ई फेरफार प्रणाली मधील अंतिम करणेत आलेले महत्वाचे बदल दि ३१.३.२०१९
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार प्रणाली मधील अंतिम करणेत आलेले महत्वाचे बदल
१. वाडी विभाजन ही स्वतंत्र URL वापरून होणारी कार्यवाही आता ई फेरफार मधूनच होईल . ई फेरफार मध्ये वाडी विभाजन दिले आहे .
२. खाता दुरुस्ती ही स्वतंत्र URL वापरून होणारी कार्यवाही आता ई फेरफार मधूनच होईल . ई फेरफार मेनू मध्ये खाता दुरुस्ती ही सुविधा दिली आहे .
३. चूक दुरुस्ती ही स्वतंत्र URL वापरून होणारी कार्यवाही आता ई फेरफार मधूनच होईल . ई फेरफार मेनू मध्ये चूक दुरुस्ती ही सुविधा दिली आहे .
४. मंडळ अधिकारी यांनी योग्यरीत्या अंमल झाला नाही असे नमूद केल्या नंतरच या पूर्वी चूक दुरुस्ती मधून कलम १५५ च्या आदेशाप्रमाणे तहसीलदार यांचे मान्यतेने चूक दुरुती करता येत होती . आत्ता तलाठी यांना स्वताहून देखील कोणत्याही ७/१२ मध्ये चूक दुरुस्ती करता येईल अशी नवीन सुविधा देनेत आली आहे .
५.बिनशेती आदेश रद्द झाला असल्यास बिनशेती क्षेत्राचे रुपांतर पुन्हा शेती क्षेत्रात रुपांतर करणेसाठी बिनशेती आदेश रद्द हि नवीन सुविधा कलम १५५ च्या आदेशा प्रमाणे दिली आहे .
६. जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करणे साठी ( बिनशेती / कजाप / फाळणी बारा / भूमी संपादन ) नवीन सुविधा तहसीलदार यांचे आदेशाने व मान्यतेने दिली आहे .( नवीन ७/१२ साठी दिलेली लिंक बंद करणेत आली आहे )
७. हस्तलिखित मध्ये अस्तित्वात असलेले मात्र ऑनलाईन न भरलेले ७/१२ ऑनलाईन करण्यासाठी "१५५ च्या आदेशाने हस्तलिखित नविन ७/१२ तयार करणे " मधून नवीन सुविधा दिली आहे .
८.इतर हक्कातील समान नोंदी असलेले अनेक ७/१२ वरील नोंदी घेण्यासाठी " इतर हक्कातील समान नोंद " असा एक फेरफार प्रकार ( TEMPLET) नवीन उपलब्ध करून दिला आहे .
९.मयताचे नाव कमी करणे हा फेरफार प्रकार वापरल्या नंतर अत्त अनावश्य रित्या फेरफार क्रमांक बदलला जाणार नाही .
१०. आदेश दस्त ऐवज मध्ये जर एखाद्या ७/१२ वर एकाच खाते असेल तर आणी ते कंस झालेले असेल तर त्या ७/१२ वर नवीन खाते समाविष्ट करता येईल .
११. ७/१२ साठी जी भूधारणा निवडलेली आहे त्याची कोणती उप भूधारणा प्रकार निवडला आहे तो उप प्रकार ७/१२ च्या इतर हक्कात दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे तो ७/१२ कोणत्या भूधारणे चा आहे ते समजू शकेल . चुकीचा शेरा ७/१२ चे इतर हक्कात दिसत असल्यास आदेश व दस्त ऐवज मधून तहसीलदार यांचे आदेशाने भूधारणा / उप भू धारणा बदलून घ्यावी .
१२. ई फेरफार मध्ये वापरकर्त्याचा ई मेल आय डी व मोबाइल नंबर टाकण्याची / बदलण्याचे त्यांचे लॉगीनला सोय देनेत आली आहे ती UC मधून DBA ने मान्य केल्या नंतर ते अपडेट होतील अशी सुविधा १ एप्रिल २०१९ पासून उपलब्ध होईल
१३. कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती सुविधा मध्ये आता खालील १३ सुविधा देनेत आल्या आहेत
"१५५ च्या आदेशाने हस्तलिखित नविन ७/१२ तयार करणे "
"कलम १५५ च्या आदेशाने चुकीची भूधारणा दुरुस्त करणे"
"कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती करणे"
"कलम १५५ च्या आदेशाने इतर अधिकाराचा प्रकार व उपप्रकार बदलणे"
"कलम १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्त करणे"
"आदेशाने ७/१२ वरील क्षेत्र दुरुस्ती"
"आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राचे एकक बदलणे"
"आदेशाने खाता दुरुस्ती" - KDM
"तलाठी प्रस्तावित चुक दुरुस्ती फेरफार" - part of CDM
"१५५ च्या आदेशाने मंजुर फेरफारांची चुक दुरुस्ती फेरफार" - part of CDM
"कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांकाची दुरुस्ती"
"आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे"
"बिनशेती आदेश रद्द"
या तील काही सुविधा टेस्टिंग साठी फक्त पणे व रायगड जिल्ह्यांना दिल्या आहेत त्या लवकरच ESDS CLOUD वरील जिल्ह्यांना मिळतील .
आपल्या मागणी व सूचना प्रमाणे आवश्यक असलेल्या बहुतेक सर्व सुविधा ई फेरफार मध्ये विकसित करणेत आल्या असून ई फेरफार प्रणालीचे या सह SECURITY AUDIT पूर्ण केले आहे त्यामुळे आता ई फेरफार प्रणालीत तत्काळ बदल होणार नाहीत .
आपला
रामदास जगताप
दि ३१.३.२०१९
Comments