विषय – ई-फेराफार व ई-चावडी प्रकल्प स्थायी समिती स्थापन करणे बाबत
विषय – ई-फेराफार
व ई-चावडी प्रकल्प स्थायी समिती स्थापन करणे बाबत
संदर्भ – जमाबंदी आयुक्त यांचे
सोबतची बैठक दि.८.६.२०२१
आपले दि. ३१.५.२०२१ चे संदर्भीय
निवेदनाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त व संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील चर्चेप्रमाणे काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत
त्यापैकी ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प स्थायी समितीची स्थापना हा एक निर्णय
आहे.
मा. जमाबंदी आयुक्त यांचे
निर्देशांप्रमाणे ई फेरफार प्रणालीत देण्यात आलेल्या सुविधा या पुढे होणाऱ्या
सुधारणा आणि काळानुरूप आवश्यक वाटणारे तसेच जनतेला अचूक, तत्पर व पारदर्शी सेवा
देण्यासाठी तसेच तलाठी मंडळ अधिकारी व अन्य वापरकर्ते यांचे कामात आवश्यक अशी
सुलभता येण्यासाठी करावे लागणाऱ्या बदलांचा अभ्यास करून त्याची उपयुक्तता आणि
सुसंगतता तपासून त्या लागू करण्यासाठी तशी शासनाला शिफारस करण्यासाठी जमाबंदी
आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली ई-फेरफार
व ई-चावडी प्रकल्प स्थायी समिती नियुक्त करण्यात येणार आहे. या समिती मध्ये उप
आयुक्त महसूल, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार
यांचे प्रतिनिधित्व असणार आहे त्यासोबतच तलाठी व मंडळ अधिकारी यांचे प्रतिनिधित्व
करण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेतील आणि त्यासाठी पुरेसा वेळ
देवू शकतील असे प्रत्येक महसूल विभागाचे प्रतिनिधित्व करणारे एक असे सहा तलाठी /
मंडळ अधिकारी यांची नावे समन्वय महासंघाच्या वतीने तात्काळ इकडे कळवावीत असे
कळविण्याचे निर्देश मला आहेत. तरी आपण अशा सहा प्रतिनिधींची संपूर्ण नावे, पदनाम,
ई मेल आय डी, मोबाईल नम्बर व पूर्ण पत्ते ई माहिती तातडीने कळवावीत ही विनंती.
आपला स्नेहांकित,
(रामदास जगताप)
उपजिल्हाधिकारी
व राज्य समन्वयक ई-फेरफार
जमाबंदी
आयुक्त कार्यालय, पुणे
Comments