दस्त करून देणार व घेणार यांचे अचुक मोबाईल नं. दस्त नोंदणी करतांना घेणेबाबत.
महाराष्ट्र
शासन
महसूल
व वन विभाग
जमाबंदी
आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व
तिसरा मजला ,
नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे
दूरध्वनीक्र. ०२०-२६१३७११० Email
ID :dlrmah.mah@gov.in Web site: https://mahabhumi.gov.in
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- क्र.रा.भू.4/ दस्त नोंदणी
/2021
पुणे, दिनांक : 03 /06/2021
प्रति,
मा. नोंदणी महानिरीक्षक
व मुद्रांक नियंत्रक
महाराष्ट्र राज्य,पुणे
विषय:- दस्त करून देणार व घेणार यांचे
अचुक मोबाईल नं. दस्त नोंदणी करतांना घेणेबाबत.
महोदय,
मा. अप्पर मुख्य सचिव, महसूल मुद्रांक शुल्क व नोंदणी यांचे निर्देशाप्रमाणे ई- फेरफार प्रणाली सोबत प्रत्येक खातेदार
यांचे मोबाईल नं. ई- मेल आय-डी (असल्यास), बँक खाते क्रमांक, IFSC कोड इ. माहितीसह खातेदारांची माहिती म्हणुन साठविण्याची
कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
तथापी दुय्यम निबंधक स्थरावर दस्त नोंदणी करतांना दस्त करून देणार व घेणार यांचे अचूक मोबाईल नं. नमूद न
करता, दस्त लेखनिक अथवा वकिल यांचे मोबाईल नं. व ई- मेल आय-डी नमुद केले जातात किंवा मोबाईल नं. मध्ये फक्त 0000000000
किंवा 9000000000 किंवा
9999999999 असे खोटे नंबर नमुद केले जातात त्यामुळे त्याचा काहिही उपयोग होत नाही.
ई- फेरफार प्रणाली मध्ये राज्यातील 100% अधिकार अभिलेख संगणकीकृत झालेले असुन जमीन हस्तांतर, कर्ज बोजे,
गहाणखत इ. बाबतचे दस्त आयसरीता व ई- फेरफार प्रणालीच्या लिंकेज मध्ये करण्यात येतात त्यावेळी प्रत्येक दस्त करून देणार व
घेणार तसेच मान्यता देणार/ कुलमुखत्यार धारक यांचे अचूक मोबाईल नं. व ई- मेल आय-डी (असल्यास) घेवून सदरची माहिती सुची -2
सोबत संबधीत तलाठी यांचेशी ऑनलाईन पद्धतीने शेअर केल्यास प्रत्येक खातेदाराचा प्रोफाईल तयार होईल व त्याचा वापर पुढिल
हस्तांतराच्या वेळी करता येईल तरी आपणास विनंती आहे की PDE सह किंवा PDE शिवाय दस्त नोंदणी करतांना OTP व्दारे कर्न्फमेशन
करूनच मोबाईल नं. साठविण्यात यावेत अशी सुविधा विकसीत करावी व पक्षकारांचे अचूक मोबाईल नं. आयसरिता प्रणालीत
नोंदविण्याबाबत सर्व दुय्यम निबंधक
यांना सुचना द्याव्यात. ही विनंती
(एन.के.सुधांशु )
जमाबंदी आयुक्त आणि संचालक,
भूमि अभिलेख, (म.राज्य).
प्रत- मा.
अप्पर मुख्य सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क (ज-1अ) यांना माहितीस्तव सादर.
नमस्कार
ReplyDeleteमी अजित भालचंद्र देशपांडे रा कासेगाव 2018 मधे कासेगाव येथील 2164हा गट 44एकरचा आहे शासकीय मोजणीझालेली नाही हया मधे2164/1 व 2164/2 असे भा पडले 2164/2ब हया7/12उतारे प्रमाणे खरेदी व विक्री करताना मुळ कागदपत्रे 6ड 14101न पहाता हा23339हा 6ड झाला मी ऑनलाईन तक्रार केली फेरफार मधे मालकी हक्क केला फेरफार 14101मधे सामाईक रस्ता असताना फेरफार मधे मालकी हक्क केला व आम्हाला खरेदी व विक्री करताना नोटीस नाही व ज्यानी जमीन घेतली ते आमच्या हक्कांवर डावलले न मोजणी करता आपिलात असताना वहिवाट चालु केली व आता आम्हाला जिवेमारणेची धमकी दिली आहे आपण मला न्याय दयावा