ई-पीक पाहणी प्रकल्प शेतकरी हिताचे एक क्रांतिकारी पाऊल
ई-पीक
पाहणी प्रकल्प शेतकरी हिताचे एक क्रांतिकारी पाऊल
राज्याचे महसूल मंत्री मा.
बाळासाहेब थोरात व महसूल राज्य मंत्री मा. अब्दुल सत्तर यांचे नितृत्वाखाली महसूल
विभागाने शेतकऱ्यांना सक्षम करणारा अत्यंत क्रांतिकारी सा ई पीक पाहणी कार्यक्रम
कृषी विभागाच्या मदतीने राज्यभर कार्यान्वित केला आहे त्याविषयी थोडस ....
राज्यातील संपूर्ण जमिनीचे अधिकार अभिलेख जतन करण्याची
जबाबदारी महसूल विभागाकडे असून महसूल
विभागाने राष्ट्रीय भूमी अभेलेखांचे आधुनुकीकरण कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण
भागातील सर्व अधिकार अभिलेख संगणकीकृत केले असून ते आता सामान्य जनतेला ऑनलाईन
पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात महाभूमी पोर्टल द्वारे उपलब्ध आहेत. त्यासाठी
महसूल विभागाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) च्या मदतीने ई-फेरफार प्रणाली विकसित केली असून
त्याद्वारे सुमारे १ कोटी ३० लक्ष फेरफार ऑनलाईन पद्धतीने नोंदवून प्रमाणित केले
आहेत. ज्या प्रमाणे जमिनीचे अधिकार अभिलेख अर्थात गाव नमुना नं. ७ ऑनलाईन पद्धतीने
अचूकरीत्या अद्यावत केला जातो त्याप्रमाणे गाव नमुना नं. १२ मध्ये जतन केली जात
असलेली पिकांची नोंदवही देखील ऑनलाईन पद्धतीने अचूक रित्या अद्यावत करणेची
आवश्यकता होती व त्यासाठीच महसूल विभागाने टाटा ट्रस्ट च्या मदतीने ई पीक पाहणी हे
मोबाईल ॲप विकसित केले आहे.
शासनाच्या दिनांक: १०/०९/२०१८ च्या शासन निर्णयान्वये पिक
पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील ॲप (मोबाईलॲप) द्वारा
गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः
शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविणे व त्यासाठी
कार्यपद्धती निश्चित करून दिली आहे. त्या
अन्वये टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासनच्या महसूल
विभागात झालेल्या सामंजस्य करारान्वये टाटा ट्रस्टच्या मदतीने ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप महसूल विभागाने विकसित केले आहे. मागील
काही दशकात तलाठी यांचेकडील वाढलेल्या कामाचा बोजा विचारात घेता, पिकांच्या
नोंदी करण्यासाठी त्यांना आटोकाट परिश्रम करावे लागत असत. तलाठयांच्या
कामाचा बोजा कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा (I.T.प्लॅटफॉर्म) वापर
करून शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वतः पीकपेरणीची
माहिती तलाठ्याकडे ऑनलाइन पाठविण्यासाठी ई पीक पाहणी
नावाचे मोबाईल ॲप विकसित
करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या दि. ३०.७.२०२१ शासन निर्णयान्वये ई- पीक
पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट, २०२१ पासून राज्याचे
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांचे शुभहस्ते लोकार्पण करून हा प्रकल्प राज्यव्यापी
करण्यात आला आहे . क्षेत्रीय स्तरावरून Real time crop data
संकलित करणे, तसेच सदर डेटा संकलित
करताना पारदर्शकता आणणे, पीक
पाहणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या
सरकारी योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सदर डेटा वापरणे हे या प्रकल्पाचे
उद्दीष्ट हे आहे. राज्यभरात महसूल विभाग व
कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी यांचे मार्फत व टाटा ट्रस्ट च्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात
येत आहे.
ई-पीक
पाहणीचे फायदे :-
१. शेतकऱ्यांना
देय असणाऱ्या कोणत्याही शासकीय योजनेचा
थेट लाभ देण्यासाठी ई-पीक
पाहणी प्रकल्पातील माहिती अंत्यत उपयुक्त ठरणार आहे.
२. खातेदार निहाय
पीक पाहणी मुळे खातेदार निहाय पीक कर्ज अर्ज
मंजुरी, पीक विमा योजनाची नोंदणी करणे किंवा पीक
नुकसान भरपाई अचूकरीत्या आदा करणे शक्य होणार आहे.
३. राज्यभरामध्ये
एकाच प्रकारच्या पीकासाठी एकच सांकेतांक क्रं.(क्रोप कोड) निश्चित
करण्यात आला असलेने, गाव/तालुका/जिल्हा/विभाग निहाय कोणत्या पिकाखाली
किती क्षेत्र आहे. याची निश्चित
आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.
४. कृषी
विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजना इत्यादी चे लाभ
खातेधारकांना अचूकरित्या देणे सहज शक्य होणार आहे.
