रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

विसंगत सातबारा ओडीसी अहवाल १ ते ४६ निरंक करणे

 

विषय

विसंगत सातबारा  - ODC (online data correction)अहवाल १ ते ४६

ODC (महत्व )

१.-फेरफार प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी संगणकीकृत ७/१२  अ चा अचूक डाटाबेस अत्यावश्यक आहे.

२.ई-फेरफार प्रणाली मधील संगणकीकृत ७/१२ ची अचूकता निश्चित करण्यासाठी राज्यभरात विभागाच्या वतीने चावडी वाचनासह एडीट,री-एडीट मोडुल द्वारे ७/१२ मधील दुरुस्तीची कार्यवाही केलेली आहे.

३.सध्या  ७/१२ मध्ये असलेल्या त्रुटी  महारष्ट्र जमीन महसूल अधिनियामांतर्गत कलम १५५ अन्वये  आदेशाने दुरुस्त करता  येतात.

४.Zero Tolerance to error हे तत्व विचारात घेऊन संगणकीकृत ७/१२ च्या डेटाबेस मधील गाव नमुना नं.१(आकारबंद), गाव नमुना नं.७/१२,गाव

नमुना नं. ८अ मधील विसंगती निश्चित करण्यासाठी ODC मोडुल मध्ये १ ते ४६ अहवाल दिलेले आहेत.

५.संगणकीकृत 7/12  8अ च्या डेटाबेसच्या गुणवत्तेवर थेट परीणाम करणारे अहवाल क्रं. 1, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 27, 28, 30, 33, 34, 35, 36, 37, 39, 40  41 असे एकुण 32 अहवाल हे विसंगत 7/12 साठी कारणीभूत आहेत.

६.दिनांक 04/07/2019 च्याशासनपरिपत्रकान्वयेसंगणकीकृत ७/१२  अचाअचुकडेटाबेसचीखात्रीकरण्यासाठीअहवालनिरंककरूनघोषणापत्र करण्याचीजबाबदारीउपविभागीयअधिकारीयांची आहे.

अहवाल क्र1.

गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक यांचा मेळ बसत नाही ते सर्व्हे क्रमांक.(DSP प्रतिबंधित

गा..नं. 7/12 मधीलडाव्याबाजुचीमुळक्षेत्राचीमाहितीव 7/12 वरीलखातेदारांच्याक्षेत्राचीबेरीजयामध्येमोठीतफावतअसल्याच सदरगट अहवाल १ मध्ये येतो.

7/12 चेक्षेत्रहे. आरयाएककामध्येअसतानाखातेदारांच्यानावासमोरभरलेलेक्षेत्रचौ.मी. मध्येभरलेलेअसल्यास गट अहवाल १ मध्ये येतो.

७ चे मूळ क्षेत्र व भोगवटदारांच्या समोरील क्षेत्र जुळवून दुरुस्त करावे. येथे शून्य क्षेत्राची खाती व ७/१२ पुन्हा अहवाल १ निर्माण होईल अशी दुरुस्ती साठवली जाणार नाही. कंसातील खाती दुरुस्ती करीता उपलब्ध होणार नाहीत.

अहवाल १ मध्ये नसलेल्या गटास – “सदर सर्वे हा अहवाल १ मध्ये नाहीअसा संदेश दिलेला आहे.

दुरुस्ती सुविधा-

*ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने अहवाल१ ची दुरुस्ती किंवा ई-फेरफार  मधून अहवाल १ ची  दुरुस्ती (सुनावणी द्वारे झालेला आदेशफेरफार घेवून  करावी.

*कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती मधून अहवाल १ चे सर्वे दुरुस्त करता येतात,या मध्ये एक तर अहवाल १ निरंक करावा लागेल किंवा आहे तेव्हढी क्षेत्राची तफावत कायमठेवावी लागेल, तो कमी जास्त करता येणार नाही.

*/१२ वरील भोगवटदार पूर्णपणे निरंक अथवा कंस झाले असलेस आदेश व दस्तावेज फेरफारने खातेदार समाविष्ट करावेत.

अहवाल क्र1.

