रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी करणेसाठी जिल्हा समन्वयक अधिकारी व मास्टर ट्रेनर्स यांचेसाठी प्रशिक्षण वर्ग दि. ८.७.२०२१ स.११.०० वा.

विषय - ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी करणेसाठी जिल्हा समन्वयक अधिकारी व मास्टर ट्रेनर्स यांचेसाठी प्रशिक्षण वर्ग दि. ८.७.२०२१ स.११.०० वा. संदर्भ- १. महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रं.जमीन-2018/प्र.क्रं.92/ज-1अ २. मा. अप्पर मुख्य सचिव महसूल यांचे अध्यक्षतेखालील बैठक दिनांक ७.६.२०२१ महोदय, शासनाच्या दि.१०/०६/२०१८ च्या शासन निर्णयान्वये पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा मोबाईल (ॲप) गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविणे व त्यासाठी कार्यपध्दती निश्चित करून दिली आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट च्या मदतीने विकसित ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर शासनाने हा प्रकल्प राज्यभर राबविण्यासाठी दिनांक ७.६.२०२१ च्या राज्यस्थरीय समन्वय समिती मध्ये तत्वता मान्यता दिली आहे. ई-पीक पहाणी प्रकल्प क्षेत्रीय स्थरावर महसूल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जिल्हा स्थरावर एका अनुभवी उपजिल्हाधिकारी यांची जिल्हा समन्वयक उपजिल्हाधिकारी म्हणून व एक कृषी अधिकारी यांना सहजिल्हा समन्वयक कृषी अधिकारी म्हणून आपले जिल्ह्यात नियुक्ती केली असेलच. ई पीक पाहणी हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या प्रकल्पाच्या राज्यव्यापी अंमलबजावणी साठी नियुक्त जिल्हा समन्वय अधिकारी व सह जिल्हा समन्वय कृषी अधिकारी यांचेसह मास्टर ट्रेनर्स यांचेसाठी या प्रकल्पाची ओळख, महत्व व उद्देश विषद करण्यासाठी तसेच खरीप २०२१ च्या हंगामातील अंमलबजावणी साठी पूर्वतयारी करण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवार दिनांक ८.७.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. १. प्रशिक्षण कार्यशाळेचा विषय – ई पीक पाहणी प्रकल्पाची ओळख, महत्व व उद्देश विषद करण्यासाठी तसेच खरीप २०२१ च्या हंगामातील अंमलबजावणी साठी पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हा समन्वयक यांचेसह मास्टर ट्रेनर्स यांचेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा. २. प्रशिक्षण वर्गाचा वार दिनांक व वेळ – गुरुवार दि.८.७.२०२१ वेळ सकाळी ११.०० वा. ३. ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाची लिंक – एक दिवस आगोदर आपणास उपलब्ध करून दिली जाईल ४. जिल्हा स्थरावर किमान २ मास्टर ट्रेनर्स ( १ महसूल+ १ कृषी अधिकारी ) यांची निवड करून त्यांची नावे इकडे कळवावीत तरी आपले जिल्हासाठी आपण नियुक्त केलेल्या संबंधित उप जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांचेसह मास्टर ट्रेनर्स यांना या ऑनलाईन बैठकीस व कार्यशाळेस ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना द्याव्यात ही विनंती. आपला विश्वासू (रामदास जगताप ) उप जिल्हाधिकारी तथा राज्या समन्वयक ई फेरफार प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्या.पुणे

Comments

Archive

Contact Form

Send