५. किमान आधारभूत किंमतीवर (MSP) धान/कापूस/हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी
देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे.
६. खातेनिहाय
व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकते. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांकडून
किती रोजगार हमी योजना उपकर व किती शिक्षण कर देय ठरत आहे, हे निश्चित करता येणार असल्याने उपकर वसुलीत अचूकता व पारदर्शकता येईल.
७. कृषी
गणना अंत्यत सुलभ पध्दतीने व अचूकरित्या गतीने पुर्ण
करता येईल.
ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्यभर अंमलबजावणीचे महत्वाचे टप्पे :-
१.
महसूल व कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी जागरूकता आणि
क्षमता वृद्धी साठी प्रचार,
प्रसार, प्रबोधन व प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे. त्यासाठी डेमो ॲप देखील उपलब्ध आहे.
२.
खातेदारांची नोंदणी (फक्त एकाच
वेळी) करणे आवश्यक आहे.
३.
हंगाम निहाय
निर्भेळ पिके व मिश्र / अंतरपिकांची माहिती अक्षांश रेखांशासह
काढलेल्या पिकाच्या फोटोसह अपलोड करणे.
४.
मोबाईल ॲप मधून प्राप्त झालेल्या पिकाची माहिती
अचूकता पडताळून पिकाची माहिती तलाठी यांनी कायम
करणे अथवा दुरुस्त करून कायम करणे.
५.
खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ मधील
गाव नमुना नंबर १२ मध्ये उपलब्ध करून देणे.
ई पीक पाहणी
प्रकल्प अंमलबजावणी कालावधी :-
सर्वसाधारणपणे प्रत्येक हंगामातील
सुरुवातीची दोन महिने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे अपलोड करावी व त्यानंतरचा
एक महिना तलाठी व कृषी सहाय्यक यांनी १० %
नमुना पडताळणी करावी आणि तदनंतर तलाठी यांनी ई-पीक (epeek) आज्ञावलीद्वारे पीक पाहणीला अंतिम
मान्यता द्यावी.
ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये विविध विभाग/संघटनांची भूमिका
आणि जबाबदाऱ्या.
ई-पीक पाहणीची अंमलबजावणी महसूल व कृषीसह संबंधित
विभाग आणि क्षेत्रीय यंत्रणा यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या सहकार्याने सुरु आहे. खरीप हंगामात १५ ऑगस्ट २०२१ पासून सुमारे ८८ लाख खातेदार शेतकऱ्यानी ई पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये नोंदणी करून पिकांच्या नोंदी अपलोड केल्या आहेत.
एव्हड्या कमी कालावधीत या ॲप मध्ये झालेली शेतकरी नोंदणी वरून हे ॲप शेतकऱ्यांनी स्वीकारले असल्याचे दिसून येते.
१. महसूल विभाग :
·
ई पीक
पाहणीच्या योग्य अंमलबजवणीसाठी राज्य स्थरावर, विभाग स्थरावर, जिल्हा स्थरावर आणि
तालुका स्थरावर अंमलबजावणी समित्या स्थापन
करून कामाचा नियमित आढावा घेतला जातो.
·
जिल्हा
स्थरावर अंमलबजावणी मध्ये समन्वय
साधण्यासाठी एक उपजिल्हाधिकारी जिल्हा समन्वयक व कृषी विभागाचा एक कृषी अधिकारी सहजिल्हा
समन्वयक म्हणून नियुक्त केले आहेत.
·
तालुकास्तरीय समितीकडून ई पीक पाहणी साठी तलाठी
व कृषी सहाय्यक यांचेत गावांचे वाटप करून त्यांना गाव निहाय जबाबदारी देवून शेतकऱ्यांमध्ये
जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेत आहेत.
·
तलाठी यांचे कडे जबाबदारी
असलेल्या गावातील शेतकऱ्यांकडून अॅपद्वारे
प्राप्त झालेली पीकांची माहितीची १०% नमुना पडताळणी तलाठी यांनी केल्या नंतर अशी पिकांची माहिती
ऑनलाईन पद्धतीने आहे तशी मान्य करतात किंवा दुरुस्त करून मान्य करतात.
२.
कृषी विभाग :
·
ई पीक
पाहणीची प्रचार, प्रसिद्धी, जनजागृती करून अधिकारी कर्मचारी व शेतकरी यांचे
क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळा घेणे आणि प्रकल्पाचे कामाचे पर्यवेक्षण करणे.
·
शेतकरी
खातेदाराची मोबाईल ॲप मध्ये नोंदणी करून घेणे व पिक पे-याची माहिती अपलोड करण्यास
शेतकर्यांना प्रोत्साहित करणे.
·
कृषी
सहय्याकाकडे जबाबदारी असेलल्या गावातील ख्स्तेदार यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी
१०% पीक पेर्याची नमुना पडताळणी कृषी सहाय्यक करतात.
