रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीक पाहणी प्रकल्पाची राज्यव्यापी अंमल बजावणी - प्रचार प्रसार , प्रशिक्षण व प्रबोधन कार्यक्रम

 

नमस्कार मित्रांनो, 


      अखेर राज्य शासनाने ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा शासन निर्णय दि ३०.०७.२०२१ च्या शासन निर्णयान्वये जाहीर केला असून  १ ऑगस्ट पासून ई पीक पाहणी प्रकल्पाचे प्रशिक्षण प्रबोधन व प्रचार प्रसिद्धी केली जाणे अपेक्षित आहे त्यासाठी मोबाईल चे डेमो ॲप  खालील संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्यात यावे .


सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात दि ३.७.२०२१ ते ६.८.२०२१ या कालावधीत सर्व जिल्हा समन्वयक उप जिल्हाधिकारी  , सह जिल्हा समन्वयक कृषी अधिकारी , प्रत्येक विभागाचे दोन मास्टर ट्रेनर या प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातून ६ तज्ञ अधिकारी कर्मचारी यांना परिपूर्ण प्रशिक्षण दिले आहे 





ई-पीक  पाहणी डेमो ॲप - 

सर्व शेतकरी यांचे प्रशिक्षण व प्रबोधनासाठी ई पीक पाहणीचे डेमो ॲप झाले आहे उपलब्ध  - 


"माझी शेती, माझा सातबारा,

*मीच नोंदविणार माझा पीकपेरा"


ई पीक पाहणी मोबाईल  ॲप डेमो व्हर्जन  डाऊनलोड करून प्रशिक्षणासाठी वापरण्याकरिता  खालील  लिंक वापरा 

http://epeek.mahabhumi.gov.in/demo/app_download  

कृपया गुगल प्ले स्टोअर मधील ॲप डाऊनलोड करू नये या लिंक वरूनच ॲप डाऊनलोड करा व प्रत्यक्ष वापरून पहा 


आपला 

रामदास जगताप 

राज्य समन्वयक , ई-पीक पाहणी प्रकल्प

Comments

  1. निवेदन
    प्रती,
    रामदास जगताप
    ई पीक पाहणी प्रकल्प
    राज्य समन्वयक


    विषय: पिकपेरा नोंदवण्याची मुदत वाढवून देनेबाबत.

    निवेदनकर्ते: नितीन किशोर अग्रवाल.


    महोदय,


    माझी शेती माझा सातबारा,मीच नोंदवनार माझा पिकपेरा हि मोहिम जरी शेतकरी हिताची असली तरी सुद्धा शेतकऱ्यांना हे सर्व खूप नविन आहे व हे करतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने सर्वर चा ईश्यु,ईंटरनेट स्पीड चा ईश्यु,ओ.टि.पी.लवकर न येने अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर बर्याच शेतकऱ्यांजवळ मोबाईलच नाही .ई पिक पेरा हा निर्णय घेण्याकरीता थोडा उशिरच झालेला आहे आणि मुदत सुद्धा खूपच कमी दिल्या गेलेली आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांना आपला पिकपेरा नोंदवन्याकरीता वेळ वाढवून मिळावी या करीता मी स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल आपणास विनंती करीत आहे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send