फेब्रु व मार्च २०१९ ची नक्कल फी जमा करणे बाबत
नमस्कार मित्रांनी ,
दि . ३१.१.२०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे तलाठी कार्यालयातून वितरीत होणार्या ७/१२ , ८ अ , फेरफार व नमुना ९ च्या नोटीस च्या प्रती साठी नक्कल फी म्हणून मिळणाऱ्या १५ रुपयांपैकी १० रुपये स्वताकडे ठेवून त्यातून छपाई चा कागद , शाई , वीज बिल , प्रिंटर ची देखभाल दुरूस्ती इत्यादी चा खर्च भागवावा व उर्वरित ५ रुपये महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचा हिस्सा म्हणून जमाबंदी आयुक्त यांचे नावे स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखा पुणे यांचे नावे खालील खात्यात जमा करावी. १ फेब्रु २०१९ पासून ३१ मार्च २०१९ पर्यंत जमा झालेली नक्कल फी ( ५ रुपये प्रती नक्कल प्रमाणे ) खालील खात्यावर बँकेत रक्कम जमा पावती लिहून जमा करावी .
Name - Settlement Commissioner and Director
of Land Record (Maharashtra State) Pune
स्टेट बँक ऑफ इंडीया, ट्रेझरी
शाखा, पुणे
Current Account No. 38306827364
IFSC.Code. No- SBIN0001904
सदरची
रक्कम शासन जमा होणार नसलेने ती GRAS द्वारे अथवा चलन करून भरू नये ,
सदरची रक्कम महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्था ( जमाबंदी आयुक्त
कार्यालय , पुणे ) च्या स्वीय
प्रपंजी लेखा खात्यावर ( PLA खाते ) जमा करावी .
ज्या जिल्ह्यात अद्याप अभिलेख वितरण प्रणाली
( DDM) दिलीली नाही तेथे नक्कल नोंदवही प्रमाणे नक्कल फी जमा
करावी . ज्या जिल्ह्यात DDM चालू आहे त्यांनी त्या
तारखेपासून ची नक्कल फी या प्रणाली तील प्रत्येक गावातील समरी अहवाला प्रमाणे
नक्कल फी जमा करावी .आज दि. 1.4.2019 पासून
सर्व जिल्ह्यांना नक्कल वितरणासाठी अभिलेख वितरण प्रणाली (DDM) उपलब्ध करून दिली आहे .
रक्कम बँक खात्यावर जमा करताना खलील
प्रमाणे काळजी घ्या
1) प्रथम रजिस्टर प्रमाणे किती रक्कम
भरायची ती काढून घ्या.
2) DDM मध्ये लॉगीन करून महिन्याच्या
शेवट च्या तारखेचा समरी शुल्क व विना शुल्क असे दोन्ही अहवाल ची print काढावी .
3) दिलेल्या सूचनेनुसार एकत्रित साजेचे पैसे या खात्यात
जमा करून समरी अहवाल वर महिन्याचे नाव नोंद करून बँकेकडून पैसे भरले ची पोहोच
पावती जपून ठेवावी. त्याची
एक प्रत जोडून DBA यांना द्यावी
४) DBA यांनी सर्व साजाची रक्कम जमा झाली आहे का ह्याची खात्री पुढील महिन्याच्या
५ तारखे पर्यंत करावी व त्याचा अहवाल DDE यांना त्याच
महिन्याचे ७ तारखे पर्यंत पाठवावी .
५) DDE यांनीन सर्व तालुक्यातील नक्कल फी जमा झाली का नाही ह्याची खात्री करून
एकत्रीत अहवाल त्याच महिन्याचे १० तारखेपूर्वी जमाबंदी आयुक्त कार्यालयात पाठवावा
व त्याची एक प्रत उप आयुक्त महसूल , विभागीय आयुक्त कार्यालय
यांना पाठवावी .
या पूर्ण दफ्तराचे Audit होणार असल्याने आपल्या ला रेकॉर्ड आवश्यक आहे सबब ते ऑडिट होई पर्यंत जतन करून जपून ठेवावे
व चार्ज हस्तांतरीत करताना नवीन तलाठ्याकडे हस्तांतरीत करावे
.अन्यथा ह्याची वसुली लागू शकते ह्याची नोंद घ्यावी
सदारच्या सूचना सर्व तलाठी , मंडल
अधिकारी , डीबीए यांचे
निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
आपला विस्वासू
(रामदास जगताप )
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय
, पुणे
Dear sir.
ReplyDeleteGondia dist madhe data error .talaka census cha problem show hot aahe . Login nahi hot . Tr . Sarv shetkaryana society chya kama karita 7/12 lagat aahet . Shetkari aamchyavr khup naraji vekt krun jat aahe . Te tr amhala blem krt aahet . Aamhi jimmedar aslyasarkhe . Lokana kiti samjvnar sir . Kahipn bolun jatat.vinanti aahe sir lavkrch suru karave .