आज पुन्हा झाले एका दिवसात एक लाख पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे डाऊनलोड
मित्रांनो नमस्कार
आज अखेर राज्यातील ८० लक्ष फेरफार झाले डिजिटल स्वाक्षरीत तरी अजून ४६ लक्ष आहेत शिल्लक विशेषता सांगली सोलापूर कोल्हापूर , रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे , पालघर , नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांचे डी डी ई यांनी विशेष लक्ष देण्याची गरज पुणे सातारा रायगड ,भंडारा गोंदिया आणि नाशिक व अमरावती विभगातील सर्व डी डी ई यांचे काम जवळपास पूर्ण त्यांचे अभिनंदन
राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब यांचे नेतृत्वाखाली आणि महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अनेक ऑनलाईन सुविधांमुळे सामान्य माणसाच्या जमीन विषयक आणि सातबारा बाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत.
डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेले महाभूमी पोर्टल सध्या सर्वच खातेदारांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे. आज दि ७ जुलै २०२१ रोजी एका दिवसात सर्वोच्च १ लक्ष १ हजार डिजिटल सातबारा व खाते उतारे डाऊनलोड झाले आहेत.
आज एका दिवसात
१. ऑनलाईन दस्त नोंदणी झालेल्या दस्तांची संख्या – ४६७०
२. ऑनलाईन नोंदविलेल्या फेरफार संख्या – १३१३८
३. ऑनलाईन निर्गत फेरफार ची संख्या – १०५६७
४. नोटीस तयार केलेल्या फेरफारची संख्या – १२१३४
५. तलाठी स्थरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून वितरीत सात बारा व खाते उतारे- २,२४,३५३ /-
६. पीक कर्जासाठी बँकांनी घेतलेल्या ऑनलाई ७/१२ व खाते उतारेची संख्या -२५ हजार
७. पीक विमा योजनेसाठी वापरलेल्या सातबारा ची संख्या – २ लाख ८५ हजार
८. भूलेख वरून विनाशुल्क / मोफत मिळविलेल्या सातबारा संख्या – ५ लाख २२ हजार
“ महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पाला जनतेचा उस्पुर्त प्रतिसाद लाभत असून यामागे राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांचे कठोर परिश्रम आहेत.”
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई- फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे
दिनांक ७.७.२०२१
Comments