महसूल दिन १ ऑगस्ट २०२१ निमित्त महसूल विभागाच्या नविन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ
महाराष्ट्र शासन महसूल विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे महसूल दिन १ ऑगस्ट २०२१ निमित्त महसूल विभागाच्या नविन ऑनलाईन
सुविधांचा शुभारंभ शुभहस्ते – मा. ना. श्री.
बाळासाहेब थोरात, मंत्री महसूल मा. ना.
श्री.अब्दुल सत्तार, राज्यमंत्री
महसूल १.
डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण २.
सुधारित नमुन्यातील ७/१२ वितरण ३.
ई मिळकत पत्रीका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त
नोंदनिशी संलग्न करणे १. डिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवही वितरण- महसूल
विभागाच्या ऑनलाईन सुविधा सामान्य जनतेला उपलब्ध होण्यासाठी महाभूमी नावाचे
पोर्टल तयार करण्यात आलेले असून या पोर्टलवर आत्तापर्यंत डिजिटल स्वाक्षरीत ७/१२
व डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा उपलब्ध करून देण्यात आलेला होता आता १ ऑगस्ट, २०२१
पासून डिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवही देखील सामान्य जनतेला उपलब्ध करून
देण्यात येत आहे. राज्यात सन २०१५-२०१६ पासून सुमारे १.२७ कोटी एवढे
फेरफार ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात येवून प्रमाणित करण्यात आले आहेत त्यापैकी
सुमारे १.१७ कोटी एवढे फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करून सामान्य जनतेला
उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर डिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवही खाली
दिलेल्या लिंक वर उपलब्ध राहतील. डिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवही करिता नक्कल
फी प्रती प्रत रुपये १५/- आकारण्यात येईल. डिजिटल
स्वाक्षरीत फेरफार नोंदवही करिता URL- https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr २. सुधारित नमुन्यातील ७/१२ वितरण- महसूल
विभागाच्या शासन निर्णय क्रमांक : जमीन-२०२०/प्र.क्र.२७/ज-१ अ दिनांक २ सप्टेंबर
२०२० अन्वये सुमारे ५० वर्षानंतर गाव नमुना
७/१२ नमुन्यां मध्ये बदल करण्यात आला. गाव नमुना ७/१२
मध्ये प्रामुख्याने पुढील ११ बदल करण्यात आले आहेत. १. गाव
नमुना ७ मध्ये गावाच्या नावासोबत LGD कोड दर्शविण्यात यावा २. गाव
नमुना नं.७ माहितीमध्ये अ) लागवडीयोग्य क्षेत्र व ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अ+ब) दर्शविण्यात
येईल. ३.
नमुना ७ माहिती मध्ये नमूद क्षेत्राचे एकक नमूद करून यात शेती
क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी.आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी. हे एकक वापरावे. ४.
खाते क्रमांक या पूर्वी इतरहक्क रकान्यासोबत
नमूद केला जात असे यापुढे खाते क्रमांक खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद
केला जाईल. ५.
नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले
खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून
दर्शविल्याजात होत्या, आत्ता ती कमी केलेली नावे व नोंदी नमुना ७ च्या माहिती मध्ये कंस करून
त्यावर एक आडवी रेषामारून (strike through) खोडून दर्शविण्यात येतील. ६.
कोणत्याही नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार
(प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली
स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येतील. संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग
क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात
येईल. ७.
कोणत्याही नमुना ७ च्या माहिती मध्ये या ७/१२
वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतरहक्क रकाण्याचे
खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या नवीन समाविष्ट रकान्यात दर्शविण्यात
येईल. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून
एखद्या स.नं / गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व
दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही. ८.
या नमुना ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक
नमुना ७ च्या माहितीवर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या रकान्यात
एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील. ९.
नमुना ७ च्या माहिती मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये
डॉटेड लाईन छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल. १०. शेती खेत्रासाठी व
बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात
यावेत.तसेच बिनशेतीच्या गाव नमुना ७ मध्ये पोट खराब क्षेत्र ,जुडी व विशेष
आकारणी,तसेच इतर ह्क्क्त कुळ व खंड हे रकाने वगळण्यात यावेत. ११. बिनशेती क्षेत्राचे नमुना ७ साठी नमुना १२ ठेवणे आवश्यक नसल्याने
बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही. व त्यावर सदरचे क्षेत्र अकृषक
क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नं
१२ ची आवश्यकता नाही अशी सूचना छापण्यात
येईल. सुधारित
नमुन्यातील ७/१२ वितरण खालील लिंक वर उपलब्ध राहतील. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr ३.
ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणालीतसेच दुय्यम निबंधक कार्यालयाशी जोडणी प्रकल्पाची संक्षिप्त माहिती :- ई-मिळकत पत्रिका
ऑनलाईन फेरफार प्रणाली (e-
Property Card Information System), म्हणजे मिळकत पत्रिकांची माहीती डिजीटल
स्वरुपात जतन करुन त्या त्या वेळी त्यांत होणारे फेरबदल ऑनलाईन
पध्दतीने करून अद्यावत मिळकत पत्रिका जनतेस उपलब्ध करुन
देणेसाठी अवलंबिलेली प्रणाली. या प्रणालीत नोंदणीकृत दस्त होताच
क्षणी त्याबाबतचा फेरफार आज्ञावलीच्या सहाय्याने ऑनलाईन घेण्याची प्रक्रीया
सुरू करून फेरफार मंजुर करणेपर्यंत कार्यवाही ऑनलाईन पध्दतीने होणे संकल्पित
आहे. सदर प्रणाली अंतर्गंत तालुका
स्तरावरील भुमि अभिलेख कार्यालयांची दुय्यम निबंधक कार्यालयांशी जोडणी करणेत आली
असून राज्यात ऑनलाईन फेरफार प्रक्रीया सुरू करण्याचे नियोजित आहे. याकरीता
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्यास्तरावरून
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांचेद्वारे मिळकत पत्रिकेसाठी e-PCIS ही आज्ञावली
विकसीत करण्यात आली असुन याव्दारे
तालुका स्तरापर्यंत मिळकत पत्रिकांविषयक फेरफार प्रक्रीयेचे संपूर्णपणे
संगणकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालय,
उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय व नगर भूमापन अधिकारी कार्यालय हे क्लाऊड वरील
सर्व्हरवर सुरक्षित कनेक्टीव्हीटीव्दारे जोडण्यात आले आहेत. उद्देश :- ·
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त
नोंदणी होताच त्याचा फेरफार मिळकत पत्रिकेवर नोंदवून बदल घडविणेसाठी नगर भूमापन
अधिकारी/उप अधीक्षक भूमि अभिलेख यांना तात्काळ ऑनलाईन उपलब्ध करुन देणे. ·
मिळकत पत्रिकांची माहीती डिजीटल स्वरुपात जतन करुन
त्यांत होणारे हस्तांतरण/फेरबदल ऑनलाईन पध्दतीने
अद्यावत करणे. ·
डिजीटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका जनतेस उपलब्ध करुन देणे. ·
अभिलेखांचे विनासायास दिर्घकाळ जतन व संवर्धन करणे. सद्यस्थिती:- राष्ट्रीय सुचना विज्ञान
केंद्र, पुणे यांनी e-PCIS प्रणाली
विकसित केली आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व मिळकत पत्रिकाचे संगणकीकरण
पूर्ण झाले असून आज अखेर 53.57 लक्ष
(91.63%) डिजीटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका महाभूमि प्रोर्टलवर उपलब्ध आहेत. तसेच e-PCIS
प्रणाली अंतर्गत 25 प्रकारचे फेरफार मोडयुल तयार केले असून दिनांक- 01/04/2021
पासून हस्तलीखीत फेरफार पद्धत पूर्णपणे बंद करुन संगणकीकृत पध्दतीने फेरफार
प्रक्रीया राज्यभर लागू केली आहे. http://mahabhumi.gov.inया
संकेतस्थळावरुन दि. 21/1/2021
पासून डिजीटलस्वाक्षरीत मिळकत पत्रिका नागरीकांना ऑनलाईन
उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत. आज
अखेर 95
हजार पेक्षा जास्त नागरीकांनी
ऑनलाईन डिजीटलस्वाक्षरीत
मिळकत पत्रिका प्राप्त करुन घेतल्या असून त्या पोटी शासनास 1 कोटी
पेक्षा जास्त रक्कमेचा
महसूल जमा झाला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी होताच त्याचा
मिळकत पत्रिकेवर ऑनलाईन फेरफार नोंदवून बदल घडविणेसाठी पुढील कार्यालयामध्ये
पहिला टप्प्यात दि.1/8/2021
पासून प्रकल्प राबविणेत येत आहे.
या कार्यालया अंतर्गत येणा-या मिळकत पत्रिकाचे
ऑनलाईन फेरफार प्रक्रीयेचा शुंभारभ होत आहे.दुसऱ्या टप्यात इतर सर्व जिल्हयात हा
प्रकल्प 1 सप्टेंबर पासुन सुरू करण्यात
येईल.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे |
Comments