महसूल परिषद २०२१
नमस्कार मित्रांनो ,
महसूल परिषद २०२१
राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब यांचे मूळ संकल्पनेतील राज्यस्तरीय महसूल परिषद बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर यशदा , पुणे येथे राज्याचे जमाबंदी आयुक्त , नोंदणी महानिरीक्षक , राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत दि १२ व १३ नोव्हेंबर , २०२१ रोजी संपन्न झाली, या परिषदेसाठी राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब, राज्याचे महसूल राज्य मंत्री मा.ना. अब्दुल सत्तार साहेब , महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर साहेब, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव मा. असीमकुमार गुप्ता, राज्याचे सेवा हमी आयुक्त मा. स्वाधीन क्षत्रिय , जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख मा निरंजन सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक मा. श्रावण हर्डीकर व सर्व विभागीय आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
या महसूल परिषदे मध्ये मोफत डिजिटल सातबारा वाटप , ई पीक पाहणी, सातबारा संगणकीकरण, ७/१२ मधील अचूकता , अधिकार अभिलेखा सोबत आधार क्रमांक व मोबाईल नंबर संलग्न करणे या आपल्या महत्वाच्या विषयांवर सद्यस्थिती समजून घेतली आणि कामकाजाचा आढावा घेतला , मा महसूल मंत्री महोद्यांनी ई पीक पाहणी व डिजिटल सातबारा प्रकल्पाचे कौतुक केले .
आपला
रामदास जगताप
Comments