गाव नमुना ७वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा दुपटीपेक्षा जास्त फ़रक असलेले सर्व्हे क्रमांक

 

दुरुस्ती सुविधा-

 

*ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती किंवा ई-फेरफार मधून अहवाल १ ची दुरुस्ती (सुनावणी द्वारे झालेला आदेशफेरफार घेवून करावी.

 

अहवाल क्र2.

गाव नमुना ७ व गाव नमुना ८अ मधील फरक.

दुरुस्ती सुविधा-

सदर अहवाल  village processing मधून  निरंक करता येतो..

अहवाल क्र3.

गाव नमुना १ व ७ मधील क्षेत्रांचा फरक.

*गावनमुना१म्हणजेच  आकारबंद हणजेच odcअहवाल क्रमांक

*अहवाल ३ मधील क्षेत्र आर.चौ.मी मध्ये रुपांतरीत करून दाखविले जाते.

*जेथे अहवाल क्रमांक मध्ये माहिती दिसत नाही याचा अर्थ संबंधित गावामध्येआकारबंदाची माहिती भरलेली नाही.

अहवाल निर्माण होण्याची कारणे

./१२ चे एकक हे.आर.चौ.मी. आहे. परंतु आकारबंद भरताना क्षेत्र आर.चौ.मी. मध्ये  भरलेआहे.

*/१२ चे एकक आर.चौ.मी आहे व आकारबंद भरताना देखील क्षेत्रआर.चौ.मी.मध्ये भरलेआहे..

*आकारबंद भरला आहे परंतू ऑनलाईन प्रणाली मध्ये ७/१२ उपलब्ध नाही.

*एका ७/१२ चे अनेक पोट हिस्से पडलेले आहेत परंतु केवळ एका किंवा काही पोट हिस्स्यांची माहिती भरलेली आहे.

आकाराबंद कसा भरावा?

*आकारबंद भरताना क्षेत्र कोणत्याही  एककात असले तरी केवळ हे.आर मधेच रुपांतरीत करून भरावे.

*एका सर्वे क्रमांकाचे  अनेक पोटहिस्से  पडले असल्यास एक सर्वे क्रमांक भरून  सव हिस्स्यांचे एकत्रित  हे.आर मधील क्षेत्र भरावे (यात बिनशेती प्लॉट व शेती /१२ असेएकत्रित असु शकतात त्यात बिनशेती  चे आर.चौ.मी चे ७/१२ हे.आर मध्ये रुपांतरीत करून एकू ण करावी).

*एका सर्वे क्रमांकाचे  अनेक पोट हिस्से पडले असल्यास सर्व सर्वे क्रमांकाचे खेत्र देखील भरू शकता  के वळ आर.चौ.मी चे क्षेत्र हे.आर मध्ये रुपांतरीत करून भरावे.

*तलाठी लॉगीन ने अहवाल ३ दुरुस्ती साठवा केल्यानंतर  सदर दुरुस्तीला  तहसीलदार/नायबतहसीलदार ईफे रफार यांच्या UC लॉगीन ने मान्यता  देणे आवश्यक आहे. सदर मान्यता देताना गावाच्या आकारबंदाची प्रत पाहून मान्यता देणे आवश्यक आहे.

*चुकीच्या दुरुस्त्या अमान्य करता येतील.

दुरुस्तीसुविधा-

*आकाराबंदाप्रमाणे ७/१२ चे क्षेत्र योग्य असलेस अहवाल ३ च्या दुरुस्तीसाठी ODC मधील दुरुस्ती सुविधा क्रमांक 3 वापरून आकारबंदाप्रमाणे क्षेत्र भरून त्यास DBA यांनी मान्यता द्यावीपरंतु क्षेत्र चुकीचे असलेस कलम १५५ च्या आदेशाने क्षेत्र दुरुस्तीचा आदेश या फेरफारने क्षेत्र दुरुस्ती पूर्ण करावी.

अहवाल क्र3अ.

गाव नमुना १मधील क्षेत्र दुरुस्तीचा सर्व्हे/गट क्रमांक निहाय गोषवारा (अहवाल ३ ची तफावत दुप्पट किंवा त्याचे पटीत आहे असे स.नं.सदर अहवालात दिसतात.)

दुरुस्ती सुविधा-

अहवाल ३ दुरुस्ती करूनच अहवाल ३अ निरंक करता येतो.