·
क्षेत्रीय
स्तरावरील प्रकल्प अंमलबजावणीतील अडीअडचणी मांडण्यासाठी किंवा शेतकरी यांना मदत व
मार्गदर्शन करण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयात ०२०-२५ ७१२ ७१२ या क्रमांकाने मदत कक्ष सुरु केला आहे.
·
ई पीक पाहणीच्या अंमलबजावणी साठी टाटा ट्रस्ट,
महाआयटी व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) पुणे यांची मदत घेण्यात येत आहे.
शेतकऱ्यांकडून पिकांचे
स्वयं नोंदणी करण्याची प्रक्रिया-
१.
नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट
मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (install) करावा.
२.
खातेदाराने ई पीक पाहणी ॲप
मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
३.
७/१२ मधील नावाप्रमाणे खातेदाराने
त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी.
४.
खातेदार त्यांचे नाव किंवा खाते
क्रमांक शोधून नोंदणी करू शकतील.
५.
ज्या खातेदाराचे एकाच महसुली
गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत, त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास, त्या गावातील त्यांचे सर्व खाते
क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध
दिसतील.
६.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस (SMS) द्वारे चार अंकी संकेतांक (पासवर्ड) प्राप्त होईल.
७.
सदरहू प्राप्त झालेला चार अंकी
संकेतांक (पासवर्ड) चौकटीत अचूकपणे नोंदविल्यास खातेदाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण
होईल.
८.
यशस्वी नोंदणी प्रक्रियेनंतर नोंदणीकृत मोबाईलवर खातेदाराचे नाव निवडून चार
अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत टाकून लोगिन केल्यास पिक पाहणीची माहिती भरता
येईल.
ई पीक पाहणी प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
१.
सामायिक मालकीच्या जमिनीसाठी, ज्याचे नाव गाव न.नं.७/१२ मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदविलेले आहे, ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील
पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील मात्र त्यांनी वाहिवाटी पेक्षा
जास्त क्षेत्राची पीक पाहणी नोंदवू नये.
२.
अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत
त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता) नोंदणी करू शकतील.
३.
खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये
उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो
(GPS enabled) व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात
इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची
माहिती अपलोड करता येईल.
४.
एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा
स्मार्टफोन नसेल, तर सहजरीत्या उपलब्ध होणारा
मित्र नातेवाईक किंवा शेजाऱ्याचा दुसरा स्मार्टफोन नोंदणीसाठी वापरू शकतात.
५.
एका स्मार्ट मोबाईल वरून एकूण ५०
खातेदारांची नोंदणी करता येईल फक्त ज्या खातेदाराची नोंदणी करावयाची आहे त्यांचाच
मोबाईल नंबर नोंवावा म्हणजे OTP / पासवर्ड
त्याच फोन वर येईल व तो वापूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
६.
ज्या स्मार्टफोन वरून खातेदार
नोंदणी केली त्याच फोन वरून ई पीक पाहणी करता येईल.
७.
फक्त खातेदार नोंदणी करताना व पिक
पेरा अपलोड करताना इंटरनेट आवश्यक असते शेतावर जावून प्रत्यक्ष पिकाची माहिती भरून
अक्षांश रेखांशासह (GPS)
फोटो घेताना इंटरनेटची आवश्याकता नसते हे या आप चे वैशिष्ट्ये आहे.
ई पीक पाहणी साठी अन्य घटकांची मदत –
शेतकऱ्यांना
मदत मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी व अन्य महसूल
अधिकारी , कृषी विभागाचे कृषी सहय्यक, मंडळ कृषी अधिकारी व अन्य कृषी अधिकारी यांचे
सह १६० पेक्षा जास्त कृषी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाला असेलेले ९५०० कृषी
पदवीधारक विद्यार्थी (कृषीदूत) यांची मदत घेण्यात येत असून गावातील महाविद्यालयाचे विद्यार्थी तरुण मंडळाचे
कार्यकर्ते, स्वयंसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, रास्त भाव धन्य दुकानदार, महा ई सेवा
केंद्राचे संचालक, सहकारी सोसायटीचे कर्मचारी, ग्राम पंचायत सदस्य, सोसायटीचे
संचालक यांची देखील मदत होत आहे. काही भागात कृषी उत्पन्न बाजार समित्या व जिल्हा
मध्यवर्ती बँका देखील ई पीक पाहणी प्रकल्पाची प्रचार प्रसिद्धी करत आहेत. या प्रकल्पातील क्षेत्रीय स्थरावरील महसूल विभागाचा महत्वाचा
घटक असलेल्या तलाठी यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे खरीप हंगामात ८८ लक्ष
पेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई पीह पाहणी प्रकल्पात नोंदणी करून सहभाग
नोंदिल्याचे दिसून येते त्यामुळे हा प्रकल्प शेतकरी बांधवांनी
स्वीकारला आहे असे म्हणावे
लागेल.
(रामदास जगताप)
उपजिल्हाधिकारी तथा
राज्य समन्वयक, ई-पीक
पाहणी प्रकल्प
जमाबंदी
आयुक्त कार्यालय, पुणे
Comments