ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी करणेसाठी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्थापन करणेसाठी महसूल व कृषी अधिकारी यांच्या सेवा वर्ग करणे बाबत
प्रति,
मा. विभागीय आयुक्त (सर्व)
मा. कृषी आयुक्त ( म.रा.) पुणे
विषय - ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी करणेसाठी प्रकल्प
अंमलबजावणी कक्ष स्थापन करणेसाठी महसूल व कृषी अधिकारी
यांच्या सेवा वर्ग करणे बाबत
संदर्भ- १. महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय
क्रं.जमीन-2018/प्र.क्रं.92/ज-1अ
२. मा. अप्पर
मुख्य सचिव महसूल यांचे अध्यक्षतेखालील बैठक दिनांक ७.६.२०२१
महोदय,
शासनाच्या
दिनांक: 10/06/2018 च्या शासन निर्णयान्वये पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा मोबाईल (ॲप)
गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी
कार्यक्रम राबविणे व त्यासाठी कार्यपध्दती निश्चित करून दिली आहे. त्या साठी टाटा ट्रस्ट च्या मदतीने विकसित ई-पीक पाहणी मोबाईल
ॲप चा पथदर्शी प्रकल्प यशस्वी
झाल्यानंतर शासनाने हा प्रकल्प राज्यभर राबविण्याचा विचार केला आहे. ई पीक पाहणी
हा पथदर्शी प्रकल्प क्षेत्रीय स्थरावर महसूल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या
राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयात ई पीक पाहणी
अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी अनुभवी महसूल व कृषी
अधिकाऱ्यांच्या सेवा एक वर्ष कालावधीसाठी वर्ग करणे आवश्यक आहे.
राज्यस्थरीय ई पीक पाहणी प्रकल्प अंमलबजावणी कक्षात समन्वयक व मास्टर
ट्रेनर्स म्हणून एक उप जिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक नायब तहसीलदार व एक कृषी
अधिकारी (वर्ग-१) आणि एक तालुका कृषी अधिकारी दर्जाचे अधिकाऱ्यांची सेवा एक
वर्षासाठी आवश्यक असल्याने आपणास विनंती
करण्यात येते कि आपल्या विभागातील इच्छुक अधिकारी यांचे सोबतच्या नमुन्यात परिचय
पत्र व संमतीपत्र घेवून त्यांची नावे इकडे कळवावीत त्यानंतर त्यामधून योग्य
अधिकार्यांची निवड करून उसनवारी तत्वावर सेवा वर्ग चे आदेश शासन स्थारावरून
काढण्यात येतील . आपल्या विभागातील नावे दि. ११.६.२०२१ पूर्वी dlrmah.mah@nic.in आणि ramdasjagtapdc@gmail.com या ई
मेल वर पाठवावीत ही विनंती
आपला विश्वासू
( एन.के.सुधांशू )
जमाबंदी
आयुक्त व संचालक
भूमी अभिलेख (म. रा. )पुणे
ई पेक पाहणी प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालयातील प्रकल्प अंमलबजावणी कक्ष
१.
अधिकार्याचे नाव
२.
पदनाम
३.
सध्या धारण केलेले पद
४.
सध्याच्या कार्यालयाचा पत्ता
५.
कायमचा पत्ता
६.
सध्याची वेतनश्रेणी
७.
या पदावरील सलग सेवेचा कालावधी
८.
शिक्षण
९.
विशेष प्राविण्य
१०.
मोबाईल नं.
११.
ई मेल आय डी
१२.
सेवार्थ आय डी
१३.
सेवानिवृत्तीचा दिनांक
वरील ची माझी वैयक्तिक माहिती खरी व अचूक असून मी एजामाबंदी आयुक्त
कार्यालयात ई फेरफार प्रकल्पाच्या अंमलबजावणी कक्षात सेवा करण्यास इच्छुक आहे .
आपला
( नाव -------------)
Comments