अहवाल क्र4.

गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र

 

दुरुस्ती सुविधा- दुरुस्ती पर्याय क्रमांक अहवाल  मध्ये चूकीच्या पद्धतीने दर्शवलेल्या एकूण क्षेत्राची दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा.

अहवाल क्र5.

/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक

 

अहवाल तयार होण्याची कारणे.

 

*७/१२ योग्य आहे परंतु ७/१२ वरील खात्यामध्ये नावांची संख्या जास्त असल्यास.

*खात्यामधील जास्त होणार्या नावांचे दुसरे ७ /१२ सदर खात्यामधेच समाविष्ट झालेले असल्यास.

*खात्यावरील नाव व ७/१२ वरील नाव एकच  आहे परंतु त्या नावाच्या अक्षरामध्ये फरक आहे.

 

 

दुरुस्ती सुविधा-

 

दुरुस्ती पर्याय क्रमांक ५ द्वारे७ वर असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करणे.

 

 

 

अहवाल क्र6.

चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे

 

दुरुस्ती सुविधा-

 

 ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्तीची सुविधा वापरून नावे योग्यपद्दतीने दुरुस्त करणे.

 

 

अहवाल क्र7.

खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार -(DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्तीसुविधा-

 

अहवाल ७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ७ खाता प्रकार दुरुस्ती सुविधा वापरावी.

अहवाल क्र8.

फेरफार क्रनसलेल्या कब्जेदारांची नावे. ( फेरफार क्रमांक ०) - (DSD प्रतिबंधित )

 

 

दुरुस्ती सुविधा-

 

दुरुस्ती पर्याय क्रमांक ८ शून्य फेरफार क्रमांक दुरुस्ती सुविधावापरावी. तसेच कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांकाचे दुरुस्ती पर्याय वापरून देखील दुरुस्ती करता येईल.

अहवाल क्र9.

चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्रमांक

 

दुरुस्ती सुविधा-

 

ई-फेरफार मधून आदेश दस्तावेज फेरफार द्वारे सर्वे क्रमांक बदलणे या पर्यायाचा वापर करून योग्यदुरुस्ती करता येईल.

 

 

 

अहवाल क्र10

१६ आणे पेक्षा  जास्त आणेवारी असलेले सर्व्हे क्र.

 

दुरुस्ती सुविधा-

 

 ई- फेरफार आज्ञावली मधून सामान्य फेरफार (आदेश व दस्तावेज)द्वारे खातेदाराच्या नावासमोरील आणेवारीचे क्षेत्रात रूपांतर करण्यात यावे.

अहवाल क्र11.

इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही.- (DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

 

ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने इतर अधिकारातील नोंदीचा प्रकार उपप्रकार  बदलणे या पर्यायाचा वापर करावा.

अहवाल क्र12.

फेरफार क्र .नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी. ( फेरफार क्रमांक ०)  (DSD प्रतिबंधित )

 

दुरुस्ती सुविधा-

 

ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांकाची दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा.

अहवाल क्र13.

भुधारणा पद्धतीसाठी प्रकार निवडलेला नाही. (DSD प्रतिबंधित) 

 

दुरुस्ती सुविधा-

 

ई-फेरफार आज्ञावली मधून आदेश दस्तावेज अथवा भुधारणा प्रकारात बदलफेरफारने योग्य भूधारणा निवडणे.

अहवाल क्र14.

७ भरलेला आहे पण १२ भरलेला नाही

 

दुरुस्ती सुविधा-

 

पीक पाहणी आज्ञावली (OCU) मधून गाव नमुना नं.१२ मध्ये पीक पाहणी ची माहिती भरावी.

अहवाल क्र15.

निरंक अथवा  अथवा 0 अथवा TKN असलेले खाते(DSD प्रतिबंधित )

 

 

दुरुस्ती सुविधा-

 

दुरुस्ती पर्याय क्रमांक १५ निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाता क्रमांक दुरुस्ती सुविधा वापरावी.

अहवाल क्र16.

खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी. (DSD प्रतिबंधित )

 

दुरुस्ती सुविधा-

 

जर खातेदार नसलेला निरंक ७/१२योग्य (अस्तित्वात असल्यास ) असल्यास ई-फेरफार आज्ञावलीमधील “अहवाल१ची दुरुस्ती”  हा पर्याय वापरून नवीन खाते समाविष्ट करावे अथवा जर हा निरंक सातबारा काढून टाकायचा असल्यास अहवाल क्र१६ ची दुरुस्ती पर्याय वापरून हा ७/१२ नष्ट करावा.

अहवाल क्र17.

खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक

 

दुरुस्ती सुविधा-

 

दुरुस्ती पर्याय क्रमांक १७-खाता रजीस्टरमध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांककाढून टाकणेसाठी वापरावा.

अहवाल क्र18.

सामाईक खात्या मधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी.(DSDप्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

 

ई-फेरफार आज्ञावली मधून आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती फेरफारद्वारे खातेदारांच्या नावा समोरील क्षेत्र सामूहिकरीत्या (फक्त एक नावा समोरील ) नमूद करावे अथवा सर्व नावांसमोर ( % अथवा १००% क्षेत्र नमूद करणे ) क्षेत्र नमूद करणे.

अहवाल क्र19.

सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी. (DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

 

ई-फेरफार आज्ञावली मधील आवश्यकते प्रमाणे आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती / आदेशाने अहवाल १ची दुरुस्ती फेरफार घेऊन खातेदाराच्या नावा समोरील आणेवारीचे क्षेत्रात रूपांतर करण्यात यावे.

अहवाल क्र20.

बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी

 

दुरुस्ती सुविधा-

 

हा अहवाल माहितीस्तव आहे जर या ७/१२ यादी पैकी काही ७/१२ चुकून बंद झाले असून ते पुन्हा चालू करावयाचे असल्यास ई फेरफार आज्ञावली मधून आदेशाने बंद ७/१२ चालू करणे हा फेरफार घ्यावा.

अहवाल क्र21.

७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक या मध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र. (DSD प्रतिबंधित)

 

 

दुरुस्ती सुविधा-

 

जर या ७/१२ वरील क्षेत्र योग्य असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने एकक दुरुस्ती फेरफार घेऊन एकक बदलण्याचा फेरफार घ्यावा अन्यथा जर ७/१२ वरील एकक योग्य असल्यास क्षेत्र दुरुस्ती (शेतीअथवा क्षेत्र दुरुस्ती (एन.ए७/१२ साठी या फेरफाराद्वारे योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात अथवा क्षेत्र बरोबर आहे आणि एकक सुद्धा बरोबर आहे परंतु क्षेत्र चुकीच्या ठिकाणी लिहिले आहे उदा. एकक आर. चो.मी. आणि क्षेत्र जिरायत मध्ये लिहिले आहे तर या साठी कलम १५५ च्या आदेशाने क्षेत्र दुरुस्ती फेरफार घ्यावा आणि क्षेत्र बिनशेती मध्ये लिहावे.

अहवाल क्र22.

शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक  (DSD प्रतिबंधित )

 

दुरुस्ती सुविधा-

 

खाते अनावश्यक असलेस ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती फेरफार घेऊन खाते क्रमांक वगळणे ही सुविधा वापरावी अथवा आदेशाने ७/१२ वरील क्षेत्र दुरुस्ती फेरफार क्षेत्र दुरुती करून घ्यावे.

अहवाल क्र23.

पुढील वर्षासाठी पिक पाहणी चा डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक

 

दुरुस्ती सुविधा-

 

ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक २३ मधे दर्शविलेल्या सुचने नुसार पीक पाहणी आज्ञावली (OCU)  मधून पुढील वर्षाचा डाटा नष्ट करणे ही सुविधा वापरावी

अहवाल क्र24.

अहवाल २४ एक सारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक (DSD प्रतिबंधित )

 

दुरुस्ती सुविधा-

 स्पेस असलेने तयार झालेले एक सारखे सर्वे क्रमांक चा हा अहवाल दिला आहे. -फेरफार आज्ञावली मधून आदेश दस्तावेज फेरफार ने सर्वे क्रमांक बदलणे हा पर्याय वापरावा तसेच अयोग्य ७/१२ असलेस ७/१२ बंद करावा.

अहवाल क्र25.

