रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

माझ्या जीवनातील आनंदी महसूल दिन २०२१

 

माझ्या जीवनातील आनंदी महसूल दिन २०२१ 

नमस्कार मित्रांनो 


                       आज १.८.२०२१ म्हणजेच प्रत्येक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्याचा अस्मितेचा महसूल दिन . आजचा महसूल दिन २०२१ माझासाठी आनंदाचा व सदैव लक्षात राहील असा होता. 

            महसूल विभागाच्या शेतकर्यांसाठीच्या काही नवीन ऑनलाईन सुविधांचं शुभारंभ प्रसंगी मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब मंत्री महसूल यांनी माझे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठीच्या ई फेरफार, ई पीक पाहणी , ई अभिलेख , आपली चावडी, ई हक्क, भूलेख, बँक पोर्टल, महाभूमी पोर्टल , डिजिटल स्वाक्षरीत सातबारा , खाते उतारा व फेरफार ईत्यादी आज्ञावलीच्या विकसन, प्रशिक्षण व प्रत्यक्ष अंमलबजावणी या कामातील अमूल्य योगदानासाठी महसूल विभागाचा उत्कृष्ट उप जिल्हाधिकारी म्हणून माझा गौरव केला त्यासाठी मला हा महसूल सदैव स्मरणात राहील. 

        मी दि ३०.७.१९९६ रोजी अलिबाग रायगड येथून तहसीलदार म्हणून महसूल सेवेला सुरुवात केली , कालच माझा महसूल सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आणि आज महसूल विभागाचे कुटुंब प्रमुख महसूल मंत्री महोदय म.ना. बाळासाहेब थोरात साहेब आणि अप्पर  मुख्य सचिव डॉ. नितीन करीर साहेब व जमाबंदी आयुक्त मा. निरंजन सुधांशू यांचे स्वाक्षरीने उत्कृष्ट उप जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला आणि मा. महसूल मंत्री महोदय यांनी उल्लेख केल्या प्रमाणे हा माझा एकट्याचा गौराव गेल्या चार पाच वर्षा पासून ई फेरफार प्रकल्पासाठी अहोरात्र कष्ट करणारे तलाठी मंडळ अधिकारी आणि कोतवाल ते जिल्हाधिकारी या सर्वच महसूल टीम चा गौरव आहे असे मी मानतो. मी एकटा  काहीच करू शकत नव्हतो परंतु या अत्यंत किचकट व अवघड कामकाजासाठी शासन स्थरावरून  अधिकारी, अप्पर मुख्य सचिव, मंत्री कार्यालयातील टीम व महसूल मंत्री स्वतः यांनी दिलेले पाठबळ आणि क्षेत्रीय स्थरावरील सर्व महसूल अधिकारी मित्र व तलाठी / मंडळ अधिकारी बांधव यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हे अत्यंत कठीण शिवधनुष्य पेलले. 

   या माझ्या चार पाच वर्षाच्या आहोरात्र कष्टासाठी मला सदैव साथ देणाऱ्या कुटुंबाती सदस्यांपैकी सौ. अनिता - माझी अर्धांगिनी हिचा  वाढदिवस देखील आजच असतो , ई-फेरफार प्रकल्प काढीन परिस्थितीतून बाहेर काढून सत्बर डेटाबेस ९९% अचूक करण्यासाठी मला राज्यातील सर्व जिल्ह्यात फिरून प्रशिक्षण आणि १६००० सहकार्यांना मदत करताना १६ ते १८ तास काम काढण्याच्या पद्धतीमुळे मला कुटुंबासाठी वेळ देता आला नाही हे मात्र खरे. आता थोडा वेळ देईल म्हणतो ..... 



 माझ्या या प्रयत्नान चागले यश आले असून आज त्याचा लाखो लोक फायदा घेत आहेत आणि माझे पुढाकाराने  व पाठपुराव्याने सुधारित नमुन्यातील सातबारा , ई पीक पाहणी, डिजिटल स्वाक्षरीत अभिलेखांना कायदेशीर दर्जा , बँक पोर्टल अशा अनेक सुविधा शेतकऱ्यांचे जीवनात देखील क्रांती आणतील यात शंका नाही आणि या सर्व करण्यामध्ये आपला देखील खारीचा वाटा आहे हेच काय ते  निखळ समाधान ......,

हा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करून आज चार वर्षे पूर्ण झाली या कालावधीत माझा ब्लॉग सहा लाख १४ हजार पेक्षा जास्त अभ्यागतांनी पहिला व वापरला यावरून हा प्रयोग देखील उपयुक्त ठरत आहे असेच म्हणावे लागेल . 

आज पासून राज्यातील सन २०१५-१६ पासूनचे सर्व प्रमाणित  ऑनलाईन फेरफार डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देणे सुरु केले असून आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून १ हजार फेरफार डाऊनलोड देखील झाले म्हणजेच हि सेवा देखील लोकप्रिय ठरणार यात शंकाच नाही 


आपला 

रामदास जगताप 

दि. १.८.२०२१ - महसूल दिन 

Comments

  1. केलेल्या कर्माचा दरवळणारा सुगंध म्हणजे किर्ती होय.
    अतिशय क्रांतिकारक, सार्थ,महत्त्वाकांक्षी अभिमानास पात्र व कौतुकास्पद कामगिरी आहे श्री.जगतापसाहेब!!!!🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send