कमी करणे ,
४. ई करार नोंदी ,
५. मयताचे नाव कमी करणे  
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे ,
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे व 
८. विश्वास्थांचे नाव कमी करणे

         हे  आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई हक्क प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील. सध्या ही सुविधा जनतेला उपलब्ध करून दिलेली नाही तथापि आपल्याकडे आलेले हस्तलिखित अर्ज ( अश्या फेरफार साठीचे ) त्याकरिता संबंधित तलाठी यांनी  https://pdeigr.maharashtra.gov.in या वेबसाईट वर लोगिन करून आपल्या कडे उपलब्ध असलेले फेरफार अर्जांवर कार्यवाही करून पहावी . अश्या पद्धतीने घेनेत आलेले अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये PDE DASHBOARD मध्ये पुढील कार्यवाही साठी उपलब्ध होईल . ही सुविधा वापरून या जिल्ह्यातील तलाठीन व मंडळ अधिकारी  यांनी feedback द्यावा .
त्यानंतर ही सुविधा सर्वांना उपलब्द करून दिली जाईल .

आपला
रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send