भोगवटदार-१ असलेले परंतु १(क) मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक. (DSD प्रतिबंधित )

 

दुरुस्ती सुविधा-

अहवाल मध्ये दाखविलेले सर्वे योग्य असलेस DBA यांचे UC  आज्ञावली मध्ये १() चे व्यवस्थापन करावे / अहवाल मधील भूधारणा चुकीची असल्यास आदेश दस्तावेज फेरफार ने योग्य भूधारणा व तिचा उपप्रकार निवडून दुरुस्ती करावी.

अहवाल क्र26.

भोगवटदार-२ असलेले परंतु १(क) मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक(DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

ई-फेरफार आज्ञावली मधून अनोंदणीकृत फेरफार –नियंत्रित सत्ता प्रकारची नोंद या पर्यायाचा वापर करून दुरुस्ती करावी अथवा आदेश दस्तावेज फेरफार द्वारे भोगवटदार वर्ग २ चा १ते१४ मधील योग्य उप प्रकार निवडून दुरुस्ती करावी.

अहवाल क्र27.

खातेदारांचे नाव / नावे निरंक असलेले खाता – सर्व्हे क्रमांक (DSD प्रतिबंधित)  

 

दुरुस्ती सुविधा-

अहवाल २७ च्या दुरुस्ती साठी ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक २७ वापरून खातेदारांचे नाव / नावे निरंक असलेले खाते क्रमांक / नावे काढून टाकणेत यावीत

अहवाल क्र28.

समान नावांची एका पेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक (DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

ई-फेरफार आज्ञावली मधून खाते एकत्रीकरण करावे अथवा खात्यावरील कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती फेरफार ने खाते निवडक सर्वे वरून वगळणे पर्याय वापरून दुरुस्त करावेअथवा -फेरफार आज्ञावली मधून तलाठी स्तरावरील कलम १५५ च्या आदेशाने चूक दुरुस्ती फेरफार घ्यावा

अहवाल क्र29.

इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक

 

 

दुरुस्ती सुविधा-

हस्तलिखित ७/१२  प्रमाणे नोंदी आल्या नसल्यास आदेश दस्तऐवज फेरफारातून अथवा कलम १५५ अन्वये तलाठी चूक दुरुस्ती फेरफार घेऊन इतर हक्कातील माहिती भरून घ्यावीअथवा -फेरफार आज्ञावली मधून तलाठी स्तरावरील कलम १५५ च्या आदेशाने चूक दुरुस्ती फेरफार घ्यावा.

अहवाल क्र30.

७/१२ वरील क्षेत्र लागवडी योग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक (DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

सदर सातबारा (एकाच ७/१२ वरशेती व बिनशेती क्षेत्र नमूद असल्यास तो पूर्णतः शेतीचा किंवा बिनशेती क्षेत्र चा करावा त्यासाठी ई-फेरफारआज्ञावली मधील कलम १५५ चा क्षेत्र दुरुस्तीचा आदेश घेऊन योग्य दुरुस्ती करावी.

अहवाल क्र31.

शेती ७/१२ वरील क्षेत्र २० हे.आर.पेक्षा जास्त किंवा बिनशेती ७/१२ वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी. पेक्षा जास्त असलेले सर्व्हे क्रमांक (DSD प्रतिबंधित )

 

दुरुस्ती सुविधा-

सातबारा वर क्षेत्र दुरुस्ती आवश्यक असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ आदेशाने क्षेत्र दुरुस्ती हा फेरफार घ्यावा अन्यथा योग्य क्षेत्र असल्यास सदर सातबाराचे क्षेत्र २० हेक्टर अथवा ९९ आर पेक्षा जास्त असल्यामुळे सदर सातबारावर फेरफार घेण्यासाठी एकवेळ तहसीलदार यांची मान्यता घ्यावी.

अहवाल १ मध्ये आणि मोठ्याक्षेत्राचे सर्वे न. असेल तर त्यावर फेरफार घेण्यासाठी प्रत्येक वेळेस तहसीलदार यांची मान्यता घ्यावी लागेल. त्या मुळे हा अहवाल निरंक असणे अत्यावश्यक आहे.

अहवाल क्र32.

