रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल सातबारा चा आज पुन्हा उच्चांक – एका दिवसात एक लक्ष सातबारा झाले डाऊनलोड – एका दिवसात सर्वाधिक ३० लाखांचा महसूल जमा

डिजिटल सातबारा चा आज पुन्हा उच्चांक – एका दिवसात एक लक्ष सातबारा झाले डाऊनलोड – एका दिवसात सर्वाधिक ३० लाखांचा महसूल जमा राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब यांचे नेतृत्वाखाली आणि महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अनेक ऑनलाईन सुविधांमुळे सामान्य माणसाच्या जमीन विषयक आणि सातबारा बाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत. महसूल विभागाच्या अनेक ऑनलाईन सुविधा शेतकरी व बीगर शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करत आहेत. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेले महाभूमी पोर्टल सध्या सर्वच खातेदारांच्या पसंदीस उतरल्याचे दिसून येत आहे. आज दि ५ जुलै २०२१ रोजी एका दिवसात १ लक्ष डिजिटल सातबारा व खाते उतारे डाऊनलोड झाले आहेत हा आज पर्यंतचा एक उच्चांक आहे. याशिवाय आज अनेक प्रकारे सर्वोत्तम काम झाल्याचे दिसून येते. आज एका दिवसात १. ऑनलाईन दस्त नोंदणी झालेल्या दस्तांची संख्या – ४५३१ २. ऑनलाईन नोंदविलेल्या फेरफार संख्या – १२१३२ ३. ऑनलाईन निर्गत फेरफार ची संख्या – १००६३ ४. नोटीस तयार केलेल्या फेरफारची संख्या – ११०१३ ५. तलाठी स्थरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून वितरीत सात बारा व खाते उतारे- २,८६,५८० /- ६. पीक कर्जासाठी बँकांनी घेतलेल्या ऑनलाई ७/१२ व खाते उतारेची संख्या -१० हजार ७. पीक विमा योजनेसाठी वापरलेल्या सातबारा ची संख्या – १ लाख ३४ हजार ८. भूलेख वरून विनाशुल्क / मोफत मिळविलेल्या सातबारा संख्या – ५ लाख ५ हजार ९. एका दिवसात नक्कल शुल्क चा ३१.५० लक्ष महसूल जमा “कोणतीही जाहिरात न करता महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पाला जनतेचा उस्पुर्त प्रतिसाद लाभत असून यामागे राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांचे कठोर परिश्रम आहेत.” रामदास जगताप उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई- फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक ५.७.२०२१

Comments

  1. सर सहा ड सुध्दा ऑनलाईन पध्दतीने केले तर महसुल आणखी जमा होईल

    ReplyDelete
    Replies
    1. लवकरच होईल गाव नमुना ६ ( फेरफार नोंदवही ) डिजिटल स्वाक्षरीत

      Delete
  2. हो, डिजिटल सातबारा घरबसल्या व अवघ्या पंधरा रूपयांत मिळत असल्याने नागरिकांची सोय झाली आहे,पण आजही अनेक सातबारा उतारे डिजिटल झालेले नाही किंवा काही सातबारे त्रुटी असल्याने पोर्टलवरुन डाउनलोड होत नाही.यासंदर्भात तलाठी अधिकारी व तहसिलदार यांचेकडून डिजिटल सातबारा संदर्भात जमाबंदी आयुक्त कार्यालयास कळविलेले असूनही ते सातबारे उतारे डिजिटल झाले नाहीत किंवा काम अद्याप प्रलंबित आहेत.100%सातबारे उतारे डिजिटल झाले तर ते अधिक फायदेशीर ठरले असते.आमच्या चार गटापैकी तीनच गटाचा ऑनलाईन डिजिटल सातबारा मिळतो तर एका गटाचा मिळत नाही.मी माननीय तलाठी साहेब यांचेकडे विचारणा केली असता राज्यस्तरावरील राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र तसेच जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे यांचेमार्फत संपूर्ण राज्यभरातील डिजिटल सातबारा उतारा संबंधित कामे चालतात असे समजले.वर्षानुवर्ष एखाद्या खातेदाराचा ऑनलाईन डिजिटल सातबारा मिळत नसेल तर त्यावर शासकीय पातळीवरून जलद कार्यवाही होणे अपेक्षितचआहे.तांत्रिक त्रुटी असतील तर त्यासाठी शासनाने कुशल मनुष्यबळ नक्कीच उपलब्ध करून दिले असेल,तेव्हा एक नागरिक म्हणून आमच्याही शेतीच्या गटाचा ऑनलाईन डिजिटल सातबारा मिळविण्याचे स्वप्न पुरे करावे ही विनंती.

    ReplyDelete
  3. नमस्कार सर ,

    आपली अपेक्षा रास्त आहे परंतु आपल्याला हे माहित असायला हवे कि २ कोटी ५४ लक्ष सातबारा पैकी २ कोटी ५३ लक्ष सातबारा डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध असून शिल्लक सातबारा दुरुस्तीचे कामकाज तालुक्यात तहसीलदार स्थरावर सुरु आहे . त्यासाठी कागदपत्र पाहून कलम १५५ अंतर्गत तहसीलदार यांनी आदेश कडून निर्णय घ्यावा लागतो त्यासाठी प्रसंगी सुनावणी घ्यावी लागते सर्व हित संबंधित बाजू समजून घ्यावी लागते त्यासाठी कृपया आपण आपले तालुक्याचे तहसीलदार यांचेशी संपर्क करावा . आज देखील ९९ % खातेदार यांन त्यांचे डिजिटल सातबारा उपलब्ध होत आहेत यात समाधान नाही का ? तरीही उर्वरित कामकाज तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही तहसील स्थरावर सुरु आहे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send