अहवाल १ मधील  क्षेत्रातील  फरक ०.०१ हे.आर. पेक्षा जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक ची यादी

 

दुरुस्ती सुविधा-

ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती हा फेरफार घ्यावा व योग्य ती दुरुस्ती करावी.या अहवालातील सर्वे नंबर फेरफार घेण्यासाठी दुरुस्ती शिवाय फेरफार घेण्यासाठी उपलब्ध असतील.

अहवाल क्र33.

फेरफाराने खाता विभागणीसाठी पात्र असलेले खाता क्रमांक. (DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

 ई-फेरफार आज्ञावली मधील फेरफार मुळे होणारी खाते विभागणी हा पर्याय वापरून सदर सर्वेक्रमांकावर खाता विभागणी ही प्रक्रिया पूर्ण करावी.

अहवाल क्र34.

गाव निहाय साजा आणि मंडळ नोंदणीचा अहवाल

 

दुरुस्ती सुविधा-

सदर अहवाल माहितीसाठी  देण्यात आला आहे - युजरक्रीएशन ( UC ) मधून प्रत्येक गाव योग्य त्यासाजा व मंडळामध्ये नायब तहसीलदार यांनी  सामाविष्ट करावे . त्यानंतरच DDM मधील चलन तयार होईल तसेच सर्व नकला वर साजा व मंडळाचे नाव दर्शविण्यात येईल.

अहवाल क्र35.

इतर अधिकारांमध्ये-- (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक.(DSD प्रतिबंधित)

 

 

दुरुस्ती सुविधा-

 

अहवाल ३५ च्या दुरुस्तीसाठी ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक ३५ वापरुन इतर हक्कातील - - ( डबल डॅश) निरंक करणेत यावेत.

अहवाल क्र36.

प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक.

 

दुरुस्ती सुविधा-

 

अहवाल ३६ च्या दुरुस्तीसाठी ई-फेरफार आज्ञावली मधून १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्ती फेरफार वापरून योग्यती दुरुस्ती करावी किंवा केवळ निरंक प्रमाणीकरण शेरा दुरुस्त करणे करिता ई-फेरफार मध्ये मंडळ अधिकारी यांनी निरंक प्रमाणिकरण शेरा दुरुस्त करणे पर्याय वापरून दुरुस्ती करावी.

अहवाल क्र37.

खातेदारांच्या नावा मध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट. (DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

 

अहवाल ३७ च्या  दुरुस्तीसाठी ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक ३७ खाता रजीस्टरमध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणे हा  पर्याय वापरून दुरुस्ती करावी

अहवाल क्र38.

गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणी चा फ़रक

 

दुरुस्ती सुविधा-

 

अहवाल ३८ च्या दुरुस्तीसाठी  - ७/१२ च्या एकूण आकारणीच्या प्रमाणात भोगवटदार यांच्या क्षेत्राच्या प्रमाणे विभागून देणे बाबत सुविधा लवकरच देनेत येईलसदयस्थितीत ई-फेरफार आज्ञावली मधून ७/१२ वरील क्षेत्र दुरुस्ती फेरफारमधील आकारणी दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा.

अहवाल क्र39.

चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,ए.कु.मॅ. नावांची खाती.

 

दुरुस्ती सुविधा-

 

दुरुस्ती पर्याय क्रमांक ३९ चुकीच्या पध्दतीने भरलेली अपाकए.कु.मॅ. ची नावे ही टोपण नावात भरावीतजर अशी नावे दुसऱ्या ओळीत भरलेली असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाते दुरुस्ती फेरफार वापरून योग्य ती दुरुस्ती करावी

अहवाल क्र40.

खाता मास्टर मध्ये अतिरिक्त नावे असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांक निहाय यादी

 

दुरुस्ती सुविधा-

 

अहवाल ४० च्या दुरुस्ती साठी ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक ४०- खाता मास्टर वरील अतिरिक्त नावे काढणे हा पर्याय वापरून अहवाल निरंक करावा.

अहवाल क्र41.

अहवाल ५अतिरिक्त (DSD प्रतिबंधित)

 

दुरुस्ती सुविधा-

 

दुरुस्ती अहवाल ४१ वापरून खाता विभागणी करावी व कलम १५५ अन्वये खाता दुरुस्ती मधून योग्य ती खात्यातील दुरुस्ती करावी

अहवाल क्र42.

सातबारा वर एकेरी अवतरण चिन्ह (Single Quote) असलेले सर्व्हे क्रमांक.

 

दुरुस्ती सुविधा-

 

सातबारा वरील एकेरी अवतरण चिन्ह (Single Quote) माहितीची दुरुस्ती  हा पर्याय वापरावा.

अहवाल क्र43

सरकार अथवा सरकारी विभागाचे खाते यामध्ये एकपेक्षा जास्त नावे असलेल्या खात्यांची यादी

 

दुरुस्ती सुविधा-

 

हा अहवाल माहितीस्तव आहे तथापि अशा खात्यामध्ये सरकार सोबत अन्य खाजगी व्यक्ती असू नयेत असे असल्यास कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती हा पर्याय वापरून  खाते विभाजन करता येईल.

अहवाल क्र43 

सरकार अथवा सरकारी विभागाचे खाते ज्या ७/१२ वर आहे त्या ७/१२ वर इतर खाते असलेल्या सर्व्हे क्रमांकांची यादी 

 

दुरुस्ती सुविधा-

 

हा अहवाल देखील माहितीस्तव दिला आहे तथापि एकाच ७/१२ वर सरकार खाते व खाजगी व्यक्तीची जमीन असू नये अशा सूचना सन २००२ मधेच  दिल्या आहेत त्यासाठी योग्य प्रक्रियेने अथवा आदेशाने ७/१२ चे विभाजन करावे. ( या मध्ये सरकार ने पुनर्वसन साठी संपादन केलेल्या जमिनी सरकारी खात्यात समाविष्ट करू नयेत अथवा त्यांना सरकार भूधारणा देवू नये

अहवाल क्र45.

चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठे फेरफार क्रमांक असलेले सर्वे क्रमांक

 

वाडीविभाजन झालेने नवीन गावामध्ये चालू फेरफार क्रमांक पेक्षा मोठे फेरफार क्रमांक नोंदविलेले असू शकतात.गावातील चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठे असलेले फेरफार क्रमांक जे online e-ferfar प्रणाली मध्ये तयार झाले नसून त्यांना MANUAL दफ्तरी (OFFLINE) फेरफार क्रमांक असे कायम करायचे असल्यास ‘कलम  १५५ च्या आदेशाने गावातील चालू फेरफार क्रमांकापेक्षा मोठ्या फेरफार क्रमांकांना कायम करणे’ या फेरफार क्रमांकाचा वापर करावा.

अहवाल क्र46.

पिकांचे क्षेत्र हे गाव नमुना सात वरील क्षेत्रापेक्षा जास्त असलेल्या सर्वे चा अहवाल दाखविला.

 

पिकाचे क्षेत्र हे गाव नमुना ७ वरील क्षेत्रापेक्षा जास्त असल्यास Online Crop Updation(OCU) MODULE पिक पेऱ्याची दुरुस्ती करावी.

मान्यता

*अहवाल ५,अहवाल ७ आणि अहवाल १५ची दुरुस्ती केलेनंतर तलाठी यांनी  स्वतः दुरुस्त्याना  मान्यता देणे  आवश्यक आहे.

 

*अहवाल ३(अहवाल ३अ ) चे दुरुस्ती नंतर DBA(नायब तहसीलदार) EFERFAR किंवा तहसीलदार यांचे लोगिन ने मान्यता घेणे आवश्यक.

 

*चुकीच्या दुरुस्त्या अमान्य करता येतील

अतिरिक्त अहवाल

* ७/१२ पहा

* गाव नमुना १

* १क च्या जमिनीची यादी.

* एकच खाते असलेल्या सर्वे क्रमांकाची यादी.

* भूधारणा प्रकार बदललेल्या सर्व क्रमांकाचा अहवाल.

*खाता अनुक्रमान्कानुसार लावल्याने बदल झालेले खाता क्रमांक.

*तालुका स्तरीय पडताळणी अहवाल (समरी रेपोर्ट) ची माहिती अद्यावत करणे.

*पडताळणी अहवाल क्रमांक १ ते ४३ ची अहवाल निहाय एकत्रित माहिती.

 

 

 

Comments

Archive

Contact Form

Send